संपादने
Marathi

दिल्लीतल्या डिजिटल अॅनालिटीक्स स्टार्टअप ‘प्रोफेसीने’ जमवलेत ३ कोटी ४३ लाख रुपये

Team YS Marathi
21st Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

दिल्लीतल्या सांख्यिकी विश्लेषक (डिजिटल अॅनालिटीक्स) स्टार्टअप ‘प्रोफेसीने’ (Profesee)३ कोटी ४३ लाख रुपये जमवलेत. इंडियन एंजल नेटवर्क (IAN), आणि स्टॅनफॉर्ड एंजल्स अण्ड आंत्रप्रिनर (SA & E India) यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेतल्या एंजल फेरीमधून त्यांनी ही रक्कम मिळवली. जुलैमध्ये SA & E India च्या कामाला सुरूवात झाल्यावर त्यांची ही पहिलीच गुंतवणूक आहे.

औद्यागिक क्षेत्राशी संबंधित सखोल विश्लेषण, मोड्यूल्स, सूचक अल्गोरिदम आणि माहिती प्रसारित करण्याकरता या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.


image


याच्या पुढच्या टप्प्यात आर एम एस रिस्क मॅनेजमेंट सोल्युशनचे कार्यकारी संचालक अजय लवकारे प्रोफेसीच्या मंडळावर (बोर्ड) संचालक म्हणून दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत मिस मालिनी मिडीया चे सीएक्सओ आणि गुंतवणूकदार सुजल शाह हे देखील काम करणार आहेत. या कंपनीचे मुख्य गुंतवणूकदार अजय लवकारे, बिक्की खोसला आणि सत्वीर ठकराल हे आहेत.

प्रोफेसी हे एक सर्व्हिस सॉफ्टवेअर (SaaS) आहे. ही सेवा सखोल माहिती पुरवून व्यवस्थापकांना तुलनात्मक अभ्यास करून सांख्यिकी विश्लेषण करायला मदत करते. यामुळे थेट अंमलबजावणी होऊन ब्रँड सक्षम व्हायला मदत होते.

२०१४ मध्ये ईशान सेठी, हर्षिल गुर्हा आणि जितेश लुथ्रा यांनी प्रोफेसीची सुरूवात केली. श्रोत्यांची ऐकून घेण्याची समज, समाज व्यवस्थापन क्षमता आणि ग्राहकांचं वागणं समजण्याच्या वेगवेगळ्या नवीन पद्धती शोधण्यावर प्रोफेसी काम करण्याचं योजित आहे.

गुंतवणुकीबद्दल बोलताना अजय लवकारे म्हणतात, “लघु आणि मध्यम व्यवसायांना वाजवी दरात सेवा पुरवणे. कंपन्यांना सक्षम बनवण्याकरता त्यांच्या सामाजिक/सांख्यिकी कामगिरीचं विश्लेषण करण्याचं प्रोफेसीचं ध्येय आहे. वेगाने प्रगती करण्याची त्यांची क्षमता आहे”. अजय आयएएन आणि एसए अण्ड ई या दोन्ही मध्ये कार्यरत आहेत. स्टॅनफोर्ड ने भारतात जुलैपासून कामाला सुरूवात केली. साधारण ६० उद्योजक आणि गुंतवणूकदार त्यांचे सदस्य आहेत.

एसए अण्ड ई भारतचे संस्थापक आणि अध्यक्ष पॉला मारीवाला या गुंतवणूकीबाबत बोलतात, “या गुंतवणुकीने स्टॅनफोर्ड एंजल्स चा सदस्य असल्यामुळे प्रोफेसीला सिलीकॉन व्हॅली आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात लाभ मिळणार आहे. स्पर्धेत नेहमीच पुढे राहण्याकरता नवनवीन तंत्रज्ञान, बिझनेस मॉडेल्स शोधायला आणि लायक उमेदवारांना त्यांच्याकडे आकर्षून घ्यायलाही मदत होणार आहे.”

स्टॅनफोर्ड एंजल्स नवनवीन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत राहणारच आहे. पण तंत्रज्ञानाशी सांगड घालणाऱ्या उद्योगांवर त्यांचा अधिक भर असणार आहे. मारिवाला सांगतात, “आमचं अस्तित्व दाखवण्याकरता आम्ही इतर एंजल ग्रुपसोबत वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणार आहोत.”

भारतात फेथ कनेक्शन, रॉक एन शॉप, एनडीटीव्ही च्या इंडियन रुटस्, मिस मालिनी आणि पीव्हीआर सिनेमा सोबतच काही राजकीय पक्षांसोबतही या कंपनीने काम केलयं.

लेखक : जय वर्धन

अनुवाद : साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags