संपादने
Marathi

लोकल दादरला थांबली, डॉक्टरांसोबतच सहप्रवाश्यांनी महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्यास मदत केली!

Team YS Marathi
7th Mar 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

बावीस वर्षांच्या महिला सुल्ताना खातून यांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतानाच आंबिवली ते सायन रुग्णालयाच्या दरम्यान प्रसव वेदना सुरू झाल्या. तेंव्हा रात्रीचे दहा वाजून पंधरा मिनिटे झाली होती, आणि ट्रेन ३० मिनिटे दादर स्थानकावरच थांबली होती. डॉक्टरांना ट्रेनमध्येच पाचारण करण्यात आले आणि सुल्ताना यांनी छोट्या मुलीला जन्म दिला! 


Image Source: Mid Da

Image Source: Mid Da


सुल्ताना यांच्या पोटातून कळा येवू लागल्या, आणि त्या सायन येथील नायर रूग्णालयात जायला सीएसटी लोकलने निघाल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या सासू आणि पति देखील होते. ज्यावेळी ट्रेन ठाण्याला आली त्यांचा त्रास वाढला, मात्र त्यांनी तो सहन करत राहण्याचा प्रयत्न केला तोवर दादर स्थानक आले होते. त्यावेळी वेदनांमुळे त्यांना उभे राहणे देखील अशक्य झाले. त्यावेळी त्यांचे पति मोहमद इर्शाद यांनी घाबरून मदतीसाठी आरडाओरड केली, त्यावेळी ट्रेनमध्ये असलेल्या सहप्रवाश्यानी धावून जात त्यांना मदत केली. या प्रसंगा बद्दल बोलताना इर्शाद म्हणाले की, “ माझ्या पत्नीला बाळंतपणासाठी पाच मार्च तारीख सांगण्यात आली होती. मात्र तिला १ मार्च रोजी दुपारीच प्रसव वेदना सुरू झाल्या. ज्यावेळी आम्ही ट्रेन मधून ठाण्याला पोहोचलो, कळा येवू लागल्या आणि आम्ही दादरला पोहोचेपर्यंत तिच्या कळा असह्य झाल्या होत्या. मी सोबतच्या काही महिला प्रवाश्यांना विनंती केली आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मदतीची याचना केली त्यांनी गाडीची साखळी ओढली आणि गाडी थांबविली. दादर स्थानकावर आलेल्या डॉक्टरांनी माझ्या पत्नीचे बाळंतपण केले आणि तिने मुलीला जन्म दिला. ट्रेन ३० मिनिटे थांबली होती. त्यानंतर आरपीएफ च्या अधिका-यांनीच आम्हाला सायन रूग्णालयात पोहोचविले. माझी पत्नी आणि नवजात मुलगी छान आहेत.”

अपंगासाठी राखीव असलेल्या बोगीत ज्यावेळी प्रसव वेदना सुरू झाल्या, आणि गाडी का थांबविली म्हणून कुणी तक्रार केली नाही किंवा हंगामा केला नाही कारण तीस मिनिटे गाडीला उशीर झाला होता. आरपीएफचे निरिक्षक सतीश मेनन म्हणाले की, “ ही घटना फलाट क्रमांक तीनवर झाली, आणि आमच्या कर्मचा-यांनी हा प्रसंग योग्य पध्दतीने हाताळला. आम्ही महिला प्रवाश्यांची मदत घेतली आणि डॉक्टरांनाही पाचारण केले”.

या सा-या संभ्रमात सुल्ताना यांचे पति त्यांच्यासोबत असलेल्या आईला विसरून गेले आणि त्या फलाटावरच राहिल्या. त्यांना रूग्णालयात गेल्यावरच त्याबाबत लक्षात आले आणि ते पुन्हा दादर स्थानकात त्यांना घ्यायला आले. ज्यावेळी सारेजण त्यांच्या धावपळीच्या जीवनात व्यस्त असतात, हे देखील लक्षणिय आणि दखल घेण्यासारखे आहे की, गरजू माणसाला मदत करण्यासाठी सारे काही काळ स्वत:ला झोकून देतात.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags