संपादने
Marathi

पोलिस दलाच्या कामातील तणाव दूर करण्यासाठी ‘योग’

Team YS Marathi
22nd Dec 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

लोणावळा येथील कैवल्यधाम योग केंद्रासोबत महाराष्ट्र पोलिसांनी करार केला असून त्यातून या केंद्रातील ७४ योग प्रशिक्षकांची नियुक्ती पोलिस दलाला पूर्णवेळ आणि अर्धवेळ योग प्रशिक्षण देण्यासाठी केली जाणार आहे. याचा फायदा २.१०लाख पोलिस आणि त्यांच्या कुटूंबियांना होणार आहे.

या उपक्रमाचा हेतू हा आहे की, पोलिसांना त्यांच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे होणा-या रोगांपासून किंवा व्याधींपासून दूर ठेवणे. हा उपक्रम जरी स्वयंसहायता तत्वावर सुरु करण्यात आला असला तरी पोलीस दलांच्या प्रमुखांनी सर्वाना त्यात दैनंदिन कामातून वेळ काढून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हा प्रशिक्षणाचा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक दलात दोन योग प्रशिक्षक असतील.

image


राज्य पोलीस दलांच्या अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांनी सांगितले की, प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाची सुरुवात केली जात आहे. “ केंद्र सरकारचा हा उपक्रम कायमस्वरुपी चालविला जाणार असून त्याचा लहान प्रकारच्या प्रशिक्षणात समावेश केला जात आहे. तणाव दूर करणे आणि जीवनशैलीतून होणा-या आजारांपासून दूर राहणे यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होणार आहे. पोलीस दलांना त्यातून निरोगी ठेवणे शक्य होणार आहे” सरवदे यांनी सांगितले.

मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुश विभागाचा आढावा घेतला आणि योगाचे प्रयोग सातत्याने दैनंदिन उपयोगात आणल्याने पोलीस दलांना सामजिक स्वास्थ ठेवण्यास तसेच स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यास तसेच कार्यकुशलतेने काम करण्यास सहकार्य होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

सरवदे म्हणाल्या की, हा उपक्रम याच कल्पनेतून निर्माण करण्यात आला आहे. “ आम्ही प्रशिक्षक नेमताना तज्ञांचा सल्ला घेणार आहोत, तीन सदस्याचे मंडळ या प्रशिक्षकांच्या मुलाखती घेणार आहे आणि ४० दलांना आधीच योग प्रशिक्षक आहेत”. त्या म्हणाल्या.

“कैवल्यधामचे तज्ञ प्रशिक्षणानंतरचे बदल काय झाले आहेत त्यांचे परिक्षण करतील. त्यानुसार दोन तीन दलांमध्ये ही सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी त्या त्या प्रमुखांना प्रशिक्षण पूर्ण करण्यास सांगण्यात येत आहे.” सरवदे म्हणाल्या. इतरही राज्यात योग प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. परंतू त्यासाठी व्यावसायिक पध्दतीने करारबध्द होणारे आपले राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य असेल. 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags