संपादने
Marathi

'इनवोर्फिट' किंमत हिट, पर्यावरणासाठी फिट, गृहिणींमध्ये सुपरहिट

8th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

भारतामधल्या बहुतेक गावांमध्ये आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. अंधा-या स्वयपांकघरामध्ये चूल जळत असते. त्यामधून निघालेला धूर महिलांच्या फुफ्फुसामध्ये जात असतो. एनर्जी आणि रिसोर्ट इंस्टीट्यूट ( टेरी) या संस्थेनं नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालामध्ये ग्रामीण भागातली ऊर्जा केवळ विषमतेनं भरलेली नाही तर त्यामधून संक्रमणही पसरू शकते हे मांडण्यात आले आहे. घरगुती कामांसाठी लाकडाचा वापर करण्यामध्ये गोवा राज्याचा देशात पहिला क्रमांक आहे. इथे दर महिन्याला प्रत्येक घरांमध्ये १९७ किलो लाकूड इंधानाच्या स्वरुपात वापरले जाते. कर्नाटकामध्ये १९५ किलो लाकूड वापरले जाते. तर याची राष्ट्रीय सरासरी ११५ किलो आहे.

image


आपण भलेही प्रगतीच्या रस्त्यावर मार्गक्रमण करत आहोत. तरीही आजही अनेक जण जळणावर (बायोमास) अवलंबून आहेत. याचा केवळ आरोग्यावरच नाही तर पर्यावरणावरही अनिष्ट परिणाम होत आहे. पारंपारिक स्टोव्हमधून निघणारा ब्लॅक कार्बन आणि अर्धवट जळालेला लाकूड याच्या उत्सर्जनामुळे घरामध्ये वायू प्रदूषण ( आयएपी) आणि जलवायू परिवर्तनाचा वेग वाढतो.घरात होणारे वायू प्रदूषण हा जगभरात चिंतेचा विषय आहे. यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. घरगुती वायू प्रदूषणामूळे दरवर्षी ४.३ दशलक्ष लोकांचा जगभरात मृत्यू होतो. ही आकडेवारी एचआयव्ही, टीबी, मलेरिया यामुळे होणा-या मृत्यूच्या बरोबर आहे. असे असूनही आजही देशातले ६३ टक्के नागरिक स्वयपाक बायोमास म्हणजेच लाकूड आणि गायीचे शेण ( गोबर ) जाळूनच तयार करतात.

सरकार आणि वेगवेगळ्या संस्थांनी माती आणि बिना प्रमाणित चूलींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविले आहेत. पण यामध्ये त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. स्टोव्ह कसे चालवण्याचे प्रशिक्षण हे एक मुख्य आव्हान. कारण याचा वापर करणारी बहुसंख्य मंडळी हे निरक्षर आहेत. त्यांना हा स्टोव्ह चालवता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन २००७ साली ‘इनवोर्फिट’ ची स्थापना करण्यात आली. दुस-यांपेक्षा वेगळं काम करण्याचा या संस्थेचा हेतू होता. या प्रयोगाने स्वयपांकासाठी वापरल्या जाणा-या स्टोव्हच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवली. घरातल्या आवश्यक वस्तूंमध्ये याचाही समावेश झाला. या स्टोव्हची गुणवत्ता तसेच टिकावूपणा उत्तम होताच. त्याशिवाय याची किंमतही वाजवी असेल याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.

इनवोर्फिट व्यवस्थापकीय संचालक हरीश अंचन यांच्या मते....

कंपनीने केवळ घरगुती प्रदुषणावर लक्ष दिलेच. त्याचबरोबर याचा परिणाम समाजातल्या सर्वात खालच्या गटावर होणार असल्यानं या व्यापा-याचा फायदा ग्राहक आणि कर्मचारी दोघांनाही होईल याची खबरदारी घेतली. यामुळे जगातले कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली.

कंपनीने आपला पहिला पायलट प्रोजेक्ट कर्नाटकातल्या शिमोगामध्ये सुरु केला. यामध्ये घर तसेच वेगवेगळ्या संस्थांसाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोव्ह उपलब्ध करुन देण्यात आले. यामुळे स्वयंपाकाच्या वेळेत पूर्वीपेक्षा ५० टक्के बचत झालीच. त्याचबरोबर टॉक्सिकमध्ये ८० टक्के आणि इंधनामध्येही ६० टक्के बचत होऊ लागली. यामुळे लोकांचा स्वयंपाकामधला वेळ तर वाचलाच. त्याचबरोर जंगलातले लाकूडही कमी तोडले जाऊ लागले. तसेच स्वयपांकघरही पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ बनले.

इनवोर्फिट मंगला स्टोव्हमध्ये रॉकेट चेंबरच्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. ज्यामूळे उत्सर्जन कमी होते. हा स्टोव्ह स्टीलचा बनवण्यात आला आहे. ज्याला बाजारामध्ये मोठी मागणी होती. कंपनीने तब्बल सात लाख स्टोव्हची विक्री केली. २०१३ पर्यंत या स्टोव्हचे अनेक मॉडेल आले आहेत. या स्टोव्हमुळे इंधनाची बचत तर होतेच. त्याचबरोबर स्वयपांकही लवकर तयार होतो. विशेष म्हणजे हा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा स्टोव्ह आहे. हा पकडायला अतिशय हलका आहे. या स्टोव्हच्या चेंबरला खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे हा स्टोव्ह अनेक वर्ष काम करु शकतो. जास्त लोकांच्या स्वयपांकाची गरज भागवण्यासाठीही कंपनीने विशेष पद्धतीचा स्टोव्ह तयार केला आहे. ईएफआयई १०० एल हा १०० लिटर क्षमतेचा स्टोव्ह आहे. या स्टोव्हवर एकाच वेळी ३०० जणांचा स्वयपांक होऊ शकतो. शाळा, अनाथालय आणि वेगवेगळ्या संस्थांची गरज लक्षात घेऊन या स्टोव्हचे डिझाईन तयार करण्यात आले आहे.

इनवोर्फिट ग्राहकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. संध्या कंपनीच्या जवळपास साडे आठ लाख उत्पादनांची विक्री बाजारात होते. देशातल्या दुस-या राज्यांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना असल्याचं अंचन यांनी सांगितले. अन्य राज्यांमध्ये येणा-या आव्हानांचा सामना करण्यासाठी दुस-या कंपनींचीही मदत घेतली जाणार आहे. सामान्य व्यक्तींच्या आयुष्याप्रमाणेच सामाजिक क्षेत्रामध्ये परिणाम करणारा हा एक ठोस प्रयत्न आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपण पोहचू असा कंपनीच्या व्यवस्थापनाला विश्वास आहे. २०१८ -१९ पर्यंत एक अब्ज स्टोव्हची विक्री करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

यासारख्या आणखी नाविन्यपूर्ण कथा, यशोगाथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

वरीलप्रमाणे आणखी काही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

'एका क्लिकवर कचरा विका' आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांचा ‘स्क्रॅपक्रो’ उपक्रम

टाकाऊ लाकडातून टिकाऊ फर्निचरची निर्मिती : ट्रॉपिकल साल्वेज

कचऱ्यातून पैसानिर्मिती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘कचरेवाल्या वहिनी’

लेखक – हरीश बिश्त

अनुवाद – डी. ओंकार

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags