संपादने
Marathi

गुजरात मधील रिक्षावाल्याच्या मुलीला उच्च माध्यमिक परिक्षेत ९९.७२ टक्के गुण ! मात्र भवितव्याबाबत अनिश्चिती

Team YS Marathi
24th May 2017
2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

गुजरात मधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या १२वीचे निकाल ११मे रोजी जाहीर झाले. यावेळी झालेल्या घोषणेमुळे एका १७ वर्षांच्या नवतरुणीला आनंद झाला. अहमदाबाद मधील फरहाना बावानी हिला ९९.७२ टक्के गुण मिळाले असून तिने विज्ञान शाखेत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. फरहाना ही  एका ऑटोरिक्षा चालकाची कन्या आहे, फारूक भाई जे कुटूंबात एकमेव कमाविते आहेत.


image


फरहानाने जुनागढ येथील एफ डी हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले, तिला तिच्या आर्थिक स्थितीची पूर्णत: जाणिव आहे. या बातमीने तिला खूप आनंद तर झालाच, पण त्याचवेळी ती काहीशी निराश देखील झाली. कुटूंबाने देखील आनंदाने हा क्षण साजरा केला.

फरहानाची डॉक्टर व्हायची इच्छा आहे. तिने नुकतीच त्यांसाठी राष्ट्रीय पात्रता तसेच प्रवेश परिक्षा (निट) दिली आहे. याबाबतच्या वृत्ता नुसार फरहाना म्हणाली की, “ गुजराती माध्यमातील नीट परिक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत कठीण होती. नीट परिक्षेसाठी विनाकारण कठोर नियमावली देण्यात आली आहे, मला खात्री आहे की माझा निकाल चांगलाच येईल जेणेकरून मला मोफत एमबीबीएस करिता प्रवेश मिळेल. मात्र नीटची परिक्षा आश्चर्यकारकपणे मनासारखी देता आली नाही.”

एका वृत्तानुसार फरहाना म्हणाली, “ नीटच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य छपाईच्या चूका होत्या, त्यामुळे मला काही प्रश्न नीट समजू शकले नाहीत. मला अपेक्षित कामगिरी त्यात करता आली नाही. सीबीएसई आणि जीएसईबी यांच्या गुणवत्ता सारख्याच आहेत, मला खात्री नाही की मला एमबीबीएस करीता प्रवेश मिळेल किंवा नाही.

मात्र आणखी एका वृत्तानुसार माध्यामांशी बोलताना फरहाना हिच्या आई म्हणाल्या की, “ आमची केवळ एकच इच्छा आहे सरकारने गुजराती आणि इंग्रजी माध्यमांचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावे, कदाचित त्यामुळे आमच्या मुलीच्या कष्ट आणि बुध्दिमत्तेला न्याय मिळू शकेल.”

फरहाना, हिने जशी परिक्षा जवळ आली तशी रोज दहा तास अभ्यास करण्यास सुरूवात केली, तिची इच्छा आहे की, अहमदाबादच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा. मात्र आता ती काळजीत आहेत की योग्य त्या पध्दतीने प्रदर्शन झाले नाही तर तिची ही संधी चुकू शकते.

फरहाना हिने जीव तोडून अभ्यास केला आणि बारावीच्या परिक्षेत अव्वल क्रमांक पटकाविला. त्यामुळे हे पाहणे खूप क्लेशदायक असेल की, अर्थिक स्थिती किंवा नीट मधील गुणांकनाच्या सध्याच्या पध्दतीमुळे तिला तिचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.अजूनही नीटचे निकाल हाती आले नाहीत, चला आशा ठेवूया की तिला त्यातही घवघवित यश मिळेल.

2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags