फळे विकणा-या एका निरक्षराने मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केली शाळा!

फळे विकणा-या एका निरक्षराने मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केली शाळा!

Thursday August 10, 2017,

2 min Read

आपल्या जीवनातील सारे उत्पन्न गेल्या पंधरा वर्षांपासून हजब्बा यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्यासाठी शाळा सुरू करण्यासाठी खर्च केली आहे. आता ते पदवी महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न देखील पहात आहेत!

हजब्बा निरक्षर आहेत, मात्र त्यांच्या मनात गावातील अशिक्षित मुलांना शिकवण्याची आस आहे, त्यासाठी त्यानी वैयक्तिक जीवनाशी अनेक तडजोडी देखील केल्या आहेत. एका विदेशी दांपत्याशी इंग्रजी संभाषणानंतर हजब्बा यांचे विचार बदलले, कारण त्यांना इंग्रजी येत नव्हती आणि येत ती होती केवळ स्थानिक भाषा!

फळे विकणारे हरेकाला हजब्बा रोज सकाळी संत्र्यांची पेटी लावून व्यवसाय करण्यासाठी २५ किमी प्रवास करतात. गेल्या तीस वर्षांपासून ते मंगलोर येथे जावून तेथून फळे आणून विकण्याचे काम करतात. विशेष म्हणजे ही सारी कमाई ते गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. जरी ते स्वत: निरक्षर आहेत तरी या मुलांनी शिकावे असा त्यांचा आग्रह आहे. 


फोटो साभार: BBC

फोटो साभार: BBC


हजब्बा सांगतात की, त्यांच्या जीवनात हा बदल त्यावेळी झाला ज्यावेळी एका विदेशी दांपत्यासोबत त्यांना इंग्रजीत संभाषण करता आले नाही, मात्र ते गेल्यावर खूप वेळ हजब्बा यांनी विचार केला की, जर ते चांगल्या शाळेत जावून शिकले असते तर त्यांना आज इंग्रजी बोलता आले असते. त्यानंतर त्यांनी ठरविले की ते स्वत: नाही शिकले तर काय झाले येणा-या पिढीच्या मुलांना ते शिक्षणापासून वंचित राहू देणार नाहीत, त्यानंतर त्यांनी स्वकमाईचा भाग गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देण्यास सुरूवात केली. 


image


हजब्बा यांनी सर्वात प्रथम आपल्या कॉलनीत जी मुले कधीच शाळेत गेली नाहीत त्याना शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पाहिले कि पाच सहा वर्षांची मुले शाळेत जात नाहीत, ती घरीच असतात. मात्र अशाप्रकारे एक दोन मुलांना शाळेत पाठवून त्यांना समाधान मिळत नव्हते. मग त्यांनी स्वत:च अशा मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार केला. मात्र ते तितकेसे सोपेही नव्हते. गावांत त्यांची यावरून निंदा नालस्ती खूप झाली.

१९९९मध्ये हजब्बा यांनी आजूबाजूच्या लोकांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला आणि एका मशिदीत शाळा सुरू करण्यासाठी त्यांना राजी केले. त्यानंतर काही दिवसांत त्यांनी ही शाळा नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत केली. या दरम्यान त्यांनी फळे विकणे सोडले नाही. सरकारी अधिका-यांकडे चकराही ते मारत होते. त्यांना सातत्याने भेटून ते शाळा सुरू करण्याचा पाठपुरावा करत राहिले.

त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आणि २००४मध्ये नोव्हेंबर महिन्यात दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतच्या वतीने उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी जमीन देण्यात आली. आता त्यांच्या शाळेत गावातील सारी मुले शिकायला येतात. आणि त्यांना आता त्यांच्यासाठी एक पदवी महाविद्यालय सुरू करायचे आहे.