त्रासदायक बालपणापासून भारतासाठी खेळण्यापर्यंत : सुरेश रैना एक कहाणी

त्रासदायक बालपणापासून भारतासाठी खेळण्यापर्यंत : सुरेश रैना एक कहाणी

Friday May 27, 2016,

3 min Read

अगदी आजसुध्दा सुरेश रैना यांना जमिनीवर झोपायला आवडते आणि पलंगावर नाही. याच प्रकारे ते लहानाचे मोठे झाले. एका वसतिगृहात घरच्या प्रेमळ वातावरणापासून दूर. जिथे रोजचा दिवस नवीन आव्हान होता. वरिष्ठाचा आणि ज्येष्ठांचा जाच आणि छळणूक तर इतकी होती की, सुरेशच्या मनात आत्महत्या करावी असे येत असे. दि इंडियन एक्सप्रेस मधील अलिकडच्या वृत्तानुसार अशा प्रकारच्या अनेक अन्यायांना सुरेश यांनी तोंड दिले आहे.

क्रिकेटच्या सामन्यासाठी प्रवास करताना दोन बर्थमधील रिकाम्या जागेत वृत्तपत्र हांथरून ते झोपले आहेत, त्यामुळे त्यांना गुदमरायलाही झाले आहे आणि डोळे उघडण्यापूर्वीच त्याच्या चेह-यावर डंख झाले. त्यांच्या छातीवर एक किटक होता आणि त्याने त्यांच्या चेह-यावर लघुशंका केली. खुप धावाधाव केल्यावर आणि मधल्या स्थानकात गाडी थांबल्यावर, सुरेश यांनी त्याला ओढून काढले. “ एक ठोसा मारला, आणि त्याला गाडी बाहेर फेकले” सुरेश त्यावेळी १३वर्षांचे होते आणि उत्तरप्रदेशातील लखनौच्या स्पोर्टस् हॉस्टेलमध्ये जागा मिळावी म्हणून संघर्षरत होते.

image


वसतिगृहातील मुले सुरेश यांच्याशी वाईट वर्तन करत. काही मुलांच्या वर्तनाची तर त्यांना भिती वाटे. ती ऍथलीट शाखेतील मुले होती. त्यांना असूया होती की ते क्रिकेट मनापासून खेळत होते त्यामुळे जीवनातही पुढे जात होते. “ त्यांना वसतिगृहातून प्रमाणपत्र देण्यात येणार होते. चार वर्षे घालवा, प्रमाणपत्र घ्या आणि रेल्वेत किंवा जिथे क्रीडापटूंना राखीव जागा असतील तेथे नोकरी मिळवा. वसतिगृहातील अतोनात केल्या जाणाऱ्या छळाला ते सामोरे जात होते. दुधात माशी फेकण्यात आली. “आम्ही ओढणीच्या कापडयाचे गाळणे करून ते गाळून पित असू”. थंडपाण्याची बादली अंगावर ओतली जात असे हाडे गोठविणा-या थंडीत पहाटे तीन वाजता. तुम्ही अश्यावेळी उठावे आणि त्यांना मारावे इतकाच पर्याय होता पण तसे करता येत नव्हते कारण ते पाचजण होते काय करणार, सुरेश म्हणाले. अखेर त्यांनी त्यांचे वसतिगृह सोडले. 

image


मुंबईहून बोलावणे आले एअर इंडियासाठी क्रिकेट खेळण्याचे – तो क्षण जेंव्हा त्यांना वाटले की आयुष्य बदलते आहे. “ युपीत राहिलो असतो तर संपलो असतो. लहान-मोठे सामने खेळून” एअर इंडियात आल्यावर प्रविण आमरे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि ब-याच काही गोष्टी घडू लागल्या. १९९९ मध्ये रैना यांना एअर इंडियात दहा हजारांची शिष्यवृत्ती मिळाली. “ त्यातील आठ हजार मी घरच्यांना पाठवत होतो.” एसटीडी कॉल घरी करण्यासाठी चार रुपये लागत, आणि दोन मिनिटे लगेच संपत मी फोन ठेऊन देत असे. त्यामुळे मला पैश्याचे मोल चांगलेच माहिती होते.” सुरेश सांगतात.

आयपीएल हा आणखी एक मैलाचा दगड त्यांच्या जीवनात आला. गुडघ्याच्या दुखापतीमधून बरे होण्यात त्यांचा मौल्यवान वेळ वाया गेला. “ तो खडतर काळ होता, मला माझी कारकिर्द संपण्याची भिती होती आणि माझ्यावर घरासाठीचे ८० लाखांचे कर्ज होते.”- पण त्यातूनही ते सावरले. एप्रिल २०१५ मध्ये प्रियांका चौधरी यांच्याशी त्यांनी विवाह केला. ऍमेस्टरडंम येथे त्या बँकेत आयटी व्यावसायिक आहेत. “ विवाहानंतर स्थैर्य आणि जबाबदारी दोन्ही आले. मी फक्त खेळत गेलो आणि खूप दूर निघून गेलो. आता मी करार फार काळजीपूर्वक पाहतो. मला माझा वेळ चांगल्याप्रकारे कसा देता येईल आणि भविष्याचे नियोजन करता येईल. तुम्हाला क्रिकेटरच्या जीवनाबद्दल माहितीच आहे, असे वाटते की काम खूप आहे वेळ कमी आहे. प्रियांका आणि सुरेश यांना नुकतेच पहिले अपत्य प्राप्त झाले, ते कन्यारत्न आहे.

    Share on
    close