संपादने
Marathi

चमक कपड्यांची आणि व्यक्तिमत्वाचीही

Narendra Bandabe
20th Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मुंबईसारख्या शहरांमध्ये धोबी आपल्या दैनंदिन जगण्यातला महत्वाचा भाग बनलाय. रोज सकाळी किंवा संध्याकाळी ठरलेल्यावेळी हा धोबी घरी येतो, कपडे घेऊन जातो. त्यानंतर धोबीघाटावर आपल्या ठराविक जागेत कपड्यांना बडवून बडवून धुतो. त्यांना इस्त्री करतो आणि नंतर ते ग्राहकांपर्यंत पोचवतो. २००८ पर्यंत हे चित्रं असंच कायम होतं. पण नंतर ते बदलत गेलं. मुंबईत दोन प्रकारच्या लॉन्ड्री सर्विस पहायला मिळायच्या. एक तर पंचतारांकीत हॉटेलमधली अगदी हायएन्ड, त्यांची सर्विस सर्वसामान्यांना न परवडणारी. दुसरी म्हणजे हा लोकल धोबी. यामध्ये काहीच नव्हतं. हिच गरज ओळखून व्हिलेज लॉन्ड्री सर्विसनं स्वस्त आणि किफायतशीर लॉन्ड्री सर्विस सुरु केली. या सर्विसला नाव देण्यात आलं. ‘चमक डिरेक्ट’.

image


सुशील मुणगेकर यांनी २०११ ला व्हिलेज लॉन्ड्री सर्विसच्या एमडी आणि सीईओ पदाची धुरा सांभाळली. त्यावेळी त्यांच्या दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर भारतीय लॉन्ड्री ग्राहकाला घरातून कपडे घेऊन जाणं आणि ते परत आणून देणं आवडतं. तो त्याच्या सवयीचा भाग झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे लॉन्ड्रीला कपडे देणं म्हणजे केमिकल वॉश करणं. जेणेकरुन कपडे अगदी नव्यासारखे होतात. पण ते तेव्हढं खरं नाही. चमक डायरेक्टला हाच विचार बदलायचा होता. ओले कपडे धुण्यामागचं तंत्र लोकांना कळावं हा चमकचा उद्देश होता. दुसरीकडे घरात कपडे धुताना कपड्यांचा जो पोत असतो आणि ज्या पध्दतीनं कपडे धुतले जायला हवेत याकडे दुर्लक्ष केलं जातं. यातून काही दिवसात कपड्यांचं नुकसान व्हायला लागतं. याला चमक डिरेक्ट हा उत्तम उपाय आहे

image


व्हिलेज लॉन्ड्री सर्विसनं कपडे धुण्याचं पारंपारिक तंत्रंच बदलून टाकलं. जेव्हा चमक डिरेक्टचे पिक-अप एजन्ट तुमच्याकडे कपडे घ्यायला येतात तेव्हा कपड़े बघून कुठल्या कपड्यांना ड्राय क्लिनींगची गरज आहे आणि कुठल्या कपड्यांना फक्त वेट क्लिनींगची गरज आहे हे तुम्हाला सांगितलं जातं. त्यानुसार त्याची विभागणी करण्यात येते. त्यानंतर या कपड्यांवर धुण्याची प्रक्रिया करण्यात येते. धुताना योग्य डिटर्जेन्टचा वापर केला जातो. त्यानंतर इस्त्री करुन त्याचं अगदी नव्यासारखे पॅकींग केलेले कपडे तुमच्या घरी डिलीवर केले जातात. प्रत्येक घरातल्या कपड्यांना बारकोडींग केलं जातं. यामुळं कपड्यांची अदलाबदलसारखे प्रकार होणं टाळता येतं. मुंबईसारख्या शहरातल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाणारा हा व्हिलेज लॉन्ड्रीचा ग्राहक वर्ग आहे. आता या ग्राहकाला सर्वसाधारण धोबी आणि चमक डिरेक्टमधला फरक कळू लागलाय. चमकमध्ये धुतलेले कपडे जास्त उठावदार दिसतात शिवाय जास्त दिवस या कपड्यांचं नवंपण जपलं जातं हे विशेष.

image


ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्य़ा प्रकारचे पॅकेज दिले जातात. हे पॅकेज आठवड्यापासून ते वर्षांपर्यंतही आहेत. आता चमक डिरेक्टचे वेगवेगळ्या शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags