संपादने
Marathi

तुमचे विचार आणि कल्पना शेअर करण्यासाठी उपयुक्त रेडी टू यूज प्लॅनिंग टेम्प्लेट ‘कॅन्वाझिफाय’

Team YS Marathi
13th Mar 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

दिवसेंदिवस टेक-सॅवी होत चाललेल्या जगात वेळ थोडा आहे आणि एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ कमी आहे. व्हाईट-बोर्ड घेऊन चर्चा करत बसायला इथे कुणालाच वेळ नाही किंवा कुणाचीच तशी प्रवृत्ती राहिलेली नाही. चर्चेची सविस्तर माहिती लिहिलेला कागदांचा गठ्ठाही नंतर वाचण्यासाठी बाजूला ठेवला जातो आणि त्यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने कल्पना आणि विचार अखेरीस कागदातच हरवून जातात. लोकांना आणि त्यांच्या कल्पनांना एकाच कागदावर एकत्र आणणे हे दिवसेंदिवस कठीण काम बनत चालले आहे. ३९ वर्षांच्या अभिजीत मेहत्रेला त्याच्या १२ वर्षांच्या कॉर्पोरेट करिअरमध्ये वारंवार हे लक्षात आले होते की आठवड्याच्या असाइनमेंट्स आणि केस स्टडीजला एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे आव्हानात्मक आहे. इथूनच त्याच्या मनात ‘कॅन्वाझिफाय’ची संकल्पना रुजायला सुरुवात झाली.


image


टीमच्या कल्पनांसाठी कॅन्वाझिफाय ‘पिन्टरेस्ट’सारखे काम करते. हे एक सहयोगी व्यासपीठ आहे जे टीमला त्यांच्या कल्पना गोळा करायला, त्यावर चर्चा करायला आणि त्यावर कार्यवाही करायला मदत करते. हे साधे स्टीकी-नोट सारखे व्यासपीठ आहे जे क्विक स्टार्ट इनोव्हेशन टेम्प्लेटसकट येते. ज्यामुळे टीम्सना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करायला आणि माहितीपूर्ण निर्णय जलदगतीने घ्यायला मदत होते. कॅन्वाझिफाय टेम्प्लेट्स स्टार्टअप उद्योजक, प्रोडक्ट मॅनेजर्स आणि डिझाईन/इनोव्हेशन स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्ससाठी उपयोगाचे आहे.

अभिजीत सांगतो, “आयडिआ वॅलिडेशनपासून बिझनेस मॉडेल्सपर्यंत आणि प्रोडक्ट रोडमॅप्सपासून कॉम्पिटेटिव्ह ऍनालिसिसपर्यंत सारे काही कॅन्वाझिफाय एका छताखाली उपलब्ध करुन देते. कल्पना कॅन्वाझिफायमध्ये उतरविण्यासाठी आणि कॅन्वाझिफायमधून इतर टूल्समध्ये घेण्यासाठी क्रोम, ड्रॉपबॉक्स आणि ट्रेल्लोबरोबर आमचे एक्सटर्नल इन्टिग्रेशन आहे.”

अभिजीतने पुणे विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. त्याने टेक्नो मार्केटर, लार्ज स्केल प्रोग्रॅम मॅनेजर, स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट आणि अकाऊंट मॅनेजर म्हणून जगातील तीन खंडांमध्ये काम केले आहे. त्याने त्याच्या करिअरला एल ऍण्ड टीमध्ये सॉफ्टवेअर प्रॉग्रॅमर म्हणून भारतातून सुरुवात केली. जिथे त्याने पाल्म टॉप डिवायसेससाठी वायरलेस मोबाईल बँकिंग सिस्टीम उभारली. त्यानंतर तो युकेला गेला. तिथे त्याने आयएमएस हेल्थमध्ये टेक्नॉलॉजी कन्सल्टन्ट म्हणून काम केले. त्यानंतर ट्रॅव्हलर्स, मार्श, सिग्ना यासारख्या काही इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम केले. २०१२ मध्ये बॉस्टन विद्यापीठातून त्याने एक्झिक्युटिव्ह एमबीएची पदवी प्राप्त केली.

योग्य माणसे शोधणे हे प्रत्येक स्टार्टअपसमोरचे मोठे आव्हान असते. सुदैवाने अभिजीत अक्षय नहार आणि निकेत पुराणिक या दोघांना ओळखत होता. या तिघांनी मिळून एक चांगली टीम तयार केली.

हे तिघे एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. अक्षय आणि निकेत यांनी कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करण्याचा पर्याय न स्विकारता वेब प्रोजेक्ट्ससाठी काम करणारी आयटी सर्विसेस कंपनी सुरु केली. आज अक्षय कॅन्वाझिफायमध्ये बिझनेस डेव्हलपमेंटचा चीफ म्हणून काम पहातो. तर निकेत कॅन्वाझिफायच्या टेक्नोलॉजी विभागाचा चीफ आहे.

कॅन्वाझिफाय एपीआयबरोबर इन्टीग्रेट होण्याची लवचिकता प्रदान करणाऱ्या क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरवर उभारण्यात आले आहे. सध्या हे स्टार्टअप ५५हून अधिक शहरांना सेवा पुरविते. अभिजीतच्या सांगण्यानुसार कॅन्वाझिफायच्या व्यासपीठावर आजपर्यंत ३१ हजार कल्पनांबाबत चर्चा करण्यात आली आहे आणि याचे अधिकाधिक वापरकर्ते हे उद्योजक, प्रोडक्ट मॅनेजर्स, डिझाईन/ स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्ट्स आणि एज्युकेटर्स आहेत.

ब्लॉग लिंक्स, इमेजेस, डॉक्युमेंट्स आणि बऱ्याच कोलॅटरलवर कल्पना अधोरेखित करणे या स्टार्टअपमुळे शक्य झाले आहे. क्रोम प्लगइन आणि लवकरच येणाऱ्या मोबाईल ऍपचा वापर करुन याद्वारे वापरकर्ते कुठूनही आपल्या कल्पना मांडू किंवा टॅग करु शकतात. सुरक्षेची खातरजमा करुन घेण्यासाठी कॅन्वाझिफाय युजर्स डिवाईस आणि ऍमेझॉन क्लाऊडवरील सर्वर यांच्यादरम्यान डाटा ट्रान्सफर करते. हे एसएसएल एनस्क्रिप्टेड आहे.

“ड्रॉपबॉक्समधून डॉक्युमेंटेशन/ ईमेजेस सहजरित्या कॅन्वाझिफायमध्ये घेता येतात, ज्यामुळे त्याचा वापर सोपा झाला असून वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळत आहे. कॅन्वाझिफायमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या कल्पना पीडीएफ किंवा ट्रेलोसारख्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये एक्सपोर्ट करता येतात. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, वापरकर्ते त्यांच्या कल्पना कॅन्वाझिफायमध्ये मांडू शकतात, त्यामध्ये इम्पोर्ट करु शकतात किंवा पुढच्या प्रक्रियेसाठी इतर टुल्समध्ये एक्सपोर्ट करु शकतात. टीमच्या कल्पनेसाठी कॅन्वाझिफाय एका हबप्रमाणे काम करते,” असं अभिजीत सांगतो.

सध्या पुण्याबाहेर स्थित असेलेल्या या स्टार्टअपच्या टीममध्ये पाच सदस्य आहेत. शिवाय, कॅन्वाझिफाय टीआयई पुणे आणि स्टार्टअप लीडरशीप प्रोग्रॅम, पुणेचा सल्लागार आहे.

प्रत्येक वापरकर्त्यासाठी पाच डॉलर यानुसार महिन्याभराच्या सबस्क्रिप्शनमधून कॅन्वाझिफाय वार्षिक महसूल निर्माण करते. दर महिन्याला या स्टार्टअपला २३ ते २५ टक्के नवीन वापरकर्ते मिळतात. अभिजीत सांगतो की आजवर कॅन्वाझिफायच्या मदतीने ३१,०००हून जास्त कल्पनांवर चर्चा झाली आहे आणि २.२६ लाख कल्पनांवर काम केले गेले आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. युजर बेसच्या भाषेत सांगायचे तर ४५-४८ टक्के वापरकर्ते भारतातील आहेत आणि ५२-५५ टक्के अमेरिका, ब्राझिल, कॅनडा, युके, स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, जर्मनी, तुर्की, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, स्विडन आणि पोर्तुगालमधील आहेत.

तो सांगतो, “आम्ही बाहेरुन आर्थिक मदत न घेता स्वतःच्या जोरावर उभा केलेला हा उपक्रम आहे. आम्ही बाहेरुन निधी उभा करुन आमच्या जागतिक अस्तित्वाला चालना देण्याचा विचार करत आहोत.”

सासवर आधारित टास्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, वर्कफोर्स टास्क मॅनेजमेंट, क्लाऊडवर आधारलेले कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरच्या उदयाच्या दृष्टीने पाहिल्यास भारतीय बाजार वाढत असल्याचे दिसते.

मार्केट्स ऍण्ड मार्केट्सने अंदाज वर्तविला आहे की २०१९ मध्ये एन्टरप्राइज कोलॅबोरेशन मार्केट ७०.६१ अब्ज डॉलरने वाढेल. भौगोलिक दृष्ट्या उत्तर अमेरिका आणि युरोप वार्षिक महसूलाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे बाजार असतील अशी अपेक्षा आहे. तर या अंदाज कालावधीत एशिया-पॅसिफिक (APAC) आणि युरोपमध्ये मार्केट ट्रॅक्शनची वाढ अनुभवायला मिळणे अपेक्षित आहे. अभिजीत म्हणतो की कॅन्वाझिफायची स्लॅक, ट्रेल्लो, असाना आणि इतर अनेक कम्युनिकेशन आणि टास्क मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म्सशी चुकीने तुलना केली जाते. प्रत्यक्षात उतरवता येण्याजोग्या कल्पनांना ट्रेल्लो आणि जीरासारख्या टूल्समध्ये घेण्याची सुविधा कॅन्वाझिफायमध्ये उपलब्ध आहे. हे स्टार्टअप आयडिआस्केल, मुरल डॉट ली, स्पिगिट आणि माईंड मिइस्टर यासारख्या जागतिक कंपन्यांच्या स्पर्धेत आहे. आता, टेक्नॉलॉजी सक्षम सहयोगी व्यासपीठाच्या दिशेने अमेरिका आणि युरोपचा वाढता कल पाहून तिथे आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची कॅन्वाझिफायची योजना आहे.


लेखिका : अपराजिता चौधरी

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags