संपादने
Marathi

युअर स्टोरी : एका नव्या अध्यायाची सुरुवात

श्रद्धा कामावरती...श्रद्धा लोकांच्या यशोगाथेवर आणि श्रद्धा या यशोगाथा दुस-यांपर्यंत पोहोचवण्यावर.

17th Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

मला तो ऑगस्ट २००८ चा दिवस अगदी लख्ख आठवतो. मुंबईत भरलेल्या एका उद्योजकांच्या परिषदेत मी जाहीरपणे म्हणाले की मी एक असा उपक्रम सुरू करणार आहे जो अशा उद्योजकांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी सांगेल जे आपल्या क्षेत्रातले सुपरस्टार्स नाहीत, पण त्यांच्यात एक विलक्षण चमक असेल, झपाटून जाण्याची उर्मी असेल, आशा असेल. काही उद्योजक म्हणाले, “तुम्ही कराच” आणि उपस्थित असलेल्या तज्ञांपैकी बहुतेक म्हणाले, “हे यशस्वी होणार नाही. हा उपक्रम सहा महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही. हा उपक्रम म्हणजे केवळ आगळावेगळा छंद आहे, याहून अधिक काही नाही”. अनोळखी उद्योजकांच्या गोष्टींमध्ये व्यवसायिक सेन्स कसा असणार ?

आज आपण २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात प्रवेश करतोय आणि ‘युअर स्टोरी’ वेबसाईट अथकपणे, झपाटून आणि पॅशननं गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणारी आपली सात वर्ष पूर्ण करतेय. काही सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित भागीदारांच्या सहकार्यानं आम्ही एक पूर्णपणे नवीन, रोमांचक पर्व सुरू करत आहोत.

संस्थापक श्रद्धा शर्मा.www.yourstory.com

संस्थापक श्रद्धा शर्मा.www.yourstory.com


जे कोणी संघर्ष करताहेत, यशस्वी होताहेत, स्वप्न पाहताहेत आणि त्यात अयशस्वी देखील होताहेत अशा सर्वांना माझं हेच सांगणं आहे की, मी या वाटेवर चालता चालता शिकले, तुम्ही सुद्धा तुमच्या अथक प्रयत्नांचे अर्थ इथे जाणू शकता.

या उपक्रमाने माझा वेळ घेतला आहे, भरपूर वेळ. मला चालत रहावे लागले होते आणि तो कंटाळवाणा वाटावा असा, एकाकी आणि प्रदीर्घ प्रवास होता. कुणी जर यापेक्षा वेगळं काही सांगत असेल तर त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. हे माझे काय चालले आहे असे प्रश्न मला विचारले गेले. माझ्यासाठी तो काळाकुट्ट काळ होता. अशा परिस्थितीत फक्त आत्मविश्वासाच्या बळावरच हा खडतर प्रवास मी करू शकले. मला करायचे होते किंवा मरायचे होते. तिथे थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

मी जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा मला हे जाणवते की, मी मिळवलेला जो मोठा अनुभव होता तीच माझी अत्यंत बहुमोल अशी संपत्ती आहे. चांगले असो अथवा वाईट. सगळ्याचीच मी सारखीच मनापासून काळजी घेत होते. आज मी जी काही आहे, ती त्यानेच घडलेली आहे. कधीही तज्ञ समजले जाणारे आणि जाणकारांवर अवलंबून राहू नका. तुम्ही भिंतीवर डोके आपटून घ्याल, तुम्ही आक्रोश कराल, रडाल आणि सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटेल. प्रत्येकजण करतो. होय, अगदी प्रत्येकाच्या वाट्याला हेच येतं. तेव्हा तुम्ही तुमचे अनुभव जगा. जे मला ओळखतात, ज्यांनी मला अगदी जवळून पाहिलंय, त्यांनी सुद्धा या दिवसांत मला आलेले अपयशाचे असंख्य उतार पाहिलेत. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छिते, की जर तुम्ही अपयशाच्या डोहात बुडाला नाहीत तर यशाची उंचीही उपभोगू शकणार नाहीत. मी माझ्या अपयशाचे उतार अनुभवले आहेत आणि ती जागा खरंच चांगली आहे. जेव्हा जेव्हा मला अपयशाचा उतार लागला तेव्हा तेव्हा मला पाहिजे ते मिळवण्यासाठी मी आपोआपच मोठ्या जोमानं आणि ताकदीनं पुन्हा उभी राहिले.

माझा चांगल्या कर्मावर विश्वास आहे. चांगले संकेत आणि भावनांमुळे फलप्राप्ती शंभर पटीनं होताना मी पाहिले आहे. तसेच अनेक उद्योजक बदलताना ही मी पाहिले आहेत आणि मी अशी बदलणार नाही यासाठी जोरदार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.(या प्रयत्नांमध्ये मला माझ्या टीमनं नेहमीच मदत केली आहे. माझी टीम मला नेहमी जमिनीवर आणेल याबाबत माझा विश्वास आहे) पण असं म्हणत असताना, मला हे ही माहीत आहे की माझ्या सभोवती जे जे काही आहे ते ते सारं बदलत राहणारं आहे. जितकं मी तीव्रतेने, पूर्ण झोकून देऊन आणि आवेशाने स्वत:ला पाहते, तितकीच मी आनंदी असेन याची मला खात्री आहे.

गेली सात वर्षे मी यात स्वत:ला गुंतवून ठेवले आहे आणि ते योग्यच आहे. (आणि आशा आहे की अधिकाधिक लोक हे मान्य करतील आणि समर्थनही करतील)


बाहेरून निधी उभारण्याचा मी निर्णय घेतलाय. कारण जर मला प्रत्येक कथा महत्त्वाची आणि दखलपात्र बनवण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर माझ्या पंखांखाली मला दमदार वा-यांची गरज आहे. आणि मला हे स्पष्ट झालंय की या कथेचे ते लोक एक हिस्सा व्हावेत, ज्यांचा याच मूल्यांवर आणि तत्त्वांवर विश्वास आहे.


“ अशी माणसं मिळाली याबाबत मी स्वत:ला सुदैवी आणि कृतज्ञ समजते. रतन टाटा, वणी कोला (कलरी कॅपिटल) कार्थी मदसामी (क्वॉलकॉम व्हेंचर) आणि टी. व्ही. मोहनदास पै यांनी युअर स्टोरीमध्ये गुंतवणूक केली हे सांगताना मला खरंच अत्यानंद होतोय.”

प्रत्येक कथा महत्त्वाची बनवणं हे अभूतपूर्ण आहे आणि या स्वप्नाला सहकार्य करतील आणि मनापासून विश्वास ठेवतील अशा लोकांची आम्हाला आज जास्त गरज आहे. युअर स्टोरीवर आणि माझ्यावर ज्यांनी ज्यांनी प्रभाव पाडलाय अशा सर्वांचीच नावं मी इथं घेऊ शकणार नाही. पण ज्यांनी मोठ्या मनानं मदत केलीय, सहकार्य केलंय आणि माझ्या बाजूनं जे उभे राहिलेत अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. विशेषत: माझ्या अत्यंत हुशार टीमचे.

आता आणखी एक रोमांचक घोषणा ऐका..प्रत्येक कथा महत्त्वाची असणं हाच युअर स्टोरीचा DNA आहे. आणि म्हणूनच आम्ही लवकरच प्रत्येकाला आपल्या मोबाईल फोनचा वापर करून लिहिण्याची, बोलण्याची आणि स्वत:च्या कथा लोकांपुढं मांडण्याची संधी देणारं भारतातलं पहिलं टेक प्रोडक्ट लाँच करत आहोत. आम्ही फार पूर्वी आपल्यापासून बाजूला ठेवलेल्या मौल्यवान भेटवस्तूंवर हक्क सांगण्याची आता वेळ आली आहे. आता आपल्या स्वत:च्या भाषेत आपली कथा सांगण्याची आणि या माध्यमातून लाखो सत्यपूर्ण कथा तयार करण्याची वेळ आली आहे. शाश्वत आशा, एक झपाटलेपण आणि मनातली आग व्यक्त करणा-या कथा प्रत्येक घराघरात निर्माण व्हाव्यात या उद्देशानं आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण आमच्या या उपक्रमात सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते.

“ युअर स्टोरीला जिवंत ठेवल्याबद्दल, आपला एक भाग बनवल्याबद्दल आपले आभार. आपण दिलेल्या प्रेमामुळेच युअर स्टोरीला जिवंतपणा आला, तिला बहर आला. “

आणि हो, आपली कथा आत्ता कुठे सुरू झालीय. आपल्या कथा निर्माण करण्याबद्दल तुमचे, माझे आणि आपले सर्वांचेच अभिनंदन! - श्रद्धा शर्मा

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags