संपादने
Marathi

'द मोबाईल वाॅलेट' व्यवहारात सुरक्षितता देणारी 'ऑनलाईन पेमेंट' सुविधा

1st Apr 2016
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share


मोबाईल फोनद्वारे बिलाची रक्कम भरता येऊ लागल्यानं, बिलं भरताना होणाऱ्या त्रासातून लोकांची काही अंशी सुटका झालीय. यामुळे रोजच्या काही आवश्यक खर्चांकरता रोख रक्कम बाळगणे किंवा कार्डस् चा वापर टाळता येऊ लागलाय. सध्या सर्वत्र 3जी आणि 4जीचा बोलबाला आहे. परवडणाऱ्या किंमतीत या सेवा आपल्याला सर्वत्र उपलब्ध होत आहेत. दूरसंचार क्षेत्राच्या जागतिक बाजारपेठेत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात ग्रामीण भागाचा २५ टक्के हिस्सा आहे.

मुंबईत नोव्हेंबर २०१५ मध्ये 'द मोबाईल वाॅलेट' (टिएमडब्ल्यू) या ऑनलाईन पेमेंट साईटच्या कामाला सुरूवात झाली. तुम्ही म्हणाल, ऑनलाईन पेमेंटच्या भाऊगर्दित ही आणखी एक नवी साईट. पण ही साईट बारकोड आणि क्यूआर कोड तंत्रज्ञानाचा वापर करत बिलांची रक्कम चुकती करते. या अनोख्या पद्धतीमुळे ग्राहकांची सोय तर होतेच शिवाय त्यांना व्यवहारात सुरक्षितता आणि आश्वासकता मिळत आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यावसायिक या तंत्रज्ञानाचा वापर करत बिलाची रक्कम स्वीकारू शकतात. या पद्धतीने व्यवहार करताना ग्राहकांना त्यांच्या कार्डाची किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती द्यावी लागत नाही. टीएमडब्ल्यू या सर्व व्यवहाराच्या सुरक्षिततेकरता आणि पारदर्शकतेकरता २५६ बीट डेटा सुरक्षितता व्यवस्थेचा वापर करते. यामुळे ग्राहकांच्या बँक खात्यांची माहिती सुरक्षित राहते.

प्रत्येक ग्राहक आणि व्यापाऱ्याला वैयक्तिक क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा कोडचं त्यांची ओळख आहे. यामुळे व्यवहार सुरक्षित होतो. हे क्यूआर कोड ओळखण्याकरता मोबाईल एपमध्ये बारकोड स्कॅनर कार्यान्वित करण्यात आला आहे. क्यूआर कोड वाचला की, माहितीचं वितरण केलं जातं. भौगोलिक स्थानावरुन आजूबाजूच्या परिसरातील व्यापाऱ्यांची माहिती एपवर उपलब्ध होते. या स्टार्टअपद्वारे बिलांच्या देयकासोबतच ग्राहकांना बऱ्याच गोष्टी धुंडाळताही येतात. बिलांची रक्कम आणखी सुरळीत आणि सोप्या पद्धतीने भरता यावी याकरता टिएमडब्ल्यू सध्या काम करत आहे.

विनय कलंत्री, एमडी, द मोबाईल वाॅलेट  

विनय कलंत्री, एमडी, द मोबाईल वाॅलेट  


एजंल इन्वेस्टरने नुकतीच या कंपनीत 33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. टिएमडब्ल्यूचे संस्थापक विनय कंलत्रींनी सांगितलं की, “आम्ही सध्या आमच्या सुविधांमध्ये अधिक सुधारणा करुन चांगल्या संस्था आणि ग्राहकांना आमच्याकडे आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे”.

३४ वर्षिय विनय यांनी फिलाडेल्फियाच्या ड्रेक्सेल विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी संपादित केली. मुंबईतस्थित डिजी पोर्टचे संचालक आणि क्यू मोबाईलचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात. २०११ मध्ये दूरसंवाद सेवा पुरवठा करणाऱ्या क्यू मोबाईलच्या कामाला सुरूवात झाली. विनय सांगतात, “तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याची मला आस होती. आणि यातूनच मग 'द मोबाईल वाॅलेट'ची कल्पना सुचली”.

'द वाॅलेट' 2जीच्या वेगावर काम करतं. लहान लहान दुकानदारांवर त्यांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. हे व्यावसायिक अॅप आता गुगल प्ले आणि एमेझाॅन एपद्वारे एंड्रॉइड फोन आणि ब्लॅकबेरी, ओएस १० या सर्वावर उपलब्ध आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकत्ता, गुजरात आणि इंदूरमधील पंचवीस हजार व्यापारी सध्या या अॅपवर उपलब्ध आहेत. पुढील तीन महिन्यात आणखी ५० शहरांमध्ये पोहचण्याकरता ते प्रयत्न करत आहेत. तर वर्षभरात आपल्या बोर्डवर साधारण एक लाख व्यापाऱ्यांशी संधान बांधण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. सध्या कंपनीकडे ११० जणांची टीम काम करत आहे. यात तांत्रिक विभागात ६० टक्के, २० टक्के विक्री आणि विपणन तर २० टक्के एचआर आणि कायदा विभागात अशी विभागणी आहे. त्यांच्याकडे व्यापाऱ्यांशी हितसंबंध जपण्याकरता आणि वाढवण्याकरता एक स्वतंत्र विभाग आहे. आतापर्यंत बाराशे व्यापाऱ्यांची मोट जुळवून आणण्यात ही टीम यशस्वी ठरलीय.

वाॅलेटच्या सेवा-सुविधा

मोबाईल रिचार्ज, डिटिएचचं बिल भरणं, ऑनलाईन शॉपींग, प्रवास सेवा, करमणूक, पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे, किरकोळ खरेदी, आर्थिक सेवा, खानपान, भेटवस्तू आणि फुले पाठवणे या गोष्टींकरता आपल्याला टिएमडब्ल्यूचा वापर करता येतो.

रिजर्व्ह बँकेच्या मार्गदर्शकतत्वांनुसार टिएमडब्ल्यूने ग्राहकांच्या तक्रार निवारणाकरता विभाग स्थापन केला आहे.

द मोबाईल वाॅलेट टिम

द मोबाईल वाॅलेट टिम


सुरक्षा धोरण-

टिएमडब्ल्यूमध्ये खातं उघडण्याकरता ग्राहकाला नाव, इ-मेल एड्रेस, फोन क्रमांक, क्रेडीट आणि डेबिट माहिती, जन्मतारीख, पॅनक्रमांक किंवा कार्यालयीन ओळखपत्र क्रमांक अशी सर्व माहिती पुरवावी लागते. एखाद्या ग्राहकाच्या पूर्वानुमतीशिवाय त्यांची माहिती कोणत्याही मार्केटींग कंपनीला पुरवली जात नसल्याचा दावा टिएमडब्ल्यू करते.

विनय सांगतात, “ग्राहक आणि व्यापारी या दोघांना आम्ही विशिष्ट दर आकारतो. ग्राहक आणि व्यापारी यांच्या दरांमध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न आम्ही सध्या करत आहोत. यामुळे मोठ्या बँड्स सोबत हातमिळवणी करायला नक्कीच फायदा होईल”.

मोबाईल पेमेंट क्षेत्राचं वाढतं क्षितिज

सरकारच्या डिजीटल इंडिया कार्यक्रमामुळे सध्या ग्रामीण आणि तालुका भागात मोबाईल वाॅलेट  सुविधेला चांगलीच मागणी आहे. भारतीय मोबाईल वाॅलेट मार्केट फोरकास्ट अँड ऑपोरच्युनिटीज २०२० नुसार, २०२० सालापर्यंत भारतात मोबाईल वाॅलेट बाजार ६.६ अब्ज अमेरिकन डाॅलरवर पोहचण्याचा अंदाज आहे. तर सहा र्व्हेसर्चच्या अंदाजानुसार भारतातला बाजार ११.५ अब्ज अमेरिकन डाॅलरवर पोहचेल. सध्या भारतात १३५ दशलक्ष लोक मोबाईल वाॅलेटचा वापर करत आहेत. पे यु मन, पे टि एम, मोबिकविक, ऑक्सीजन आणि माय मोबाईल पेमेंटस् या कंपन्या सध्या बाजारात मोबाईल वाॅलेट सुविधा देत आहेत. आपला देश सध्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशात सध्या इ-कॉमर्स क्षेत्रातला ४० टक्के व्यवहार मोबाईल फोनद्वारे होत आहे.

युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि भारतपे यांच्या आगमनाने देशातल्या मोबाईल वाॅलेटस् ना चांगलचं आव्हान निर्माण झालयं. भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाकडून (एनपीसीआय) देशातल्या सर्व किरकोळ देयकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

यासारख्या आणखी काही स्टार्टअप संबंधित घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

असा एक स्टार्टअप जो 'कारपूलिंग' मार्फत रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी तत्पर आहे

दहावी उत्तीर्ण मेकॅनिकच्या स्वप्नाला ‘स्टार्टअप इंडिया’ने दिली हवा, निर्माण झाली, सर्वात कमी खर्चावर चालणारी ई-बाईक !

भारतीय स्टार्टअप जगतातील दोन अव्वल खेळाडू आमने-सामने

लेखिका – अपराजिता चौधरी

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags