नूतन वर्षात स्थुलतेपासून सुटका ऋतू रानी यांचे अचूक उपाय

नूतन वर्षात स्थुलतेपासून सुटका 
ऋतू रानी यांचे अचूक उपाय

Thursday January 14, 2016,

3 min Read

स्थुलतेबद्दल काय सांगाल? स्थुलता ही काही प्रथा किंवा परंपरा नाही जी आपल्या देशाची राष्ट्रीय समस्या ठरू शकेल पण व्यस्त जीवनशैलीत आपण प्रत्येकाच्या तोंडी ऐकत असतो की मला पळायला जायचे आहे, जिमला जायचे आहे वैगरे वैगरे. स्थुलतेबाबत अनेक संशोधन सुरु आहे, बरेच निकष लावले जातात, बाजारात जाडी कमी करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. असेच काहीसे ऋतू रानी श्रीवास्तव यांच्या बाबतीत घडले आहे. ऋतूरानी यांचा व्यावसायिक जीवन प्रवास हा अतिशय शानदार आहे. त्या एका रेडीओ जॉकी च्या रुपात ९३.५ एफएम मध्ये कार्यक्रम प्रमुखापासून भारतीय एअरटेल च्या विपणन विभागापर्यंत काम करीत आहेत. आपल्या या व्यावसायिक जीवनाच्या व्यतिरिक्त त्यांचे खासगी जीवन अतिशय संवेदनशील परंतु काहीसे चिडचिडे आणि चिंताग्रस्त होते.

आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांचे वजन अचानक वाढायला लागले आणि याच कारणाने त्या मानसिक रूपाने आणखीच उद्विग्न झाल्या. त्यांच्या अनेक प्रयत्नांनी त्यांना पूर्वीचे शरीर सौष्ठव्य प्राप्त झाले. त्यांच्या आयुष्यातील हा सकारात्मक क्षण त्यांना भावला व त्यांना जाणवले की आपल्या सारख्या अजून कितीतरी लोकांना याचा फायदा होऊ शकेल. आपल्या शरीराचे चोचले पुरविण्यासाठी लागणाऱ्या औषधांवर लोकांचे बरेच पैसे खर्च होतात. ऋतू या विश्वासाने सांगतात की त्या वजन कमी करण्यासाठी प्रभावीपणे मदत करू शकतात. वरील घटकांना विचारात घेऊन वजन कमी करणारे चालत्या फिरत्या प्रशिक्षकाच्या रुपात ‘Obi No’ ही कंपनी उदयास आली.


image


या कंपनीचा शुभारंभ एक मोठे बॅनर ‘मन्ना हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड’ च्या अंतर्गत जानेवारी २०१२ मध्ये झाला. ‘Obi No’ हा एक मोबाईल प्रशिक्षक आहे जो विशेषकरून भारतीयांना एक सुरक्षित व स्वस्थ उपायांनी वजन कमी करण्यास मदत करतो. ऋतू आणि त्यांची टीम विश्वास देते की हा मोबाईल कोच सुद्धा तेवढाच परिणामकारक आहे जेवढे खासगी प्रशिक्षक आणि आहारतज्ञ मदत करतात. त्या सांगतात की, ‘आमच्याकडे काही प्रभावी उपाय आहेत जे विशेष तज्ञांसारखेच काम करतात जसे आहारा संबधी आठवण व त्याची योजना तयार करणे तसेच हे तत्कालीन व विश्वसनीय वेट लॉस कोच आहे जे सदैव आपल्या साथीने चालते.

अॅपची मुख्य विशेषता –

आहाराचे नियम :

या अॅप मध्ये आपल्या स्थानानुसार आहाराचा प्रस्ताव मांडला आहे जो आपल्या ग्राहकांना वजन कमी करणाऱ्या आपल्या ध्येयानुसार कमी कॅलारीच्या सीमेची बांधिलकी आखून देतो. हे अॅप तुम्हाला तुमच्या पर्यायात पण निर्णय देतो जसे तुमच्याजवळ मॅकडोनाल्ड मध्येच खाण्याचा पर्याय आहे तेव्हा हा अॅप तुम्हाला काय खाणे उपयुक्त आहे हे सुचवतो.

आहाराची योजना :-

या अॅपच्या माध्यमाने उपयोगकर्ता आपले वय, लिंग, निरोगीप्रमाण, जीवनशैली आणि आपल्या आवडीनुसार त्वरित ५-६ प्रकारच्या आहार योजना बनवू शकतो. उपयोगकर्ता sms किंवा email द्वारे या वेबसाईट वर आपल्या आहार योजनेचा पर्याय शोधू शकतो.

पाण्याचे स्मरण

कोणत्याही तक्रारीशिवाय हा अॅप आपल्याला पुरेशे व योग्य प्रमाणात पाणी पिण्याची आठवण करून देत राहील. ऋतू आत्मविश्वासाने सांगतात की, ‘Obi No वर्तमानात ‘Tie –IQ Bootcamp’ चा भाग आहे. या अॅपचा ५०% पेक्षा जास्त नियमितपणे मासिक लाभ घेत आहेत तर ७-१० % लोक त्याचा दैनिक वापर करीत आहेत. तसेच आमच्या या उत्पादनाचे निशुल्क मॉडेल पण आहे तरीही आम्ही चांगल्या संख्येने निशुल्क ग्राहकांना ३५० रुपये प्रतिमाह उपभोक्त्यात परिवर्तीत होतांना बघत आहोत’.

या अॅपने एक चांगली सुरुवात केली आहे आणि त्याचे उपभोक्ते हे स्पष्ट रुपात २८ ते ३६ वर्ष वयाचे भारतीय आहेत जे आपले वजन करण्यासाठी जागरूक आहेत. जिथे स्मार्टफोनने आपले अस्तित्व व्यापून टाकले आहे तिथे ‘Obi No’ या बाजारात पाय रोवण्याच्या दिशेने चांगली वाटचाल करीत आहे.

लेखक : प्रकाश भूषण सिंग

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close