संपादने
Marathi

जगातील १०१ वर्ष जुना ढाबा; ज्यांची दाल मखनी जगभरात लोकप्रिय आहे!

Team YS Marathi
3rd Apr 2017
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

अमृतसरचे नाव काढताच डोळ्यासमोर प्रसिध्द सुवर्ण मंदिराचा नजारा तरळतो, जे १६०४ पासून अस्तित्वात आले आहे. परंतू गुरुव्दारा शिवाय आणखीही काही तरी आहे ज्याने या शहराला ऐतिहासिक ओळख दिली आहे, जे खवय्यांसाठी स्वर्गासमान आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोघांसाठी, येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, मात्र या ठिकाणी केवळ ‘केसर ढाबा’ बद्दलच जाणून घेवूया. 


image


१९१६मध्ये कै. लाला केसरमल आणि त्यांच्या पत्नी कै. श्रीमती पार्वती यांच्यापासून सुरूवात झालेला हा ढाबा पाकिस्तानच्या शैखपूरा भागात होता आणि १९४७ला विभाजन झाल्यावर त्यांचे स्थलांतर अमृतसरमध्ये झाले. पूर्णत: शाकाहारी ढाबा, त्यालाच जोडून स्वयंपाक घर जवळपास त्याच आकाराचा भोजन करण्याचा भाग आणि हे सारे तुम्हाला त्या जुन्या काळात घेवून जाणारे. प्रसिध्द व्यक्ती लाला लजपतराय, जवाहरलाल नेहरू, आणि इंदिरा गांधी या ठिकाणी जेवून गेले आहेत आणि त्यांचा वारसा अजूनही जीवंत आहे.

प्रसिध्द अशी दाल मखनी येथे बारा तास शिजवली जाते, तांब्याच्या भांड्यात रात्रभर मंद आचेवर ज्यातून सर्व प्रकारचे स्वाद उतरले जातात. त्यांचे सारे तंदूर आणि स्वयंपाक घरातील सारी भांडी जुन्या पद्धतीची मातीपासून तयार केलेली आहेत, जी तुम्हाला मागच्या काळात घेवून जातात. गेल्याच वर्षी या ढाब्याने शंभरी साजरी केली, ज्याला माध्यमांतून मोठी प्रसिध्दी देखील देण्यात आली ज्यात डिस्कव्हरी आणि बीबीसी न्यूजचा समावेश होता.


image


शुध्द देशी तूपाचा वापर व्हावा म्हणून कटाक्ष असलेल्या येथे भरपेट जेवण केल्यावर दिवसभर तुम्हाला भूक लागत नाही. दाल आणि कुलचा शिवाय, या ठिकाणी फिरणी देखील प्रसिध्द आहे. पारंपारिक पंजाबी गोड पदार्थ. हा मेनू खूप काही मोठा नाही पण या ऐतिहासिक जागेला भेट द्याल आणि एकदा येथील स्वाद चाखाल तर येथील चवीचे समाधान तुमच्या जिभेवर आणि मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिल.

केसर ढाबाला सर्वात मौल्यवान बनविणारी गोष्ट काय आहे तर त्याचे खरेखूरे मूळ स्वरूप जे काळाच्या ओघात मागणी असूनही बदलण्यात आले नाही. अशा प्रकारच्या जागा शहराच्या लौकिक आणि वैभवात भर घालतात आणि त्यातून वैशिष्ट्यपूर्ण काही तरी निर्माण होते. आणि भारतात तर अशा वैविध्यपूर्ण जागा उदंड प्रमाणात प्रत्येक भागात आणि राज्यात पहायला मिळतात, मात्र पाश्चिमात्य प्रभावाखाली त्या कमी होत चालल्या आहेत. जर आपण आपल्या सत्य स्वरूपाशी प्रामाणिक राहिलो आणि त्यांना सोबत घेवून विकासाच्या वाटा शोधल्या तर भारताला निश्चित उज्वल भवितव्य आहे यात शंका नाही. (थिंक चेंज इंडिया)

Website: Kesar Ka Dhaba 

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags