संपादने
Marathi

तुमच्या दिवाणखान्याच्या खिडकीत ऑक्सिजनची मात्रा निर्माण करणारी रोपे लावाल तर आरोग्याला मोठा फायदा होईल

व्यावसायिकतेच्या पलिकडे सामाजिक बांधिलकी ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी तीस वर्षांची अविरत तपस्या करणारे कमल मित्तल!

Nandini Wankhade Patil
3rd Aug 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशात १९८६मध्ये कमल मित्तल यांनी सफरचंदांच्या वाहतूकीसाठी बॉक्स तयार करण्यासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी 'सेव्ह दि ट्रिज' संघटना स्थापन केली. ज्यावेळी त्यांना हे समजले की एक एकर मधील सफरचंद वाहून नेण्यासाठी दोन एकर मधील झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. त्यांनी न्यूझीलंडमधील सफरचंद उत्पादकांना संपर्क केला आणि सफरचंद वाहतुकीसाठी फेरवापरातील कागद आणि फायबर यांच्यापासून टिकाऊ बॉक्स तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले त्यातून एका बॉक्स करिता एक क्युबिक फूट लाकडाची बचत होणार होती. यातून १९८६मध्येच शंभर दशलक्ष झाडे वाचविण्यात आली. त्यांचे कोरगेटेड बॉक्स इतके लोकप्रिय झाले की ते नंतर आंबे, संत्री, द्राक्ष तसेच चेरीची वाहतूकही केली जाऊ लागली.

image


त्यांनी दिल्लीत आणखी एक अभियानही चालविले, सेव्ह टू व्हिलर पलुटिंग दिल्ली (स्टॉप). दुचाकीपासून शहरात होणारे प्रदुषण थांबविण्यासाठी त्यांनी तीन लाख दुचाकीस्वारांची माहिती घेतली असता असे दिसून आले की, बहुतांश लोक चुकीचे इंजिन ऑइल वापरत होते. दुचाकीसाठी तयार केलेल्या टू-स्ट्रोक वंगणा ऐवजी ते अवजड वाहनांसाठी असलेले वंगण वापरत होते इतकेच नाहीतर त्यांना असे वाटत होते की, जास्त वंगण वापरणे योग्यच असते. फ्लेक्झीबल पॅकिंग हा त्यांचा एक व्यवसाय होता ज्यामध्ये वंगण तेलाच्या पॅकिंगसाठी पुन्हा वापर करता येण्याजोगे पाऊच तयार केले जात होते. हे माहिती असूनही की त्याने त्यांचाच उद्योग अडचणीत येईल, त्यांनी दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल केल्या. ज्या नंतर सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेल्या. त्यात पेट्रोल कंपन्यांना असे आदेश देण्यात आले होते की, त्यांनी विशेष पंप तयार करून संमिश्र इंधन द्यावे ज्यातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. शेवटी त्याबाबतचा कायदा देखील मंजूर झाला आणि त्यांच्या कंपनीला प्रतिमहिना २०हजार पाऊचचे नुकसानही झाले.

image


१९९०मध्ये कमल यांच्या असे लक्षात आले की, इंधनात बेंझीनचा वापर पूरक म्हणून केला जात आहे. ज्याच्यामुळे ल्युकेमिया सारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यांनी वाहतूक पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली ज्यांनी वेळोवेळी अशा घटना उघडकीस आणल्या. गॅसोलिन मध्ये बेंझीनची मात्र पाच टक्के वरून एक टक्के पर्यंत कमी करावी यांसाठी त्यांनी लोक चळवळ सुरू केली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयात घेण्यात आली आणि त्यांनी त्याबाबतचे आदेश पारित केले.

image


पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या आणि लढा दिला. कमल यांनी दिल्लीच्या नेहरूपार्क येथे जैव वैविध्य उद्यानाची निर्मिती केली जेथे आधी बेकायदा झोपड्यांचा वेढा होता. त्यांनी त्यांच्यासाठी पर्यायी घरांची व्यवस्था केली सुमारे शंभर ट्रक घाण ढिगारे काढले आणि दोन हजार झाडे लावून उद्यान तयार केले त्यामुळे हा भाग हरितपट्टा म्हणून नावारुपास आला. १९ ९६मध्ये त्यांच्या पहारपूर व्यावसायिक केंद्राचा एमसीडी सोबत करार झाला आणि या उद्यानाच्या भविष्याची जबाबदारी सोपविली.

image


अशक्याला शक्य करून दाखविणा-या कमल मित्तल यांची कहाणी पाहिली तर लक्षात येते की तीस वर्षापूर्वी त्यांना दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाचे वावडे(ऍलर्जी) होते. पहारपूर व्यावसायिक केंद्राचे(पीसीबी) मुख्य कार्यकारी म्हणून काम करताना त्यांची फुफ्फुसे निकामी झाली होती. दिल्लीच्या प्रदूषणाची पातळी पाहता डॉक्टरांनी त्यांना शहर सोडुन जाण्याचा सल्ला दिला जे त्यांचे बालपणापासूनचे शहर होते. त्यामुळे त्यांना ही किती मोठी आपत्ती आहे आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर तिचा कसा रोज आघात होतो आहे हे जाणवले.पण त्यांनी या समस्येपासून दूर न जाता तिच्यावरील उपाय योजना शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेऴी ते दिल्ली आयआयटीचे सदस्य होते. स्वत:च्या संशोधनाला आयआयटीच्या चमूच्या संशोधनाची जोड देत त्यांनी हवेच्या प्रदुषणाचा स्तर कमी करण्याचे उपाय शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी घरोघरी विशिष्ट झाडे लावण्याची चळवळ सुरू झाली जी त्यांनी स्वत: पासून सुरू केली. पण अनेक ठिकाणी इमारतीच्या बाजूला झाडे लावणे लोकांची इच्छा असूनही शक्य नव्हते. त्यामुळे याबाबत लोकांना या मोहिमांच्या आत्मीय आणि पवित्रतेच्या बाजूने समजावून देण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यांनतर त्या़ंनी ही कल्पना बांधकाम व्यावसायिकांना पटवून देण्याचे ठरविले. ज्यातून स्वच्छ हिरवा परिसर आणि उर्जेची बचत अशा संकल्पना समोर आल्या. पर्यावरण प्रेमी म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयातही याबाबतचे प्रयोग सुरूच ठेवले होते. 

image


१९९०मध्ये सुरू केलेल्या या कामाची गेली दोन दशके ते वाटचाल करत आहेत. व्यावसायिक आणि रहिवाशी इमारती उभारताना पर्यावरणाबाबतच्या जागरूकतेचा कसा विचार करता येतो ते सांगण्याचा ते प्रयत्न करतात. पीसीबीच्या माध्यमातून त्यांनी ग्रीन बिल्डींग ही संकल्पना राबविली आहे ज्यामध्ये या इमारतीचा वापर करणाऱ्यांना चांगली शुध्द हवा मिळेल त्यातून त्यांची उत्पादकता वाढेल आणि आरोग्य चांगले राहिल्याने प्रगती साधता येईल. शाळा-महाविद्यालयातून पीबीसी या बाबतच्या जनजागरणाचे कार्यक्रम नियमित घेते, त्यातून कौशल्य आणि जॉब ट्रेनिंग देऊन रोजगाराच्या संधी देखील पीसीबीत दिल्या जातात. कमल यांनी २००९ मध्ये अमेरिकेतल्या एका भाषणात शुध्द हवा कशी वाढवाल याबाबत मार्गदर्शन केले तेच शब्द ते उधृत करतात, “ तुमच्या दिवाणखान्यात किंवा शयनकक्षाच्या खिडकीत मनी प्लांट किंवा शोभिवंत झाडे लावण्या ऐवजी ऑक्सिजनची मात्रा निर्माण करणारी रोपे लावाल तर त्याचा फायदा तुमच्यासोबत सर्वानाच होईल”. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक कराAdd to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags