संपादने
Marathi

एक साॅफ्टवेअर इंजिनिअर जी आता सुंदर विणकाम करते, एकता सिंगची रंजक कथा

Team YS Marathi
8th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आपल्या तान्ह्या बाळाला लहानाचं मोठं होताना बघायची एकताची इच्छा होती आणि त्या इच्छेमुळेच तिच्या नवीन व्यवसायाची सुरवात झाली. एका वर्षापूर्वीच्या आठवणी सांगताना तिला अभिमान वाटतो की, ती आता themagicalthread.com ची मालकीण आहे. याठिकाणी चिकनकारी तसंच इतर डिझायनर वस्तू उपलब्ध आहेत.

सध्या मुंबईत स्थायिक झालेल्या साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एकताने आपल्या लहान मुलासाठी आनंदाने नोकरी सोडून ती मुलाची काळजी घेत होती. मुलगा चार वर्षांचा होई पर्यंत काम करायचं नाही असं तिने ठरवलं होतं. गेल्या वर्षी पुन्हा कामाला सुरवात करावी असं तिला वाटायला लागलं. पण एकदा कामाला सुरवात केली की शांतता मिळणार नाही हे तिला माहित होतं. मुलाला पाळणाघरात ठेवल्यानंतरही ती कामावर असताना तिला तिच्या मुलाच्या जेवणाची, तब्येतीची काळजी वाटायची.


image


"मला स्वतःला खूप वाईट वाटायचं आणि मी कुठेतरी चुकतेय हा विचार सतत मनात असायचा. माझ्या कामा मुळे तो आजारी असताना त्याची काळजी घायला त्याच्या जवळ नाही याची खंत वाटायची, या कारणामुळे मी दुसऱ्यांदा नोकरी सोडली."असं एकता सांगते.

तिची द्विधा मनस्थिती झाली होती. उच्च शिक्षित असून घरी बसणं या विचाराने ती बेचैन व्हायची, आणि उर्वरित आयुष्यभर गृहिणी हा शिक्का मारून घेणं तिला मान्य नव्हतं. त्यामुळे ती पुन्हा विचारात पडली.

यावेळी तिने तिला जे मनापासून आवडेल तेच करायचं ठरवलं. यासाठी ती व्यावसायिकांच्या एका गटात सहभागी झाली आणि ज्यामुळे तिला मुलाची काळजी घेणं आणि राहिलेल्या वेळात घरूनच काम करणं शक्य झालं.


image


चिकनकारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

लखनौ सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहरात एकता लहानाची मोठी झाली. सध्या डिझायनर चिकनकारी बद्द्ल लोकांना आकर्षण आहे हे एकताने पाहिलं आहे. तिच्या सुट्टीच्या काळात ती ऑनलाईन खरेदी करायची आणि त्या दरम्यान तिला जाणवलं की, डिझायनर या नावाखाली विकलं जाणारं चिकनकारीचं कापड हे खूप महाग आहे. यामुळे ती काहीशी प्रभावित झाली.

" मला जाणीव झाली हे सामान्य लोकांना परवडण्यासारखं नाही. माझा व्यवसाय सुरु झाला तो चिकनकारी सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आणि चिकनकारी कापडाच्या किंमतीमधील जी दरी आहे ती भरून निघावी. चिकनकारी कापड वापरणं म्हणजे चैन करण्यासारखी गोष्ट आहे असं समजणाऱ्या मध्यम वर्गापर्यंत ते पोहोचवायचं होतं."

एकताने चिकनकारी कापडाचा घाऊक दरात पहिल्यांदा माल मागवला आणि शेजाऱ्यांना आणि परिचितांना ते बघण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बोलावलं. ते बघायला आलेल्या महिला फार खुश झाल्या आणि लगेचच तिने आणलेली सगळी कापडं विकली गेली. तिचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला. एकताचे पती वेब डेव्हलपर असल्याने एखादं संकेतस्थळ सुरु करून त्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसाय सुरु करणं तिच्यासाठी फार अवघड नव्हतं. हे खरं आहे कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल तर सुरवातीच्या काळात थोडी पैशाची बंधनं असतात. एकताने स्वतःच माॅडेलिंग करायचं ठरवलं. हळूहळू तिचा व्यवसाय जोर धरू लागला आणि वाढायला लागला. एकताचा जसा तिच्या मातृत्वावर विश्वास होता तसंच स्वतःच्या कौशल्यांवर पण होता.

तिच्या कुटुंबात याआधी कोणीही व्यवसाय केला नव्हता. तिला स्वतःचं बुटिक सुरु करायचं होतं आणि बुटिक सुरु करणं ही तिची सगळ्यात मोठी झेप होती.

सुरवातीच्या काळातील मेहनत

" ऑनलाईन व्यवसाय हा जाहिरात आणि मार्केटिंग यावर अवलंबून असतो, त्यामुळे सुरवातीच्या महिन्यांमध्ये आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे सुरवातीच्या दिवसात ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात गेले," असं ती सांगते. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रदर्शन हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे, यामुळे तिच्या उत्पादनाबद्दल विश्वास निर्माण व्हायला आणि सुरवातीच्या काळात ग्राहक आकर्षित व्हायला फार मदत झाली. तिच्या उत्पादनाला बाजारात मान्यता मिळावी यासाठी तिने सुरवातीला नफा पण कमावला नाही.

एकताने आता बचत करायला सुरवात केली असून, ती आता गुंतवणूकदारांच्या शोधात आहे.

एका साॅफ्टवेअर इंजिनीयरची व्यवसायात यशस्वी झेप

एकताने जेव्हा व्यवसाय सुरु केला तेव्हा तिला गोष्टी स्पष्ट झाल्या, फॅशन क्षेत्रातील ऑनलाईन खरेदीबाबत लोकांना वाईट अनुभव आले आहेत. जेव्हा ती तिच्या ऑनलाईन व्यवसायाबद्दल बोलायची तेव्हा लोकं हे सतत सांगायचे. त्यामुळे तिचं काम दुप्पटीने वाढलं, लोकांच्या ऑनलाईन खरेदीच्या कटू आठवणी त्यांना विसरायला लावायच्या होत्या. तिला लोकांना खात्रीने पटवून द्यायचं होतं तिचं उत्पादन विश्वासार्ह आहे.

एकता सांगते व्यवसायामध्ये फायदा किंवा नुकसान असतं. " जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करत असता तेव्हा तुमची जबाबदारी काहीशी कमी होते, कंपनी फायद्यात आहे की तोट्यात आहे याचाशी तुम्हाला काही देणं घेणं नसतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करता तेव्हा सगळी जबाबदारी तुमची असते, आर्थिक, मालाची गुणवत्ता राखणे आणि इतर गोष्टी तुम्हालाच बघायला लागतात." असं ती सांगते.

सुरवातीला तिला थोडं अवघड गेलं, अनेक वर्ष नोकरी केल्यावर व्यावसायिक म्हणून काम करताना थोडं वेगळं वाटत होतं, पण ती ते पण शिकली. एकता सांगते," आता माझा मुलगा सतत माझ्या डोळ्या समोर असतो मी काम करत असले तरीही, त्यामुळे तो माझी कमजोरी नाही तर तो माझी शक्ती बनला आहे," असं ती शेवटी सांगते.

लेखिका : सास्वती मुखर्जी

अनुवाद : श्रद्धा वार्डे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags