संपादने
Marathi

२५० रुपयांनी सुरु केलेला व्यवसाय ४००० करोडपर्यंत नेणारे 'एसआईएस ग्रुप' चे संस्थापक रविंद्र सिन्हा

Team YS Marathi
25th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर ध्येय हे नक्कीच गाठता येते. गरज आहे ती दृढ निश्चय व सशक्त संकल्पाच्या साथीने अर्जुना सारखी ‘माशाच्या डोळ्याला भेदण्याची’. यश हे कोणत्याही परिस्थितीचे गुलाम नसते. पण संघर्षाच्या वेळी माणूस नक्कीच विपरीत परिस्थितीचा गुलाम बनतो. गुलामगिरीचे बंधन झुगारून, मेहनतीची कास धरून मनुष्य एक दिवस नक्कीच इतिहास रचू शकतो.

कधी काळी फक्त २५० रुपयांनी सुरु केलेला आपला व्यवसाय ४००० करोड पर्यंत नेणारे एसआईएस (SIS) ग्रुप चे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र किशोर सिन्हा यांनी खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला आहे. एक असा प्रेरणादायक इतिहास जे आधुनिक काळात तरुण उद्यमीचा उत्साह वाढवण्याबरोबरच त्यांचे मार्गदर्शक ठरले आहे. आर.के.सिन्हा यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात पत्रकारीतेपासून केली. सिन्हा सांगतात की, "१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या बातम्या प्रसारणादरम्यान त्यांची भारतीय सेनेचे अधिकारी व सैनिकांशी चांगली मैत्री झाली. बांगलादेशाच्या फाळणीनंतर सिन्हा परत पटना येथे आले व राजकीय बातमीदार म्हणून दैनिक सर्चलाईट साठी कार्य करू लागले".

image


रविंद्र सिन्हा हे १९७० च्या दरम्यान लोकनायक जयप्रकाश नारायण (जे.पी)यांच्याद्वारे मुजफ्फरपुरच्या मुशहरी प्रखंडातील नक्षलवाद्यांविरुद्ध झालेल्या आंदोलनात, पहिल्यापासून त्यांच्या बरोबर होते. तत्कालीन इदिरा गांधी यांच्या सरकारच्या व्याप्त भ्रष्टाचाराच्या विरोधात सिन्हा यांनी विवेचनात्मक कटू लेखन केले पण शेवटी १९७४ मध्ये त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

आर.के.सिन्हा सांगतात की,’’त्याच संध्याकाळी मी जे.पी यांच्या कडे गेलो तेव्हा मला काढून टाकण्याची बातमी अगोदरच त्यांना मिळाली होती. जे.पी यांनी विचारले की आता काय करणार? मी सांगितले की कंत्राटदारी करणार. तेव्हा जे.पी म्हणाले असं काही तरी कर ज्याने गरीबांचा उद्धार होईल’’.

सेनेच्या अधिकारी व सैनिकांच्या मदतीने त्या कठीण प्रसंगी सिन्हा यांनी मुख्य भूतपूर्व सैनिकांच्या पुनर्वसनाच्या हेतूने सिक्युरिटी अॅण्ड इंटेलिजेन्स सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. एक असे नवखे काम ज्याचा सिन्हा यांना कोणताही अनुभव नव्हता. सिन्हा सांगतात की त्यांचे मित्र एक मिनी स्टील प्लान्ट चालवत होते जिथे रामगढ (झारखंड) मध्ये प्रोजेक्ट साईटच्या सुरक्षेसाठी सैन्यातील निवृत्त सैनिकांची गरज होती. सिन्हा यांनी ते ओळखत असलेल्या सैनिकांची माहिती दिली. यावर मित्राने त्यांना एक सुरक्षा कंपनी बनवण्याचा सल्ला दिला. व तो सल्ला त्यांनी लगेच अंमलात आणला. त्यांनी पटना येथेच एक गॅरेज भाड्याने घेऊन कामाला सुरवात केली. सिन्हा त्यावेळी फक्त २३ वर्षाचे होते. त्यांनी प्रथम सैन्यातील ३५ निवृत्त सैनिकांना नोकरी दिली. यात २७ गार्ड,३ पर्यवेक्षक (supervisor), ३ बंदुकधारी व दोन सुभेदार होते. या पद्धतीने १९७४ मध्ये SIS ची स्थापना झाली. त्यानंतर सिन्हा व SIS ने कधीच मागे वळून बघितले नाही . मेहनतीचे फळ सिन्हा यांना लवकरच मिळाले. काही वर्षाच्या आतच गार्डची संख्या वाढून ती ५००० पर्यत गेली व त्यांच्या उत्पन्नाची आकडेवारी ही करोडोंच्या घरात गेली. आजच्या स्थितीला एसआईएस ग्रुप मध्ये सव्वालाखापेक्षा जास्त स्थायी कर्मचारी आहे. भारतात २५० पेक्षा जास्त कार्यलय आहे. त्यांच्या २८ राज्यात ६०० पेक्षा जास्त जिल्ह्यात हा व्यवसाय पसरला आहे. SIS हे आंतरराष्ट्रीय असून २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाची कंपनी चब सिक्युरिटीचा त्यांनी ताबा घेतला. २०१६ मध्ये कंपनीचे वार्षिक उत्पन्न ४००० करोडोंच्या पुढे गेले.

image


रवींद्र सिन्हा हे तरुणांना संदेश देतात की आजच्या तरुणांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे. त्यांना रोजगार घेणारे नाहीतर देणारे बनण्यासाठी अग्रेसर झाले पाहिजे. सिन्हा सांगतात की,’’जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही व्यवसायात प्राविण्य मिळवायचे असेल तर प्रारंभी त्या व्यवसायाच्या संबंधित एखाद्या कंपनीमध्ये कामाचा अनुभव घेतला पाहिजे. त्या व्यवसायाचा अभ्यास करून त्याचे बारकावे समजून घेतले पाहिजे". सिन्हा पुढे सांगतात की असे अनेक आव्हानात्मक क्षण आहे ज्यांना पार करणे थोडे कठीण जाते पण आपले धैर्य, समर्पण व मेहनतीने आपण त्यावर विजय नक्कीच मिळवू शकतो. तरुण उद्यामिंना यशाचा कानमंत्र देत सिन्हा सांगतात की, "व्यवसायात येणाऱ्या अडचणींना व आव्हानांना न घाबरता त्यातून मार्ग काढला पाहिजे". व्यवसायाच्या सुरवातीला काही वर्ष महसूला पेक्षा बाजारात व लोकांमध्ये आपल्या कंपनीची पत निर्माण करणे हा आहे."

सिन्हा हे अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रीय होते. ते जनसंघापासूनच भाजपशी जोडलेले आहे. ते बीजेपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व दोन वेळेस निवड समितीचे अध्यक्ष होते. ऐतिहासिक जेपी आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच जयप्रकाश नारायण यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांची २०१४ मध्ये बिहार मधून भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यसभेत निवड झाली. आज बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. बीजेपीने २०१३ मध्ये सिन्हा यांना दिल्ली विधानसभा निवड समितीचे सह-प्रभारी बनवले जेव्हा फक्त दोन जागांमुळे भाजप सरकार नाही बनवू शकली. तसेच अनेक वेळा ते बीजेपी राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य होते.

आज आर.के.सिन्हा एसआईएस ग्रुपच्या अध्यक्षा व्यतिरिक्त भाजपचे राज्यसभा संसद तसेच समाजसेवी संस्थानांचे ते संरक्षक आहे. ते देहरादूनची प्रसिद्ध निवासी शाळा (इंडीयन पब्लिक स्कूल) चालवतात तसेच पटनाच्या आदि चित्रगुप्त मंदिराच्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे. सिन्हा हे एक समर्पित समाजसेवी आहे व ते गरीब व गरजवंताच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. ते आपल्या एका सामाजिक मोहिमेतर्गत ‘संगत-पंगत’ द्वारे सुनिश्चित करतात की कोणत्याही गरिबाचे आयुष्य हे उपचार अभावी संपायला नको व कोणत्याही हुशार मुलाचे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण वंचित राहिला नको. सिन्हा हे हुंडा विरोधी प्रथांचे कडवे समर्थक आहे. संगत-पंगत या मोहिमेंतर्गत त्यांनी अनेक सामुहिक तसेच हुंडा विरहित लग्न संपन्न केले आहे.

याच मोहिमेतंर्गत ते लवकरच दिल्ली मध्ये एक मोफत सोयी-सुविधांच्या ओपीडीची व्यवस्था करणार आहे जिथे गरीब व गरजू लोक आपला मोफत उपचार करू शकतील. लवकरच असे अनेक मोफत ओपीडी पटना, कानपूर व लखनौला उघडणार आहे.  

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

मीना बिंद्रा: ८ हजार रूपयांना ५०० कोटींमध्ये बदलणारी ‘बीबा’

'स्लम बॉय ते मिलिनेयर मॅन' सरथबाबूंची सत्यकथा

१९ वर्षीय नितीन शर्मा भारतातील सगळ्यात मोठ्या ड्राईव्हर-ऑन-डिमांड मंचाचा निर्माता


लेखक : रोहित श्रीवास्तव

अनुवाद : किरण ठाकरे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags