संपादने
Marathi

'अॅडवाईसशुअर' आता दिवसाला एक रुपयात मिळवा आर्थिक सल्ला...

Team YS Marathi
4th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

गल्लोगल्लीत हमखास सापडणारं दुकान म्हणजे वाण्याचं! वाणी आणि त्याचे ग्राहक यांच्यातलं नातं खूप सहज असतं. एखादा वाणी अत्यंत हुशारीने आणि प्रामाणिकपणे आपल्या ग्राहकांना बांधून ठेवतो. सहजतेनं आणि आपलेपणाने तो संवाद साधतो आणि आपल्या ग्राहकांच्या मागण्या पुरवत त्यांचा विश्वास जिंकतो. ग्राहक बांधून ठेवण्याची ही कला खूप काही शिकवून जाते.

एका व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या ३७ वर्षीय समीर अग्रवाल यांनी वित्त आणि व्यापार व्यवस्थापन या विषयात शिक्षण घेतलं. चार्टर्ड अकाउंटन्सी आणि आय.आय.एम कोझिकोडेमधून एमबीएसुद्धा केलं.  " एका पारंपारिक वाण्याच्या विक्रीच्या पद्धतीने मला नेहमीच विस्मयचकित केलं आहे," समीर सांगत होते. बजाज फायनान्समध्ये ते एसएमइ परस्पर विक्रीप्रमुख होते. पारंपारिक व्यवसायाच्या या अभ्यासाने त्यांना त्या कंपनीत धोरणात्मक खूप फायदा झाला.

त्यांचे सह संस्थापक ३३ वर्षीय अभिमन्यू सोफाट यांच्यासाठी एक रुपयाची किंमत ही नेहमीच चिंतनाचा विषय ठरली आहे. आज एका रुपयाची किंमत ही ५ वर्षानंतर असणाऱ्या एका रुपयाच्या किमतीपेक्षा कमी असणार आहे ही जाणीव नेहमीच त्यांना विचार करायला भाग पाडते आणि त्यांच्या वित्तीय शिस्तबद्धतेसाठी कारणीभूत ठरते. आपल्या स्वप्नपुर्तींसाठी स्वत:चं आर्थिक नियोजन करू इच्छिणाऱ्याला मदत करणं ही नाविन्यपूर्ण कल्पना या वित्तीय क्षेत्रातल्या दोन दिग्गजांना सुचली.

image


व्यावसायिक आणि व्यक्तिगत दरी

एका मोठ्या ब्रोकरेज कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करताना अभिमन्यूनं वित्तीय बाजारपेठेतील त्रुटी आणि त्यात पारदर्शकता नसते हे अचूक हेरलं होतं. " वित्तीय उत्पादनं ही ग्राहकांच्या गरजा न ओळखताच त्यांच्यावर लादली जात होती. वितरक आणि दलाल यांच्याकरवीच कामं केली जातात. हे जे मध्यस्थ आहेत ते त्या उत्पादनाला चिकटून येतातच आणि त्यांना तुम्हाला मोबदला द्यावा लागतो. या सर्वांमुळे एखाद्या संस्थेला ग्राहकांची पूर्ण क्षमता कळतच नाही आणि त्यातून विश्वासार्हता सुद्धा कमी होते. "अभिमन्यू म्हणाले. ग्राहक आणि संस्थांमधलं हे अंतर मिटवण्यासाठी आणि ग्राहकांचे दृष्टीकोन ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवण्यासाठी अॅड्वाइसशुअरची संकल्पना त्यांना सुचली. 

" दलालांकरवी ग्राहकांना फक्त लघु गुंतवणुकीचे फायदे दाखवले जातात. त्यामुळे खरंतर अनेकजण पैसा कमवू शकत नाहीत. आम्हाला ही एक संधी वाटली. ट्रेडिंगला नकार देऊन आम्ही मोठी संधी मिळवू अशी आम्हाला खात्री होती. " समीर सांगत होते.

मदतीला सरसावणारे मित्र

या दोघांनाही दलालीच्या जाळ्यात अडकून विक्रीचा मोह होणं सहज शक्य होतं. कारण बँकासुद्धा मोठमोठ्या दलालीच्या किमतीच्या उत्पादनांचं वितरण सर्वाधिक करतात. त्यामुळे त्यांनी मानवी चुका आणि गफलती यांच्या पलीकडे जाऊन एक प्रणाली बनवण्याचा ध्यास घेतला. ज्यामुळे त्यांना एखाद्याला नि:पक्षपातीपणे वैयक्तिक आर्थिक निधी देता येऊ शकेल आणि या त्या उत्पादनाच्या वर्गानुसार ग्राहकांना आर्थिक सल्ला देणं सहज साध्य होईल. यामध्ये म्युच्युअल फंड, कॅपिटल मार्केट, शेअर्स आणि स्टाॅक्स, एस आय पी आणि कर बचत योजनांचा समावेश आहे.

"तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारा फायदा म्हणजे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि क्षमतेनुसार त्याच्या पैशांची किंमत मोजणारी उत्पादनं देणं सुलभ जाईल त्याचबरोबर सध्या बाजारात सुरु असलेल्या पद्धतीला आळा बसेल. " अभिमन्यु सांगत होते.

ऑनलाइन प्रक्रिया झाल्यावर आणि प्रणालीतून तुम्हाला निकाल मिळाल्यानंतर बायोनिक सल्लागार अर्थात परिपूर्ण आर्थिक व्यवस्थापकीय सेवा  पुरवली जाते ज्यामुळे कर वाचवण्यासाठी अॅडवाइसश्युअरची हाताळणी पद्धती कामी येते. ज्यात तुमच्या संपत्तीचं रक्षण केलं जातं आणि धोक्यापासून तुम्हाला वाचता येतं. नजिकच्या काळात कंपनीला विविध वित्तीय उत्पादनांच्या व्यवहारांचे एकत्रीकरण करायचे आहे, जिथे ग्राहक एका क्लिक मध्ये विक्री किंवा खरेदी करू शकतील.

" आम्ही ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांसारख्या सुरक्षा यंत्रणांचा वापर करतो त्याचबरोबर आमच्या नेटवर्कवरून जाणाऱ्या माहितीसाठी आम्ही उच्चतम दर्जाच्या सुरक्षा आव्हानांचा वापर करतो." अभिमन्यु सुरक्षेविषयी सांगत होते. 

image


हे नेमक कोणासाठी ?

यामध्ये कोणालाही सल्ला मिळू शकतो. ग्राहकांचं समाधान हेच अॅडवाइसश्युअरचं महत्त्वाचं उद्दिष्ट्य ! त्यामुळे, ग्राहकांना इथे स्वत:ला हवे तसे बदल करवून घेऊन फायद्याचा व्यवहार करता येऊ शकतो.

आता हे उत्पादन अदृश्य असल्याने, अॅडवाइसश्युर ग्राहकांच्या काही ठराविक गरजांची पूर्तता करू शकते. त्याचं मुख्य लक्ष्य हे कंपन्यांचे मानवी संसाधन व्यवस्थापक हे होते. तसंच भारतातील २० शहरांमधील नोकरदारवर्ग त्याचबरोबर ३५००० रुपये आणि वर मिळकत मिळवणाऱ्या लोकांना त्यांनी लक्ष्य केलं. त्यांनी एका दुबईत राहणाऱ्या ग्राहकाला सुद्धा आर्थिक नियोजन करण्यासाठी मदत केली. त्याने पुढे रियल इस्टेट आणि विमा क्षेत्रात सुद्धा अॅडवाइसश्युअरची मदत घेतली, ज्यामुळे त्याचा गुंतवणुकीचा खर्च वाचला.

स्वत:साठी वित्तीय नियोजन

अभिमन्यु यांच्या मते अॅडवाइस्श्युअर ही भारतातील व्यक्तिगत मदत करणाऱ्या आर्थिक संस्थांपैकी एक आहे ज्या वितरक किंवा इक्विटी ब्रोकिंग सारख्या मिळकतीवर अवलंबून राहत नाहीत. थेट इक्विटी, टॅक्स, बॉन्ड, रिअल इस्टेट, वित्तीय नियोजन अशा पैसे वाचवणाऱ्या उत्पाद्नासाठी सल्लागार म्हणून काम राहतात आणि इन्श्युरन्स सल्लागार म्हणून सुद्धा काम करतात. 

विश्लेषणात्मक सल्ल्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी जपण्यास मदत होते आणि कायमस्वरूपी मैत्रपूर्ण संबंध बनवण्यासाठी सुद्धा ही विश्लेषणं कामी येतात. तरीही खूप घाई न करता आम्हाला पुढे जायचं आहे. भारतातील पारंपरिक विचारसरणीप्रमाणे 'जर सल्ला मला फुकट मिळत आहे, तर मी त्या सल्ल्यासाठी पैसे का मोजावे ? ' अभिमन्यु यावर चिंतन करत होते. त्यामुळे या दोघांनी तब्बल १०० जणांना विचारलं की एखाद्या सल्ल्यासाठी ते पैसे मोजतील का ? या सर्वेक्षणामुळे त्यांना त्यांची धोरणं आखणं सोपं गेलं. या फर्मने मग स्टाॅक , म्युच्युअल फंड, बचत आणि कर वाचवण्याची प्रणाली असे सल्ले द्यायला सुरवात झाली. ज्यासाठी त्यांनी दिवसाला १ रुपया दर आकारायला सुरवात केली तर ग्राहकाच्या संपूर्ण व्यक्तिगत आर्थिक विश्लेषणासाठी ७,५००  हा दर लावण्यात आला आणि या कल्पनेला भन्नाट प्रतिसाद मिळाला. आज त्यांच्याकडे १००० पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत आणि महिन्याला २५ % इतकी वाढ त्यात होत असते. "तंत्रज्ञानाच्या वापराने आम्ही अशी प्रणाली बनवली की ज्यामुळे अधिक खर्च न होता त्यात वाढ होत जाईल."

अॅडवाइसश्युरला बाजारात स्पर्धा तर आहे. फंडइंडिया डॉट कॉम, अर्थयंत्र डॉट कॉम, फिनान्स डॉट कॉम, स्क्रीप्बोक्स डॉट कॉम या सारख्या कंपन्यांशी त्यांची स्पर्धा आहे पण त्यांच्या परिपूर्ण विश्लेषणात्मक सेवेमुळे त्यांना एक वेगळं वलय प्राप्त झालय. वर्ष २०२० पर्यंत कंपनीनं पाच लाख लोकांना किरकोळ सेवा पुरवण्याचं ध्येय निश्चित केलं आहे.

लेखिका : बिन्जल शाह

अनुवाद : प्रेरणा भराडे 

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags