संपादने
Marathi

जिथे कुठे तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध आहे तिथे जा : दीपक खुराना, सहसंस्थापक व सीईओ VMAX

Team YS Marathi
19th Nov 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

काम करताना सर्वात मोठा प्रश्न जो बहुतांश स्टार्टअपना किंवा व्यावसायिकांना असतो आणि निश्चलनीकरणामुळे जो प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर बोलताना मोबाईलस्पार्क२०१६ मध्ये व्हीएएमएक्सचे सहसंस्थापक आणि सीइओ दीपक खुराना म्हणतात की, “ एक व्यावसायिक म्हणून मी अनेक व्यावसायिकांना, स्टार्टअप्सना आणि लोकांना भेटतो आणि गेल्या सहा महिन्यात मी एक महत्वाची गोष्ट त्यांच्यासमोरच्या आव्हानांच्या वेगवेगळ्या त-हा पाहिल्या. ती आव्हाने भारतीय ग्राहकांच्या समज-गैरसमजामधील आहेत”.

मोबाईल आणि तंत्रज्ञानाचे जग झपाट्याने बदलत असते, जे आज आहे ते दोन वर्षात नसते. दीपक मानतात की त्यासाठी ग्राहकांचे मन ओळखण्यासाठी भारत काय आहे ते समजून घेतले पाहिजे.

image


त्यासाठी त्यांनी भारताची तीन भागात वर्गवारी केली—

*भारत-३ ५५% भारतीय, ६५०दशलक्ष लोकांचे मासिक उत्पन्न १५००रु.

*भारत-२ ३०% भारतीय, ४५०दशलक्ष लोकांचे मासिक उत्पन्न ८०००रु.

*भारत-१ १५% भारतीय.

भारत हा कमी एपीआरयू ( सरासरी मिळकत प्रति वापरकर्ता) बाजारपेठ आहे, समांतरपणे भारतात ३ बाजारपेठ असे असले तरी मोठ्या प्रमाणात बहुतांश डिजीटल कंपन्यानी सर्वात लहान भारत१ मधील ग्राहकांवर लक्ष दिले आहे. आणि तुम्ही याचा विचार केला तर मुल्यवर्धित मागणी ही एपीआरयूच्या सद्यस्थिती इतकी येते. दीपक म्हणतात की,

“ जर आपण एफएमसीजी हिश्श्याकडे पाहिले तर, जो बाजाराचा महत्वाचा भाग आहे, तुम्हाला दिसेल की त्यांना मोठी आणि चांगली बाजारविक्री मिळते आहे ज्यावेळी ते शाम्पूची पाकीटे विकतात, आणि तेच तुम्ही मोबाईलच्या बाजारात पहाल तर तुम्हाला दिसले की ‘छोटा रिचार्ज’ हा तेथे लोकप्रिय झालेला पहायला मिळेल. असे असले तरी आज मोठ्या प्रमाणात बहुतांश डिजीटल कंपन्या आणि अॅप निर्माते भारत १ वर जास्त जोर देताना दिसतात.”

भारतीय ग्राहकांनी केलेल्या फोन्सच्या वापराबाबत बोलताना दीपक म्हणतात की, ५५% भारतीय (भारत ३) स्मार्ट फिचरचे फोन वापरतात. भारत-२ मध्ये १५हजारपेक्षा कमी किमतीचे जे एकूण वापराच्या २३ टक्के आहेत, आणि भारत-१ मध्ये लक्षणीय अल्पसंख्याक लोक १५हजारपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन वापरतात. आणि तरीही बहुतांश अॅप्स आणि सुविधा भारत१ च्या घेत असतात.

दीपक विश्वास करतात की, भारताच्या मोबाईल जगताची उभारणी म्हणजे आपल्या विचारांना विस्कळीत करणे झाले आहे.आज येथे काही कंपन्या आहेत ज्या भारत१च्या पलिकडे जावून बाजाराचा विचार करतात. तसेच दीपक म्हणतात,

“ उद्योजक आणि ऍप्सचे निर्माते यांनी हे समजण्याची गरज आहे की, भारत तीन मध्ये मोठी बाजारपेठ आहे, ज्याकडे आपण आजवर दुर्लक्ष केले आहे. हाच एकमेव मार्ग आहे ज्याने आपण बाजार उभा करु शकतो तो म्हणजे आपल्याला ग्राहक समजून घेता आले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी काम करता आले पाहिजे.”

लेखिका : सिंधू कश्यप

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags