संपादने
Marathi

ʻस्लम क्रिकेट लीगʼच्या माध्यमातून पूर्ण होते गरीब मुलांचे स्वप्न

Team YS Marathi
20th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

गरीब मुलांना नशा आणि गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याच्या उद्देश्याने सुरू करण्यात आलेली ʻस्लम क्रिकेट लीगʼ, दक्षिण दिल्लीनंतर उत्तर, पश्चिम, पूर्व आणि मध्य दिल्लीत गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांकरिता आयोजित करण्यात येणार आहे. भारतात क्रिकेट या खेळाला धर्म मानले जाते. येथे प्रत्येकजण क्रिकेटर बनण्याची इच्छा बाळगतो. मात्र क्रिकेट खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महागड्या साहित्यामुळे गरीब मुलांकरिता ते एक स्वप्नच राहते. दिल्लीत गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांचे हे स्वप्न ʻस्लम क्रिकेट लीगʼद्वारे पूर्ण करण्यात येते.

image


दिल्लीतील आरकेपुरम येथे राहणारे बीएस पुंडीर अनेकदा झोपड्यात राहणाऱ्या गरीब मुलांना क्रिकेट खेळताना पाहत असत. या मुलांमध्ये खेळण्याचा उत्साह तर होता. मात्र त्यांच्याकडे या खेळाकरिता लागणारी सामग्री नव्हती. त्यांच्याकडे व्यवस्थित बॅटही नव्हती आणि बॉलही. त्या मुलांपैकी अनेक मुले उत्तम क्रिकेट खेळत असायची. त्यांचा खेळ पाहून या मुलांसाठी काहीतरी करायला हवे, असा विचार पुंडीर यांच्या मनात आला. सीएफसीटी इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष बीएस पुंडीर यांनी एके दिवशी आपला मुलगा राजेश पुंडीर याच्यासोबत या मुलांना योग्य पद्धतीने क्रिकेट खेळण्यास शिकवण्याबाबत चर्चा केली. राजेश सांगतात, ʻआम्ही विचार केला की, या मुलांना खेळण्याकरिता क्रिकेट किट का देण्यात येऊ नये? त्यानंतर आम्ही याबाबतीत अजून काही लोकांशी चर्चा केली. ज्यात दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाचे (डीडीसीए) पंच एमपी नारंगदेखील सहभागी होते. या मुलांना फक्त क्रिकेट किट देऊन हा प्रश्न निकाली निघणार नव्हता, असे या लोकांच्या चर्चेअंती स्पष्ट झाले. या मुलांकरिता आम्हाला व्यवस्थित स्वरुपात क्रिकेट खेळवण्याची व्यवस्था करावी लागणार होती.ʼ याप्रकारे ʻस्लम क्रिकेट लीगʼच्या संकल्पनेचा जन्म झाला.

image


राजेश सांगतात की, ʻसर्वात पहिल्यांदा आम्ही दक्षिण दिल्लीतील वस्त्यांचे सर्वेक्षण केले आणि तेथील राहणाऱ्या गरीब मुलांच्या पालकांना आमची संकल्पना सांगितली. त्यानंतर एक-एक करुन अनेक लहान मुले आमच्याशी जोडली गेली. सर्वात पहिल्यांदा आम्ही दक्षिण दिल्लीतील १० वस्त्यांमध्ये राहणाऱ्या १२० मुलांचे दहा संघ तयार केले. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात आम्ही पहिल्या ʻस्लम क्रिकेट लीगʼचे आयोजन केले. या लीगमध्ये खेळणारी मुले पहिल्यांदाच संपूर्ण क्रिकेट किटसहित आणि मोठ्या मैदानात खेळत होती.ʼ डोक्यात हेल्मेट, पायावर पॅड बांधलेले आणि हातात ग्लव्हज घालून प्रत्येक मुलगा पहिल्यांदाच कोण्यातरी मोठ्या खेळाडूप्रमाणे मैदानात येत होता. १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकरिता आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये कुसुमपूर पहाडी स्लमची टीम मोगली इलेव्हनने मिक्की माऊस इलेव्हनचा पराभव करुन पहिले स्थान पटकावले होते. या स्पर्धेतील खेळाडूंना सामनावीर, सर्वश्रेष्ठ गोलंदाज आणि सर्वश्रेष्ठ फलंदाज, हे पुरस्कारदेखील देण्यात आले होते. एमपी नारंग या स्पर्धेचे निर्देशक आहेत. हिच स्पर्धा डिसेंबर महिन्यात उत्तर दिल्लीतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांकरिता आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पश्चिम, पूर्व आणि मध्य दिल्लीतील गरीब मुलांसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

image


राजेश यांच्या मते, ʻस्लम क्रिकेट लीगʼचा उद्देश्य वस्तीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना एक आश्वस्त आणि चांगल्या जीवनाचा मार्ग दाखविणे, हा आहे. जेणेकरुन ते नशा आणि गुन्हेगारीच्या मार्गावर जाणार नाहीत. आपल्या जीवनाची किंमत समजतील. बाल मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, वस्त्यांमध्ये राहणारी गरीब मुले बऱ्याचदा नशा आणि गुन्हेगारीच्या मार्गाने जातात. अशा परिस्थितीत त्यांच्यात आत्मविश्वासदेखील कमी होतो. त्यांच्याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्याने ते काहीतरी मिळवण्याचे स्वप्न पाहू लागतात. एका चांगल्या भविष्याची अपेक्षा करू लागतात. 

image


राजेश सांगतात की, ʻजी मुले या स्पर्धेत उत्तम खेळतील, त्यांना आम्ही ʻस्लम क्रिकेट अकादमीʼमध्ये मोफत प्रशिक्षण देणार आहोत. आमच्या अकादमीतील काही मुले राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावीत आणि आपल्यासारख्या अनेक मुलांकरिता प्रेरणास्त्रोत बनावीत, अशी आम्हाला अपेक्षा आहे.ʼ लीगनंतर अनेक मुलांनी सांगितले की, या स्पर्धेत सहभागी झाल्याने त्यांच्या विचारात बदल झाला. जीवनाबद्दल त्यांचे विचार सकारात्मक झाले आहेत. एका मुलाने सांगितले की, आता मला आयुष्यात काहीतरी भव्य करायचे आहे. समाज आता माझ्यासारख्या मुलांचा विचार करतो. यापूर्वी समाजाला गरीब मुलांबद्दल काही भावना नसतात, असे मला वाटायचे.

लेखक - सौरव रॉय

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags