‘दंगल’ पासून प्रेरणा घेत, या आखाड्याने नुकतेच महिला कुस्तीगीरांना दरवाजे खुले केले!

‘दंगल’ पासून प्रेरणा घेत, या आखाड्याने नुकतेच महिला कुस्तीगीरांना दरवाजे खुले केले!

Tuesday August 08, 2017,

2 min Read

मुलींना एकेकाळी काही क्रीडाप्रकारापासून दूर ठेवले जात होते, जसे की कुस्ती. मात्र आता काळ बदलत जात आहे आणि महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. अनेक महिलांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. दंगल सिनेमा जो दोन प्रातिनिधिक भगिनींच्या संघर्षाची कहाणी आहे- गीता आणि बबीता फोगाट- यांनी महिलांच्या कुस्ती प्रकाराला प्रेरणा दिली आहे. या सिनेमातून प्रेरणा घेत स्वामीनाथ आखाडा या वाराणसी येथील तुलसीघाट मधील कुस्तीच्या आखाड्याने महिलांसाठी कवाडे खुली केली आहेत. 


Representational Image. Source: YouTube

Representational Image. Source: YouTube


आखाड्यांचे जनमानसात आदराचे स्थान आहे. मात्र यापूर्वी तेथे केवळ कुस्ती प्रकार पुरूष पैलवानांसाठीच होता. या परंपरेला छेद देत, स्वामीनाथ आखाड्याने मुलींच्या कुस्तीचे आयोजन केले आणि प्रायोजकत्व केले. यावेळी उपस्थितांना कुस्ती मधल्या काही कौशल्याचे दर्शन झाले.

या मुलींना जिंकण्याचे डावपेच माहिती नव्हते. मात्र त्यांच्यात यासाठीचा उत्साह मात्र ओसंडून वाहात होता आणि त्यामुळे त्यांना हा खेळ शिकून घेण्याची ओढ लागली आहे. आता त्या स्पर्धेत जावून आल्यानंतर त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मनात या खेळाचे कुतूहल आणखी वाढले आहे.

हा आखाडा तुलसीदास यांच्या काळात सुरू झाला आहे, ज्यांनी नेहमी स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार केला. स्वामीनाथ आखाड्याचे डॉ. विश्वंभरनाथ मिश्रा यांचा विश्वास आहे की, महिलांना देखील शरीर आणि मनाने खंबीर आणि समर्थ राहण्यासाठी आखाड्यात जावून स्वास्थ कमाविले पाहिजे. त्यांच्या मते या महिलांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी देखील आखाडा नेहमीच उपयुक्त राहणार आहे.

संकटमोचन फाऊंडेशन, जे आयोजक होते त्यांनी दंगलचे आयोजन केले आणि त्यांना प्रोत्साहन देत हा उपक्रम साजरा केला. सुमारे ५० पैलवान या आखाड्यात रोज सराव करतात. आणि महिला पैलवानांचा विश्वास आहे की त्यांना चांगल्या सुविधा आणि संधी मिळाली तर यश मिळवण्यासाठी आता कुणी रोखू शकणार नाही!