संपादने
Marathi

अमीर खान यांचा दंगल ठरला चीनमध्ये हजार कोटी रूपये कमविणारा पहिला भारतीय सिनेमा!

Team YS Marathi
8th Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

फार मागचे नाही, भारतीय सिने जगत फोगाट कुटूंबियांच्या रंगात न्हावून निघाली होती, याचे कारण खेळाच्या प्रती असलेल्या समर्पित भावना. या सिनेमाने बॉक्सऑफिसचे सारे किर्तीमान मोडले. आता त्याने नवी उंची गाठली आहे. दंगलने चीन मध्ये आपल्या कमाईची दंगल उडवून देत चक्क हजार कोटी रूपयांची कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा म्हणून नवे किर्तीमान स्थापीत केले आहे. चीनच्या लोकप्रिय तिकीटींग संकेतस्थळानुसार असे वृत्त आहे.

या अहवालात असे देखील म्हटले आहे की असे होणे विरळाच आहे कारण चीनमध्ये विदेशी सिनेमांना विशिष्ट् मर्यादा आहेत, त्यात भारतासाठी फारच थोड्या संधी आहेत. या यशामुळे दंगल आता त्या ३० मात्तब्बर सिनेमाच्या पंक्तीत जावून पोहोचला आहे, ज्यांनी हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तिकीटींग प्लॅटफॉर्म मायोयान नुसार या सिनेमाने १०६७ दशलक्ष आरएमबी इतका व्यवसाय गुरूवार पर्यंत केला होता.


image


इतर विदेशी सिनेमांत, 'दि मेरमेड' हा चीन मधील सर्वाधिक लोकप्रिय ठरला (ज्याने ३हजार कोटींचा गल्ला जमा केला.) त्या खालोखाल मॉन्स्टर हंट, दि फेट ऑफ दी फ्यूरियस आणि फ्यूरियस ७. चीनी माध्यमे या सिनेमांच्या अभूतपूर्व यशाबद्दल लिहित आहेत, ज्याने चीनच्या पुरूष प्रधान संस्कृतीसमोर दंड थोपटले आहेत.

एका मुलाखती दरम्यान अमीर यांनी सांगितले की, या क्रीडाप्रधान सिनेमाच्या यशाने ते किती उत्साहित आहेत. “ आम्ही ज्यावेळी विचार करत होतो की चीनी लोकांशी दंगल सिनेमाच संवाद साधेल, फार जास्त काही स्वप्ने आम्ही पाहिली नव्हती केवळ आमचा संवाद या ठिकाणी पोहोचावा बस. हे सारेच अनपेक्षित झाले. आम्हाला सुखद धक्काच बसला.”


image


या आधी अमीर यांच्या मागच्या सिनेमातून पीके, ३- इडियटस, आणि धुम-३ चीनमध्ये चांगली कमाई झाली होती. दंगलला इतके जास्त यश मिळण्याच्या मागचे कारण चीनी लोकांना मानसिकदृष्ट्या या सिनेमाच्या कहाणीने प्रभावित केले, यातील पात्र आणि घटनांनी आपलेसे केले.

“त्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया वाचताना जाणवले, ते अशा गोष्टी बोलत होते की, या सिनेमाने त्यांच्या मनात काय बदल झाले. कसे यातील पात्रांनी त्यांना प्रेरित केले. मला जाणवले की त्यांच्या पालकांनी कशाप्रकारे कष्ट घेतले होते याचे त्यांनी वर्णन केले. त्यांच्या प्रतिक्रिया फार भावूक आहेत. यातूनच सिनेमाने योग्य ती कामगिरी केल्याचे जाणवते”.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags