संपादने
Marathi

भुमिका शर्मा, भारताच्या पहिला शरीरसौष्ठवपटू ज्यांनी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली

Team YS Marathi
3rd Jul 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

भुमिका शर्मा ज्या २१ वर्षीय महिला आहेत, ज्यांनी मळलेल्या वाटेने न जाता अनेक अडचणींचा सामना केला. त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत ज्यांनी व्हेनिस येथील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेतील मिस वर्ल्ड सन्मान जिंकला आहे.

जगभरातून आलेल्या पन्नास महिलांशी भुमिका यांची स्पर्धा होती. मात्र आता या आनंदात जास्त वेळ न दवडता त्यांनी त्यांच्या पुढच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रीत केले आहे—मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्यासाठी! जी डिसेंबर २०१७मध्ये होत आहे. मिस वर्ल्ड जिकल्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ भारतीय चमूत २७ सदस्य होते, त्यात मी एकमेव महिला शरीर सौष्ठवपटू होते. मला तीनही फे-यांमध्ये आवश्यक तेवढे गुण मिळाले आणि देशाला सन्मान मिळाला”.


image


एका वृत्ता नुसार, भुमिका या मूळच्या उत्तराखंडमधील देहराडूनच्या आहेत, ज्या सध्या नवी दिल्लीत राहतात. त्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत ज्या या राज्यातून शरीरसौष्ठवाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या आहेत.

त्या एका क्रीडाप्रेमी कुटूंबातील आहेत, त्यांच्या आई हंसा मनराल शर्मा या भारतीय भारोत्तोलन संघाच्या प्रशिक्षक राहिल्या आहेत. तरीही त्यांच्या पालकांचे मन शरीरसौष्ठवाकडे वळविण्यासाठी त्यांना खूप जड गेले कारण त्या कुटूंबातील एकमेव अपत्य आहेत.

असे असले तरी, गेल्या तीन वर्षापूर्वी, भुमिका यांनी शूटींग मध्ये रूची दाखवली होती, ज्यात त्यांच्या पालकांच्या इच्छा दडल्या होत्या. दरम्यान त्यांची भेट शरीरसौष्ठव प्रशिक्षकांशी झाली त्यातून त्यांनी रूची वाढवली आणि प्राविण्य मिळवले. त्यात त्यांचे पालक सुरूवातीला विरोधात होते. मात्र त्यांनी पाहिले त्या किती जिद्दी आहेत, आता त्यांची आई देखील त्यांना वेळोवेळी चांगल्या टिप्स देत असते.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags