संपादने
Marathi

खान्देशी पापडाच्या रूचीने स्वत:सोबत अनेकजणींना रोजगार मिळवून देणा-या संगीता फुलपगारे

Nandini Wankhade Patil
12th May 2016
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share

तुमच्या रोजच्या जेवणाच्या ताटातील जिन्नस किती पौष्टिक आणि रुचकर असतील याची तुम्ही नेहमीच काळजी घेत असाल. अशा पदार्थांना बनविण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ते बाजारातून घ्यावे लागतात. पण हे जिन्नस, त्यांचा दर्जा याबाबत शंका असेल तर तुमच्या जेवणाचा स्वाद बिघडू शकतो आणि आरोग्य देखील. मात्र संगिता फुलपगारे यांच्या सारख्या मेहनती महिलांच्या स्वयंरोजगारामुळे तुमची ही अडचण दूर झाली आहे. तुम्हाला चविष्ट रुचकर आणि दर्जेदार पापड आणि इतर जिन्नस त्या उपलब्ध करून देताता आणि तेही अगदी माफक दरात. त्यांच्या या उद्योगाची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न युअर स्टोरीने केला. तेंव्हा त्या म्हणाल्या की, “ शिलाईची कामे मिळेनाशी झाली म्हणून या व्यवसायाकडे वळले या व्यवसायाने जे दिले ते पूर्वीच्या कामातून कधीच मिळाले नसते”. संगिताताई सांगत होत्या.

image


सुरवातीला आपल्या कुटुंबाला हातभार लावावा म्हणून संगीताताई शिवणकाम करत होत्या, ब्लाऊज शिवणे, फॉल-बिडींग करणे, साड्या विकणे यातून त्यांची बऱ्यापैकी मिळकत होत होती. शिलाईकामंही त्यांना भरपूर मिळत होती, मात्र हळूहळू आजूबाजूच्या सर्वच बिल्डिंगमध्ये शिवणकाम व्यवसाय सुरु झाला आणि स्पर्धा वाढली. घर तिसऱ्या मजल्यावर असल्याकारणाने ग्राहक सोयीच्या ठिकाणी शिवणकाम करू लागले त्यामुळे संगीताताईचे शिवणकाम फारच कमी झाले. त्यांचा मुलगा विपुल व मुलगी प्रियांका दोघंही इजिनिअरिंगचे विद्यार्थी, त्यामुळे खर्च वाढत होता. त्यांच्या यजमानांची सरकारी नोकरी, त्यामुळे सगळं काही जेमतेम असायचं. मुलांच्या शिक्षणाला पैसा जास्त लागत होता. त्या अठरा वर्षांपासून करत असलेला व्यवसाय जवळजवळ संपुष्टात आला होता, त्यामुळे नैराश्य आले होते. तरीही न डगमगता त्यांनी नवीन व्यवसाय करायचं ठरवलं. त्याचवेळी त्यांना ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’तर्फे मोफत व्यावसायिक मार्गदर्शन आयोजानासंदर्भात माहिती मिळाली. त्या नित्यनियमाने दर महिन्याच्या कल्याण येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाला जाऊ लागल्या. या कार्यक्रमात त्यांना प्रतिष्ठानच्या संस्थापिका मीनलताई मोहाडीकर आणि वैशाली कांदळगावकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. मग सुरु झाला बाजारपेठेचा अभ्यास. मीनलताई मोहाडीकर यांच्या ‘कनझ्युमर शॉपी’मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ठाण्यातल्या एका प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. तिथल्या स्टॉलधारकांशी चर्चा केली, तिथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंची, पदार्थांची माहिती मिळवली. तिथेच विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या पेणच्या पापडाची त्यांना भुरळ पडली. पेणचे पापड पाहून आपणही खानदेशातील चविष्ट पापड का करून विकू नये असे संगीताताईना वाटले. ठरलं.. व्यवसाय काय करायचा ते... पक्कं झालं.. जे बाजारात उपलब्ध नाही तेच पापड तयार करण्यासाठी संगीताताई सज्ज झाल्या.

image


सुरवातीला खानदेशातील पापड तयार करून विक्री करण्यासाठी त्यांनी त्यांच्या गावी शिरपूरला राहणाऱ्या वहिनींची मदत घेतली. तांदूळ पापड, गहू-तांदूळ पापड, गहू-तांदूळ मसाला पापड, गव्हाच्या कुरड्या, उडीद पापड, नाचणी पापड. गव्हाच्या शेवया, साबुदाणा पापड, साबुदाणा चकली, वेफर्स हे सर्व पदार्थ त्या घरगुती तयार करू लागल्या. शिरपूर गावातही काही महिलांच्या मदतीने पापड तयार होऊ लागले. पापड तर तयार झाले पण विक्री करायची कुठे हा यक्षप्रश्न होता. मात्र म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग मिळतोच. कल्याण येथेच माघी गणपतीची यात्रा भरते. त्या यात्रेजवळच्या बसस्टँडजवळ संगीताताईनी अन्य चार महिलांसमवेत स्टाॅल लावला. त्या स्टाॅलला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला, सुरवातीलाच १२हजार रुपयांची पापड विक्री झाली. मग मात्र संगीताताईचा उत्साह वाढला, त्यानंतर रोटरी क्लब प्रदर्शनातही २५ हजार रुपयांची पापड विक्री झाली.

image


दिवसेदिवस त्यांच्या पापडाची मागणी वाढू लागली. मुंबई आणि मुंबई उपनगरात होणाऱ्या प्रदर्शनात त्या पापड आणि अन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवतात. तसेच दुकानांमधुनही हे जिन्नस विक्रीसाठी ठेवले जाते. “ सध्या आमचा व्यवसाय नवीन आहे मात्र आमच्या पापडांना खूप मागणी आहे, आमच्या पापडाचे वैशिष्ट म्हणजे एकदा का ग्राहकाने आमच्या पापडाची चव चाखली की, ते पुनःपुन्हा पापड खरेदी करतात. प्रदर्शनामध्ये लोकं आमचा स्टाॅल शोधत येतात. एकदा सौ विचारे यांनी आमच्या स्टाॅलवरचे पापड खरेदी केले. त्या पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखी जास्त पापड घेऊन गेल्या आणि तिसऱ्या दिवशी तर चक्क मैत्रीणींना घेऊन आल्या. कारणही तसंच होतं त्यांना पापडाची चव तर आवडलीच होती शिवाय आमचे सर्वच पापड मायक्रोवेव्हमध्ये बेक होतात किवा गॅसवर भाजून किवा शेकून खाता येतात”. संगीताताई उत्साहाने सांगत होत्या. जानेवारी ते जुन २०१५ दरम्यान ९५ हजार रुपयांच्या पापडाची विक्री झाली होती. एवढे रोख पैसे त्यांना शिलाई कामातून सुद्धा कधी मिळाले नसल्याचे त्या सांगतात.

image


व्यवसाय करणे म्हणजे सोपे नाही. त्यात सातत्य असणे आवश्यक असते. मागणी तिथे वेळीच पुरवठा केला तरच ग्राहक टिकून राहतात. संगीताताईंच्या पापडाला चांगली मागणी होती, मात्र त्या पुरवठा करण्यास कमी पडत होत्या. गावाकडे काम करणाऱ्या महिलांना जास्त मेहनत पडत होती. दिवसाला चार किलो पेक्षा जास्त पीठ मळले जाऊ शकत नव्हते. महिलांना जास्त पैसे हवे होते, जे संगीताताईंना देणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन ठिकाणच्या प्रदर्शनाला त्यांना जाता आलं नाही. त्या निराश झाल्या. तांत्रिक बाबीत त्या कमी पडत होत्या. त्यामुळे त्यांनी या व्यवसायातून माघार घ्यायचे ठरवले. हताश झालेल्या संगिताताईंनी आम्ही उद्योगीनीच्या वैशालीताईसमोर आपली समस्या मांडली, तेव्हा त्या म्हणाल्या, “व्यवसाय बंद करण्यापेक्षा तो सुरळीत कसा करता येईल यावर उपाय शोधून काढा”. पीठ मळणी आणि पापडाच्या मशीनचा शोध त्यांनी घ्यायला लावला. “मग मी मशीनचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यासाठी मी धुळे जिल्ह्यात अमळनेरला जाऊन चौकशी केली मशीन खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये भांडवलाची आवश्यकता होती. एवढे पैसे उभे करणे शक्य नव्हते, मात्र या अडचणीवरही मार्ग निघाला वैशालीताई आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद पुंडलिक यांनी पैशांची मदत देऊ केली. काही पैसे घरातून घेतले. पण कल्याणमध्ये उत्पादनासाठी लागणारी जागा, मजुरी याचा खर्च जास्त होता, म्हणून मशीन शिरपूरला गावीच ठेवावी असं मी ठरवलं. मशीन तिथे ठेवल्यामुळे तिथल्या स्थानिक महिला बचत गटाला काम मिळालं. या मशीनद्वारे २० मिनिटात चौदा किलो पीठ मळून तयार होतं तर तीन तासात तीन हजार पापड लाटले जातात”, संगीताताई सांगत होत्या.

या मशीनमुळे पापड उत्पादनाचा वेग वाढला. नवनवीन बाजारपेठ मिळवणं सुरु झालं. अनेक दुकानांमध्ये पापड विक्रीसाठी ठेवले जाऊ लागले. रोजची विक्री तर होतेच आहे, याशिवाय वीस टक्के कमिशनवर इतर महिलांनाही पापड विक्रीसाठी दिले जातात. भविष्यात संगीताताईंना आपल्या पापडाचं ब्रँडींग करायचं आहे. मॉलमध्येही त्यांचे पापड विकले जावे यासाठी त्या प्रयत्नशील आहे.

त्यांच्या या कामात त्यांच्या कुटुंबियांची त्यांना साथ मिळते. त्यांचे पती, मुलगा व मुलगी हे स्टाॅल सांभाळण्यापासून, पॅकेजिंग ते शिरपूरवरून आलेले उत्पादन पहाटे चार वाजता घेऊन येणं यात मदत करतात.

दुबई येथे ‘आम्ही उद्योगिनी’ तर्फे आयोजित प्रदर्शनात, संगीताताईंच्या पापडाचे सॅम्पल तसेच माहितीपत्रक ठेवण्यात आले होते. तिथेही अनेकांनी या पापडाची मागणी केली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे संगीताताई दुबईला जाऊ शकल्या नाही, मात्र भविष्यात त्यांचे पापड परदेशातही विकले जातील याची त्या खात्री बाळगतात. युवर स्टोरी तर्फे त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

भारताची खाद्यसंस्कृती एका क्लिकवर उपलब्ध करुन देणारे 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'

अभियांत्रिकीचे शिक्षण नसूनही वीजवितरणाच्या डिपी तयार करणा-या कोट्यावधीच्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या ‘नेहा म्हैसपूरकर’!

पैश्यांसाठी झाडू-पोछा करणाऱ्या इंदुमतीताई आज इतर महिलांना बनवत आहेत आत्मनिर्भर

Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags