संपादने
Marathi

एकशेतेरा गुंतवणुकदारांच्या नकारानंतरही हारल्या नाहीत, कार्यासाठी अखेर रतन टाटा यांनी दिला होकार!

महिलांसाठी परिधान वस्त्र तयार करणा-या ब्रँड ‘कार्य’ च्या संस्थापिका निधी अग्रवाल यांची कथा आव्हानांनी परिपूर्ण आहे. आपले काम सुरू करण्यापूर्वी ग्रेटर नोएडाच्या एका निर्यात संस्थेत काम केले. ‘कार्य’ आज प्रतिमाह बाजारात १५०नवे डिझाईन घेऊन येते जे १८आकारात उपलब्ध आहेत. केलॉग स्कुल फॉर मँनेजमेंटमध्ये एमबीए करण्याशिवाय सनदी लेखापालची परिक्षाही उत्तीर्ण आहेत निधी.

Team YS Marathi
13th May 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

असे म्हणतात की, परिश्रम करणारे कधीच हारत नाहीत. हे नक्कीच आहे की ते खडतर प्रवास करतात पण हजारो वाईट दिवसांवर त्यांचा एक चांगला दिवस भारी पडतो. एकूण एकशे तेरा गुंतवणूकदार आहेत ज्यांनी निधी अग्रवाल यांना मागील ३६५ दिवसांत त्यांच्या उद्योग ‘कार्य’साठी फोन, ईमेल आणि व्यक्तिश: भेटून संपर्क केला आहे. पण सगळ्यांचे उत्तर एकच होते, ‘नाही’. खरंच, सतत नकार ऐकण्याच्या कुणाच्यातरी हिंमतीला मानले पाहिजे. पण प्रतिकूल स्थितीमध्येही निधी उभ्या राहिल्या आणि हारल्या नाहीत. अखेर ती वेळ आलीच जी मागच्या सा-या वाईट दिवसांना भारी होती. निधी यांना ३६५ व्या दिवशी यश मिळाले. त्या आपल्या उद्योगाच्या गुंतवणूकीसाठी दिग्गज उद्योजक रतन टाटा यांच्याशिवाय एका आघाडीच्या व्यावसायिकाची साथ मिळवण्यात यशस्वी झाल्याच. ज्यांचे नांव लवकरच अधिकृतपणे समोर येणार आहे.अशाप्रकारच्या प्रेरणादायक कथाच आम्हाला शिकवतात की, कसे एक कठीण ‘कार्य’ मुल्यवान असते.

‘कार्य’ भारतीय महिलांना पश्चिमी आणि अनौपचारिक परिधान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारा एक ब्रँड आहे. ज्यामध्ये त्यांना सर्वात योग्य मापाचे कपडे उपलब्ध करुन देताना१८ आकारातील श्रेणी उपलब्ध करून देतो. त्यांचा मुख्य उद्देश पश्चिमी आणि भारतीय परिधानांच्या दरम्यान असलेले अंतर कमी करण्याचा आहे.

image


निधी सांगतात की, “ खूप काळापासून हनीवेल आणि केपीएमजी यांच्या पांठिंब्यानंतर सन२०१०मध्ये मी ब्रँड सल्लागारांसोबत एक व्यावसायिक सल्लागार म्हणून काम करत होते. त्यावेळी मी एका ग्राहकांना भेटण्यासाठी विमानतळावर जात होते त्याच दरम्यान माझ्यावर कॉफी सांडली. त्यावेळी मी रस्त्यातच एका मॉडेल कडे थांबले आणि कपडे बदलून साधे पांढरे कपडे खरेदी करून परिधान केले. तेथे उपलब्ध असलेल्या ब्रँडच्या कपड्यांमध्ये ही समस्या होती की एकतर ते कमरेला खूप मोठे होत असत किंवा मग शरिराच्या वरच्या भागात जास्त घट्ट होत होते. त्यावेळी मी असा विचार केला की मी एकटीच महिला आहे की इतरही महिलांची हिच समस्या आहे? त्यानंतर आम्ही २५० महिलांमध्ये एक लहानसे सर्वेक्षण केले, आणि या निष्कर्षाला आलो की, ८०% महिलांना माझ्यासारख्याच समस्या येतात”.

कोणताही पुर्वानुभव नसताना एका सफल व्यापाराच्या संचालनाबाबत सांगताना निधी म्हणतात की, “ मी ग्रेटर नोएडाच्या एका निर्यात संस्थेत काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच या व्यापारातील बारकावे लक्षात आले. कारण की मी अगोदर सुध्दा सेवा उद्योगात काम केले होते, त्यामुळे उशीरापर्यंत चालणा-या आणि दुहेरी पाळीत काम करताना खूपच लवकर सारे शिकण्यात यशस्वी झाले. मी समोरच्या अडचणी सोडवताना कोणत्याही पातळीवर जायला तयार असे पण प्रश्न सोडवूनच शांत राहात होते.”

image


असे काय आहे जे ‘कार्य’ ला इतरांपेक्षा वेगळी ओळख देते? निधी म्हणतात, “कार्य” इतरांपेक्षा तीन प्रकारे वेगळे आहे, जेथे बाजारात उपलब्ध ब्रँडच्या उत्पादनात केवळ सहा आकाराच्या कपड्यांची उपलब्धी असते आमच्याकडे १८प्रकारच्या आकारमानात ते उपलब्ध असतात. जे भारतीय महिलांच्या शरिराच्या ठेवणीनुसार स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे सजवू शकतात. कपड्यांच्या दोन बटनांमधील अंतरासारख्या छोट्या गोष्टी च्या समस्या सोडवताना आम्ही ग्राहकांना सुविधाजनक कपडे देण्यात यशस्वी झालो आहोत. याशिवाय आम्ही प्रति महिना नव्या प्रकारच्या १५०डिझाईन्स बाजारात आणतो. आणि हे केवळ आमच्या आयटी सक्षम प्रणालीमुळे शक्य होते. त्यामुळे आमचे कामही खूप सहज झाले आहे. आम्ही केवळ वेळेत काम पूर्ण करण्याच्या पध्दतीने कामे करतो.”

निधी यांचे स्वप्न पश्चिमी औपचारिक परिधानांच्या दुनियेत स्वत:ला सर्वात मोठ्या ब्रँडच्या रुपात स्थापित करण्याचा आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या गुंतवणुकीची गरज असते. त्यासाठी त्यांनी फ्लिपकार्टची ब्रँडनिती तयार करणा-या फ्लिपकार्ट एसबीजी यांच्यासोबत ब्रँड रणऩिती तयार करण्यासाठी हातमिळवणी केली. याशिवाय त्या आपला व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी कच्चा माल मागण्यासाठी आणि पुरवठा करण्यासाठीचे कामही दुस-या कुणावर तरी सोपवण्यावर लक्ष देत आहेत.

इतरांसोबत कामे करताना येणारी आव्हाने आणि गमती-जमती याबाबतही त्या खुलेपणाने सांगतात, “ सुरुवातीला मी ‘कार्य’ एक आव्हान म्हणून सुरू केले, आणि नंतर मी ते उपलब्धी म्हणून पाहते. मी माझ्या संस्थेत सर्वात मोठेपद भुषविते आहे आणी त्यामुळे मला सर्वात कठीण समस्या आणि जबाबदा-याही सांभाळण्यासाठी निर्णयही घ्यावे लागतात. त्यासाठी रोजच्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. माझे कामही अशाप्रकारच्या आव्हानांपासून वेगळे करता येत नाही. व्यवसायाकरीता आवश्यक पैसा उपलब्ध करणे ही सर्वात मोठी आव्हानाची बाब असते. शेवटी ३६५ दिवस रोज ११३व्यक्तिंना दूरध्वनी करून किंवा ईमेल करुन अथवा व्यक्तिश: भेट घेऊन माहिती दिल्यावर ३६५व्या दिवशी मला यश मिळालेच.” चेह-यावर नेहमीच स्मितहास्य ठेऊन पुढे जात राहण्याचे कसब काही सोपी गोष्ट नाही. आणि प्रत्यक्षात निधी प्रत्येक नकारानंतरही अधिक उत्साहात स्वत:ला घेऊन पुढे जात राहिल्या.

निधी पुढे सांगतात की, “ एका व्यवसायात आपल्या मार्गात लहान-मोठ्या गोष्टी समोर येतातच. ब-याचदा एक महिला व्यावसायी म्हणून लोक समजतात की, बहुदा आपण स्वत: व्यवसाय करत नाही किंवा आपण स्वत: अंतिम प्राधिकारी नाही. मला आजही आठवते की, मी जेंव्हा गुडगांवच्या एका फँक्टरीत काम करत होते तेंव्हा एक कुरिअरवाला माझ्या एका फ्रिजची डिलीवरी करण्यासाठी आला आणि त्याने ते मला सोपवण्यासाठी नकार दिला. त्याचे म्हणणे फक्त इतकेच होते की, ‘आपल्या बॉसला बोलवा मी फक्त त्यांच्याशीच बोलेन’ शेवटी चौकीदाराने येऊन सांगितले की याच मालकीण आहेत तेंव्हा त्याला मान्य करावे लागले.”

केलॉग स्कुल फॉर मँनेजमेंट मध्ये एमबीए आणि तेथील अधिष्ठाता सेवा पदकांसह सन्मानित होण्याशिवाय निधी यांनी सनदी लेखापालचे शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या छोट्याशा उद्योगासाठी काम करताना त्यांना हा धडा मिळाला आहे की, धीर आणि संयम या दोन गोष्टी असल्याशिवाय कोणतेही काम सोपे होऊ शकत नाही.

“ मी आता पर्यंत माझ्या जीवनात एक क्षणही वाया घालवला नाही. आणि नेहमीच पूर्ण मेहनत आणि लक्ष देऊन कामे केली आहेत. आणि विशेषत: सेवा क्षेत्रात काम केल्याने मी बहुतेक कामे पुन्हा होताना बघण्याची सवय ठेवते. उद्यमीपणाने मला खूप काही शिकायला मिळाले. आता मी पैश्यासोबत समझोता करून अत्यंत तणावात काम करणेही शिकले आहे. आणि हे सारे शिकून मला आनंदही होतो. कारण एक व्यक्ती म्हणून मला विकसित होण्यास खूप मदत मिळते.” 

आणखी काही कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

देशी किंमतीत विदेशी फॅशनचा तडका 'फॅब ऐली'

अंतर्मनाची हाक ऐकून इतर स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नरत स्त्रीची कथा

गर्भारपणातच नव्या उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या श्रद्धा सुद


लेखिका : श्रध्दा शर्मा, संस्थापक आणि मुख्य संपादिका, युअर स्टोरी

अनुवाद : किशोर आपटे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags