संपादने
Marathi

ʻअर्बन लॅडरʼचे उपाध्यक्ष रजत उपाध्याय यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Ranjita Parab
1st Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

लहानपणापासून संगणकाची आवड असणारे बंगळूरुमधील रजत उपाध्याय कालांतराने ऑनलाईन फर्निचरची विक्रेती कंपनी ʻअर्बन लॅडरʼचे उपाध्यक्ष झाले. त्यांच्या आयुष्यातील हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी असून, युअरस्टोरीने त्यांच्या आयुष्याबाबत घेतलेला हा आढावा.

बंगळूरू येथे बालपण व्यतित केलेल्या रजत उपाध्याय यांना लहानपणीच संगणकाची ओढ लागली. आपल्या चुलत भावाच्या घरी संगणक पाहिल्यानंतर त्यांनी संगणकालाच आपले ध्येय बनविले. प्रत्येक आठवड्याला ते आपल्या चुलत भावाच्या घरी जायचे आणि संगणकावर नवनवीन प्रयोग करायचे, प्रोग्रामिंग शिकायचे. त्यांनी आपल्या शालेय जीवनातच बेसिक प्रोग्रामिंगचे शिक्षण घेतले होते. शिक्षणात अन्य पर्याय समोर ठेऊन त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र हे विषय निवडले होते.

२००१ साली अनेक सॉफ्टवेअर कंपन्या जागतिक मंदीचा सामना करत होत्या. त्या काळात रजत यांनी अभियांत्रिकी शिक्षणाकरिता एनआयटी सूरतकलची निवड केली. जागतिक मंदीचा फटका जरी अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांना बसला तरी रजत यांना मात्र ती फायदेशीर ठरली. कारण जागतिक मंदीपूर्वी कॉम्प्युटर सायन्स हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवडता विषय होता. मात्र मंदीमुळे विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयाला आपली पसंती दिली. त्यामुळे रजत यांना कॉम्प्युटर सायन्स या शाखेत प्रवेश मिळवताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. रजत यांचे महाविद्यालयीन आयुष्य चांगले गेले. महाविद्यालयात मिळणाऱा बराच वेळ त्यांनी सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ʻसी लॅंग्वेजʼ या विषयाचा अधिक अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि महाविद्यालयीन प्रोग्रामिंग स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केली. महाविद्यालयाच्या दुसऱ्याच वर्षात रजत यांनी स्वतःसाठी एक संगणक घेतला. त्यानंतर त्यांनी इंटर्नशीप म्हणून आपला पहिला प्रकल्प ट्रीजन्ट साॅल्युशन्स तयार केला. रजत यांना डाटा डिक्शनरी तयार कऱण्यासाठी लुकअप्सची गरज होती. पुस्तकी ज्ञानापेक्षा हा पूर्णतः वेगळा प्रकल्प होता. रजत सांगतात की, ʻमी जे शिकलो आहे, ते पूर्णतः वेगळे आहे. मी प्रयोग केले आहेत. त्यातून शिकलो आहे. तसेच प्रयोग यशस्वी होत आहेत की नाही, याची पडताळणी केली आहे. याप्रकारे मी काही गोष्टी नियंत्रणात आणू शकलो. त्याकाळी मला C++ ही कॉम्प्युटर लॅंग्वेज येत नव्हती. म्हणून मी स्वतःच त्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याचा वापर करुन मी कोड बनविण्यास शिकलो. हा अनुभव खूप वेगळा होता.ʼ

image


रजत अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षात असताना त्यांच्या महाविद्यालयाने एसीएम आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन प्रोग्रामिंग प्रतियोगितेत भाग घेतला होता. त्यांच्या महाविद्यालयातील अनेक संघ या प्रतियोगितेत सहभागी होण्यासाठी आतूर होते. मात्र महाविद्यालयातून फक्त एकाच संघाला या स्पर्धेकरिता पाठविण्यात येणार होते. त्यामुळे महाविद्यालयातच एक स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यात रजत यांचा संघ विजयी झाला. त्यांचा संघ एसीएम आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन प्रोग्रामिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सातव्या स्थानी राहिला. त्यानंतर रजत यांनी टॉपकोडरमध्ये प्रयत्न करुन पाहिले. मात्र त्यात ते लिंक तयार करू शकले नाहीत. रजत सांगतात की, ʻमाझ्या प्रकल्पाच्या दृष्टीकोनातून एक मोठी प्रणाली निर्माण करणे, एक चांगला अनुभव होता. उपभोक्त्याच्या दृष्टीकोनातून मला एक कठीण प्रणाली सहजसोपे बनविण्याचे आव्हान पसंत होते.ʼ, असे ते सांगतात.

रजत संशोधक वृत्तीचे प्रयोगशील असे व्यक्तिमत्व आहे. वारंवार प्रयोग करून त्यांनी एक बजर सिस्टम आणि इमेज प्रोसेसिंग एप्लिकेशनदेखील तयार केले होते. स्पर्धेच्या युगात त्यांनी बुद्धीबळाचा एक खेळ C++ मध्ये तयार केला.

महाविद्यालयीन कालावधीत रजत यांनी याहूसोबत इंटर्नशीपदेखील केली. आपल्या महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षात त्यांनी रेडहॅट शिष्यवृत्ती स्पर्धेत लिनक्ससाठी एक डेक्सटॉप सर्च टूल बनविण्यास सुरुवात केली. यात त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. मात्र बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. पहिल्यांदाच रजत यांनी कम्प्लीट सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट लाइफ सायकलवर काम केले.

प्लेसमेंटच्या वेळेस रजत यांनी तीन-चार मुलाखती दिल्या होत्या. रजत यांनी अखेरीस नोवेल्ल या कंपनीसोबत काम करण्यास पसंती दिली. नोवेल्ल कंपनी ही त्याकाळी नेटवेयरमधून ओपन सोर्समध्ये येत होती. नोवेल्लसोबत काम करताना रजत यांनी नेटवेयरमध्ये एफटीपी प्रोटोक़ॉलवर काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते प्युअर-एफटीपीडी (Pure-FTPd) वर काम करू लागले. याशिवाय रजत यांनी नेटवेयर आणि लिनक्सकरिता एनएफइसवी४ च्या स्टोरेज फाईल सिस्टमवरदेखील काम केले दोन वर्ष नोवेल्ल येथे काम केल्यानंतर रजत उच्च शिक्षणाकरिता ऑहियो स्टेट विद्यापीठात गेले. जेथे त्यांनी डाटा व्हिज्युअलायझेशन आणि इमेज प्रोसेसिंगबाबत अधिक शिक्षण घेतले. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी हायपरलोकल एप्प ताजा (Taazza) मध्ये सह-संस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी (सीटीओ) म्हणून पदभार स्वीकारला. रजत सांगतात की, ʻट्विटरच्या लोकप्रियतेत वाढ होत होती, हा तो कालावधी होता. आमच्याकडेदेखील मायक्रोब्ल़ॉगिंगला साजेसे असे काहीतरी होते, मात्र हायपरन्यूज लेवलवर. आम्ही एका संकेतस्थळावर काम करण्यास सुरुवात केली, जिथे भारतातील प्रत्येक पिनकोडचे स्वतंत्र पेज होते. आम्ही विचार केला की, हे पेज मोबाईलसाठी चांगले राहिल. त्यामुळे आम्ही ते एन्ड्रॉइडवर सुरू केले. त्यात विशेष स्थळे, चित्रपटगृहे, पब एकमेकांसोबत जोडण्यास सुरुवात केली. आम्हाला snapdeals, Kooves, sosata तसेच चित्रपटगृहे यांच्याकडून भागीदारीदेखील मिळू लागली.ʼ तब्बल अडीच वर्षे तिथे काम केल्यानंतर रजत यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. रजत यांनी MobStac कंपनीमध्ये काम करणे सुरू केले. मात्र अर्बन लॅडर येथे काम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राने त्यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी राजी केले. फर्निचरचे काम करणाऱ्या एका ई-कॉमर्स कंपनीत काम करणे आव्हानात्मक होते. रजत सांगतात की, ʻया ठिकाणी निश्चितच मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. जर स्टार्टअपमध्ये यशस्वी होण्याचा विश्वास असेल, तर कोणीही काम करण्यास तयार होईल.ʼ अर्बन लॅडरमध्ये कालांतराने रजतच्या २-३ जणांच्या टीमचे रुपांतर ३० जणांमध्ये झाले. तसेच त्यांनी Magento(PHP) पासून Ruby पर्यंत तांत्रिक सहाय्यदेखील केले. रजत आता अर्बन लॅडरचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत आणि तांत्रिक गोष्टींची देखभाल करतात. भविष्यातील योजनांबाबत उत्साहाने बोलताना रजत सांगतात की, ʻमला एक असे सॉफ्टवेअर विकसित करायचे आहे, जे अनंतकाळापर्यंत लोकांच्या लक्षात राहील.ʼ

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags