संपादने
Marathi

केवळ एका रुपयात मुलांना शिक्षण आणि कारकीर्द घडविण्यात व्यावसायिकांची मदत, शिक्षणाबाबत भानुप्रिया यांचे आगळे वेगळे विचार!

Team YS Marathi
20th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एमबीएची पदवी प्राप्त करून भानुप्रिया चांगल्या कंपनीत नोकरी करू शकल्या असत्या आणि आरामाचे जीवन व्यतीत करू शकल्या असत्या. मात्र, अन्य लोकांप्रमाणे भानुप्रिया यांनी हे स्वप्न कधी पहिलेच नाही. त्यांचे स्वप्न तर देशाचे भविष्य घडविण्याचे आणि घरा-घरात शिक्षणाचा प्रसार करण्याचे होते. मात्र, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भानुप्रिया यांच्याकडे इतके पैसे नव्हते की, त्या स्वतःच्या बळावर शाळा उघडतील आणि मुलांना मोफत शिक्षण देतील. परंतु म्हणतात नं.. इच्छा जर मनापासून असेल तर, रस्ता सापडतोच. या सर्व समस्येनंतरही त्यांनी हार मानली नाही आणि २००१मध्ये ‘भारती संग्रहिता’ची सुरुवात केली. सर्वात पहिले त्यांनी वीस व्यावसायिकांचा एक गट तयार केला आणि मुलांना साक्षर करण्याचे काम सुरु केले. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातून येणारे व्यावसायिक, वेळात वेळ काढून या मुलांचे मार्गदर्शन करतात आणि भानुप्रिया यांच्या चांगल्या कामात मदत करतात.

लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याचा विचार

image


जोधपुर येथील ब्रम्हकुमारी येथे राहणा-या भानुप्रिया शिक्षणात सदैव अव्वल होत्या. शाळेत नेहमी ८५ ते ९०टक्क्यांनी त्या उत्तीर्ण होत असत. जोधपुर मधील सर्वात प्रसिद्ध महाविद्यालय, लाछू कॉलेज ऑफ सायन्स एंड टेक्नोलॉजी मधून बीएससी केल्यानंतर त्यांनी एक वर्षाचा डिप्लोमा इन मल्टीमिडीया केले. त्यानंतर एमबीए केले. त्यानंतर जोधपुर इंस्टिट्यूट ऑफ़ एक्सपोर्ट एंड शिपिंग मॅनेजमेंट मधून डिप्लोमा इन एक्सपोर्ट एंड इम्पोर्ट केले. शिक्षणाची आवड असणा-या भानुप्रिया यांना लहानपणापासूनच प्रसिद्ध लोकांच्या संघर्षाची कहाणी वाचण्याची आवड होती. ही आवड त्यांची प्रेरणा बनली. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे विचार आणि आवड असणा-या भानुप्रिया एके दिवशी आपल्या शिक्षिकेसोबत याच सर्व गोष्टींवर चर्चा करत होत्या. त्यादरम्यान त्यांनी एक योजना आखली, जी मुलांच्या शिक्षण आणि विकासासाठी समर्पित असेल आणि असाच जन्म झाला भारती संग्रहिताचा.

image


भारती संग्रहिताची स्थापना

विद्येची देवता सरस्वतीकडून ज्ञान आणि बुद्धी संग्रहित करण्याच्या उद्देशाने योजनेचे नाव भारती संग्रहिता ठेवण्यात आले. मात्र, योजना सुरु करण्यासाठी मनौधैर्य आणि मार्गदर्शन पाहिजे होते आणि त्यात साथ मिळाली त्यांची शिक्षिका सारिका ओझा यांची. ज्या केवळ गुरु नव्हे, तर त्यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शक देखील आहेत. सारिका संगीत आणि संस्कृत मध्ये एमए आहेत आणि त्यांनी बी एड देखील केले आहे. सरकारी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्या न थकता आणि कुठलेही आर्थिक मदत न घेता भारती संग्रहिताच्या मुलांना साक्षर करत आहेत. सारिका यांना सर्वश्रेष्ठ सम्मान देखील मिळाला आहे. भानुप्रिया जेव्हा आठवीत शिकत होत्या, तेव्हापासून त्या सारिका यांच्याकडून संगीत शिकत आहेत. त्यांच्या भजनाची सीडी विकून जे पैसे येतात, ते संस्थेच्या कामात खर्च केले जातात. भानुप्रिया यांच्या सारखेच विचार ठेवणा-या लोकांचा एक गट आहे, ज्यात सी.ए, डॉक्टर्स, इंजिनियर आणि वैज्ञानिक आहेत, जे आपआपल्या कार्यक्षेत्राचे अनुभव मुलांना सांगतात आणि त्यांना प्रशिक्षित करतात. 

image


युवर स्टोरी सोबत संवाद साधताना भानुप्रिया यांनी सांगितले की,

“सर्वात पहिले ११ विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला. आज येथे एकूण १०१ विद्यार्थी आहेत. फेब्रुवारी २०१२मध्ये आम्ही नवे केंद्र स्थापना केले. येथे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धात्मक परीक्षा आणि वेगवेगळ्या विषयांसोबत विभिन्न कार्यक्षेत्राची माहिती दिली जाते. त्याव्यतिरिक्त इंग्रजी बोलणे, व्यक्तिमत्व विकास, विज्ञान, कला आणि संगणकाचे देखील शिक्षण दिले जाते. व्यावसायिक डॉक्टर्स, इंजिनियर, वैज्ञानिक या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतात. मुलांना शैक्षणिक सहलीवर देखील नेले जाते आणि गरीब मुलांना आर्थिक मदत देखील केली जाते.”

भारती संग्रहितामध्ये मुलांच्या संपूर्ण विकासाकडे लक्ष दिले जाते. प्रत्येक महिन्यात विभिन्न क्षेत्राशी संलग्न स्पर्धात्मक परीक्षा आयोजित केल्या जातात. वीस व्यावसायिक निस्वार्थ मनाने मुलांना प्रशिक्षित करतात आणि शिक्षणात त्यांची मदत करतात. मुलांना विज्ञानाचे प्रकल्प आणि नमुने बनविणे शिकवितात. २०११पासून निरंतर ही संस्था मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे. पहिले जोधपुरच्या चांदपोल मध्ये योजनेची सुरुवात झाली आणि सरदारपुरा मध्ये त्याची दुसरी शाखा देखील उघडण्यात आली आहे... 

image


भानुप्रिया सांगतात की,“एक एमबीए व्यक्ती नेहमीच फायद्याचा विचार करतो... मी देखील हाच विचार केला की, मुलांना फायदा कसा होईल. देशाचा फायदा कसा होईल. माझी योजना देशातील प्रत्येक मुलाला शिक्षित करण्याची आहे. प्रत्येक शहरात भारती संग्रहिता असो, कारण कुठलाही योग्य विद्यार्थी पैशाच्या कमतरतेमुळे मागे पडणार नाही. संस्कारी आणि शिक्षित मुले चांगल्या समाजाची निर्मिती करतात आणि राष्ट्राच्या हितासाठी मदत करतात. त्यामुळे आपल्याला पद आणि पैसा त्याहून पुढे जाऊन विचार केला पाहिजे.”

भारती संग्रहितासाठी पैशांची व्यवस्था

‘रेज़ हैण्ड टू हेल्प’ मार्फत संस्थेसाठी अनुदान गोळा केले जाते. भारती संग्रहिताकडून छापील पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या आर्ट–वर्कला विकून देखील संस्थेसाठी निधी जमा केला जातो. भानुप्रिया स्वतः एक गायिका देखील आहेत आणि त्यांच्या भजनाची आणि गाण्यांची सीडी विकून जो पैसा येतो, तो मुलांच्या विकासासाठी खर्च केला जातो. या कामात शाळेतील मुलेदेखील भानुप्रिया यांची मदत करतात. ‘रन फॉर ओंन’ला आपल्या संस्थेचा उद्देश बनविणा-या भानुप्रिया मानतात की, जीवनात नेहमीच अव्वल राहण्याची आवड असली पाहिजे, त्यामुळे त्यांनी मुलांना शिक्षित करण्यासाठी शाळेचे शुल्क एक रुपया ठेवले आहे, जे मुले आपल्या पॉकेटमनी मधून देतात. आज मुलांना आपल्या या शिक्षिकेवर अभिमान आहे. 

image


सुरुवातीच्या समस्या

जेव्हा भानुप्रिया यांनी या आगळ्या वेगळ्या शाळेची सुरुवात केली तेव्हा, त्या भागातील रहिवाशांचे वेगळेच विचार होते. भानुप्रिया सांगतात की, “सुरुवातीला लोक म्हणत असत की, माझ्यासारखी मुलगी इतकी मोठी चूक कशी करू शकते. हिने आपली कारकीर्द खराब केली. आम्ही आमच्या मुलांना कधीच असे करू देणार नाही, लोक समजवायचे की, काहीतरी असे कर ज्यामध्ये पद मिळेल, पैसा असेल. आज त्यांचीच मुले माझ्या शाळेत शिक्षण घेत आहेत आणि त्याहून अधिक आनंदाची बाब काय असेल, जेव्हा मुले तुम्हाला म्हणतील की.. वी आर प्राउड ऑफ यू टीचर”

या चांगल्या कामात भानुप्रिया यांना त्यांच्या कुटुंबियांची देखील साथ मिळाली आणि आई- वडिलांनी कधीच त्यांच्यासमोर आपल्या मजबुरीचे अश्रू आणले नाही. मित्रांची देखील पूर्ण साथ मिळाली आणि आज भानुप्रिया आणि त्यांचा गट१०१ मुलांचे भविष्य साकारण्यासाठी मेहनत घेत आहेत.. 

image


गरज का आहे?

आकड्यांवर नीट लक्ष दिले तर देशात अद्यापही जवळपास पन्नास टक्के मुले शाळेत जात नाहीत. पाच ते नऊ वर्षाच्या मुलांमध्ये जवळपास ५३टक्के मुली साक्षर नाहीत. जवळपास पन्नास टक्के मुले आणि ५८टक्के मुले तिसरी ते पाचवी दरम्यानच शाळा सोडतात. सरकारने २००१मध्ये सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली, ज्याच्या मार्फत ६ते १४वर्षांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद आहे. मात्र कागदावरील आकडे आणि प्रत्यक्षात अद्यापही खूप मोठा फरक आहे. अशातच भानुप्रिया यांची अनोखी शाळा एक उत्तम उदाहरण आहे, ज्यांनी आपल्या भागातील मुलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांना देशातील प्रत्येक शहरात अशी शाळा हवी आहे, जेथे पैशांपेक्षा अधिक शिक्षणाला महत्व असेल. सर्वाना प्रेरित करण्यासाठी त्यांच्या संस्थेचे एक गीत आहे, जे आम्हा सर्वाना पुढे वाढण्याची दिशा दाखवते..

हम चले ज़मी के पार, हवा के साथ, छू लें आसमा...

आँखों में ख़्वाब, होटों पे चाह, मंजिल के कदमों के, बड़े अरमां..

चलो चले साथ, ले हाथों में हाथ, मेहनत से पाएंगे अपना मुकाम..

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

‘डोरस्टेप स्कूल’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी शाळा, साक्षरतेला प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न! 

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया

गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजीचा वर्ग- डोंबिवलीतील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

लेखिका : शिखा चौहान

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags