संपादने
Marathi

हॉस्टेलच्या खोलीतून आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थीनी चालविणार स्टार्टअपचे कार्यालय!

Team YS Marathi
22nd Aug 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर, अनोख्या प्रकारच्या योजनेमुळे प्रकाशात आले आहे, ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेलच्या खोल्यातून व्यावसायिक संस्थाचे कार्यालय सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली. 


Representational Image. Source: Shutterstock

Representational Image. Source: Shutterstock


पार्थ प्रतिम चक्रवर्ती, संचालक आय आय टी खरगपूर, यांच्या माहिती नुसार या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कार्यालय कमी खर्चात थाटता येणार आहे. संस्थेच्या ६३व्या समारंभात ते बोलत होते, ते म्हणाले की, “आम्ही विद्यार्थ्यांना अशा योजनेची सुविधा देत आहोत ज्यात त्यांना त्यांचे हॉस्टेल मधील राहत्या खोलीत कार्यालय सुरू करता यावे. त्यामुळे त्यांना त्यासाठी नव्या उद्योगाचे कार्यालय कुण्या बिझनेस पार्कमध्ये घ्यावे लागणार नाही”

व्यापार व्यवसायात विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे. दोन दिवसांचे हे संमेलन ५ऑगस्ट २०१७ रोजी पार पडले. त्यात २५०० विद्यार्थ्यांना यावेळी आयआयटी-के पदवीदान करण्यात आले.

या बाबतच्या वृत्तानुसार, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश के सर्राफ, संस्थेचे सदस्य आणि इंफोसिसच्या संस्थापक सदस्या सूधा एस मूर्ती यावेळी उपस्थित होते.

चक्रवर्ती म्हणाले की, संस्थेने विदेशी अभ्यासक्रमांना किमान दहा टक्के स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षांच्या काळात त्यांना वैश्विक स्तरावर संस्थेला नेण्याची योजना आहे. संचालक म्हणाले की पदव्योत्तर आणि आणि पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या फेररचनेचा देखील नजिक भविष्यात विचार केला जाणार आहे.

या बाबतच्या वृत्तानुसार ते म्हणाले की, “ आम्ही पूर्णत: पदवीपूर्व अभ्यासक्रमात पूर्णत: बदल करणार आहोत आणि काही महत्वाचे अभ्यासक्रमच यात समाविष्ट करणार आहोत ज्यात लवचिकता आहे आणि जागतिक दर्जाची स्पर्धात्मकता आहे.” 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags