संपादने
Marathi

महिला सक्षमीकरणाचा झेंडा फडकवत, ‘दिल्ली ते लंडन’च्या या’त्री’ विमेन बिय़ॉंड दी बॉन्ड्रिज!!

Team YS Marathi
8th Dec 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

तीन महिला, २३,८०० किलोमीटर, १७ देश, ९७ दिवस आणि रस्त्यावरून करण्यात आलेला आगळावेगळा प्रवास. बंगळूरू येथे राहणाऱ्या तीन महिला, निधी तिवारी, रश्मी कोप्पर आणि डॉ. सौम्या गोयल यांनी भारताची राजधानी दिल्ली येथून लंडन पर्यंतचा आव्हानात्मक प्रवास रस्त्यामार्गे केवळ एका स्कॉर्पियो गाडीने पूर्ण करून एक आगळावेगळा ‘कार’नामा करण्यात यश मिळविले आहे. २३ जुलै रोजी इंडिया गेट स्थित मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडिअम येथून सुरु झालेला हा प्रवास ९५ दिवसानंतर २७ ऑक्टोबरला लंडनला पोहोचून संपला. यासोबतच या महिलांनी दाखवून दिले की, विवाहित आणि मुलबाळ असून सुद्धा त्या कुठल्याही प्रकारे कमजोर नाहीत आणि त्या काहीही करू शकतात.

image


या प्रवासाची सर्वात मनोरंजक बाब ही आहे की, या प्रवासासाठी निघालेल्या या महिला त्रिकुटाकडे संपूर्ण प्रवासासाठी केवळ एकच वाहन होते आणि केवळ एकच महिला चालक निधी तिवारी यांनी जवळपास २४ हजार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान वाहन चालविण्याची ‘कमान’ आपल्या हातात घेतली होती. वास्तवात हे पूर्ण अभियान आणि प्रवास निधी यांच्याच डोक्यातील कल्पना होती आणि लांब प्रवासावर निघणे त्यांची जुनीच आवड आहे. एका सैन्य अधिका-याची पत्नी आणि दोन मुलांची आई निधी तिवारी एक प्रसिद्ध आणि व्यावसायिक शिक्षक होण्याव्यतिरिक्त ऑफ रोड जीपर देखील आहेत. ज्यांनी जीपचा प्रवास करण्याव्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या आणि अधिक उंचीच्या भागात ड्रायविंग करण्यात प्राविण्य प्राप्त केले आहे. युअर स्टोरी सोबत संवाद साधताना निधी सांगतात की, या प्रवासावर जाण्यापूर्वी मी पश्चिमी घाटाव्यतिरिक्त भारतातील हिमालय राज्य उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि नेपाळ, भूतान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि केनिया मध्ये ड्रायविंग केली होती. मी विवाह होण्यापूर्वीच बंगळूरूमध्ये जीपिंग केले होते आणि त्या दरम्यान मला बंगळूरूची पहिली महिला जीपर देखील म्हटले जात होते.

image


विवाहानंतर निधी दिल्लीला आल्या. मात्र प्रवास आणि ड्रायव्हिंगसाठी असलेले त्यांचे प्रेम आणि महत्वाकांक्षा कमी झाले नाही. तसेच त्यांच्या सैन्य अधिकारी पतीने निधी यांच्या आशांना पंख लावण्यात त्यांची मदत देखील केली. निधी सांगतात की, विवाहानंतर त्यांनी आपल्या पतीसोबतच स्वतः गाडी चालवून जवळजवळ संपूर्ण देशाचा प्रवास केला. त्यानंतर वर्ष २००७ मध्ये त्या पहिल्यांदा गाडी चालवून लडाखला घेऊन गेल्या आणि तेंव्हापासून त्यांना उंचीच्या क्षेत्रांवर गाडी चालविण्यास आनंद वाटायला लागला. त्या पुढे सांगतात की, “ मागीलवर्षी मी आपल्या जीपने लडाखच्या प्रवासावर गेले होते आणि त्या दरम्यान मी कठीण प्रसंगांचा सामना केला आणि अन्य साथीदारांची साथ सुटल्यानंतर मी सुरक्षित एकटीच आपल्या जीपने परतण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मी निर्णय घेतला की, आता मी संपूर्ण देशाची भ्रमंती केली आहे तर, मला आपले लक्ष्य आता देशाबाहेर भ्रमंती करण्याकडे वळविले पाहिजे.”

image


लडाखवरून परतल्यानंतर त्यांनी आपली जुनी मैत्रीण स्मिता राजाराम सोबत याबाबत संवाद साधला आणि खूप विचारविनिमय केल्यानंतर महिलांमध्ये ड्रायव्हिंग बद्धल जागरूकता निर्माण करण्याच्या लक्ष्यासोबत वूमन बियॉंड बाउन्ड्रीज (Women Beyond Boundaries) ची निर्मिती केली. निधी सांगतात की, भारतात लोकांच्या डोक्यात महिलांच्या वाहन चालाविण्यावर अनेक शंका-कुशंका आहेत आणि अधिकाधिक महिला देखील स्वतः गाडी चालविण्याबाबत शंका निर्माण करतात. भारतीय महिला गाड्यांच्या स्टियरिंगपासून दूर राहण्याच्या कारणाबाबत सांगताना त्या सांगतात की, “सर्वात पहिले तर, भारतीय महिलांमध्ये ड्रायव्हिंगच्या कौशल्याची कमतरता आहे. त्याव्यतिरिक्त येथे महिलांना वाहन हातात देण्याच्या संधी देखील खूप कमी मिळतात. ज्यामुळे त्यांच्यात गाडी चालविण्याबाबतचा आत्मविश्वास खूप कमी असतो. आमचा विचार या संघटनेच्या माध्यमातून महिलांमध्ये ड्रायविंग प्रती आवड निर्माण करण्याचा, विकास करण्याचा आणि त्याव्यतिरिक्त त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्याचा देखील आहे. जेणेकरून त्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगातील कुठल्याही भागात गाडी चालविण्यासाठी सक्षम बनतील.एकदा ‘वूमन बियॉंड बाउँड्री’ज़ची निर्मिती केल्यानंतर आता त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते की, या अवाढव्य खर्चाच्या ड्रायव्हिंग अभियानासाठी एक प्रायोजक शोधण्याचे. निधी सांगतात की, त्यांच्यासाठी हे काम सर्वात अधिक आव्हानात्मक होते आणि एक प्रायोजक शोधण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. निधी पुढे सांगतात की, “अनेक देश, कित्येक दिवसांचा प्रवास, दुर्गम रस्ते आणि एकटी महिला. अधिकाधिक प्रायोजकांच्या मनात ही सर्वात मोठी शंका होती. त्याव्यतिरिक्त अधिकाधिक लोकांनी मला हे देखील दाखवून दिले की, मी जो विचार करते आहे, ते करणे शक्यच नाही. मात्र, असे लोक मला अजून प्रेरीतच करत होते.”

image


त्या दरम्यान एके दिवशी त्यांची बातचीत जुन्या गाड्यांची खरेदी करण्याच्या कामात सक्रिय असलेले महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्सच्या संचालकांसोबत झाली, ज्यांनी या अभियानात रुची दाखविली. मात्र ते देखील निधी यांच्या एकटे असण्यावर शंका उपस्थित करत होते. निधी पुढे सांगतात की, “महिंद्रा वाल्यांसोबत माझी खूप सकारात्मक चर्चा झाली. मात्र, त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, प्रवास खूप लांब आणि जोखमीचा आहे आणि तुम्ही जर या प्रवासावर आपल्या काही अन्य साथीदारांना घेऊन जाणार असलात तरच आम्ही या प्रवासाला प्रायोजकत्व देऊ.” त्याव्यतिरिक्त लेनोवोने देखील आम्हाला प्रवासाच्या सुरवातीला टीमफोन, थिंकपैड आणि अन्य उपकरण देखील देण्याचे आश्वासन दिले, ज्याच्या मदतीने आमचा प्रवास खूपच सोयीचा झाला.

image


त्यानंतर निधी यांनी शाळेतील आपल्या दोन मैत्रिणी रश्मी कोप्पर आणि डॉ. सौम्या गोयल यांना संपर्क साधला, ज्यानंतर त्या त्वरित या आव्हानासाठी माझी साथ देण्यास तयार झाल्या. एका मुलीची आई रश्मी कोप्पर बंगळुरूच्या एमेस रामैया विद्यापीठात हॉटेल मॅनेजमेन्टची प्राध्यापिका होण्याव्यतिरिक्त साहसी खेळांची देखील शौकीन आहेत आणि लांब पल्ल्याची एक शौकीन चालक देखील आहे. यांच्या व्यतिरिक्त या समुहाची तिसरी साथीदार दोन मुलांची आई डॉ. सौम्या गोयल एक फिजिकल थेरपिस्ट आहे, जी प्रवास करण्यात रुची ठेवते.

image


महिलांच्या या समूहाने स्वतःला प्रवासासाठी मानसिक आणि शारीरिकरित्या तयार केल्यानंतर पुन्हा एकदा प्रायोजकांशी संपर्क साधला. निधी पुढे सांगतात की, आम्ही तयार होताच महिंद्राने आम्हाला त्यांची एक जुनी स्कॉर्पियो गाडी दिली, जी जवळपास ६८५०० किलोमीटर चालली होती. मी मागील अनेक काळापासून गाडी चालवत असल्यामुळे मला ही गोष्ट चांगली माहित आहे की, अशा प्रकारच्या प्रवासासाठी ही खूपच शानदार गाडी आहे आणि २ लाख किलोमीटर पर्यंत चाललेली गाडी देखील आमच्या प्रवासासाठी फायदेशीर ठरेल. त्याव्यतिरिक्त आम्हाला अनेक देशांमधून जायचे होते आणि अशातच आम्हाला केंद्र सरकारच्या विभिन्न मंत्रालयातून आणि कार्यालयातून संपूर्ण सहकार्य मिळाले आणि सकारात्मक वातावरण देखील मिळाले.”

image


अखेर २४ जुलैच्या सकाळी केंद्र सरकारचे दोन मंत्री अनंत कुमार आणि सर्वानंद सोनेवाल यांनी महिलांच्या या त्रिकुटाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. आणि त्यांनी पहिल्याच आठवड्यात म्यानमार पर्यंतच जवळपास २५०० किलोमीटरची यात्रा पूर्ण केली. त्यानंतर या महिला चीन, किर्गीजीस्तान, कजाकिस्तान, उजबेकिस्तान, रशिया, युक्रेन, पोलंड, चेक प्रजासत्ताक, जर्मनी आणि बेल्जियम इत्यादी देशातून फिरून अखेर २७ ऑक्टोबरला २३८०० किलोमीटरचा प्रवास करीत लंडनला पोहोचल्या.

image


निधी सांगतात की, सुरुवातीस त्यांचा विचार नेपाळ गाठून पुढे निघण्याचा होते. मात्र, तेथे नुकत्याच आलेल्या भूकंपामुळे त्यांना म्यानमार वरून जावे लागले. म्यानमार वरून त्यांचा रस्ता देखील सहज नव्हता आणि तेथे आलेल्या भयंकर पुरामुळे त्यांना जवळपास एक महिन्यापर्यंत पुढे प्रवासावर निघण्यासाठी वाट पहावी लागली. निधी सांगतात की, “ अनेक लोकांनी आम्हाला सल्ला दिला की, आम्हाला परतले पाहिजे आणि पुढीलवर्षी पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या दोन मैत्रिणी काही दिवसांसाठी परतल्या. मात्र, मी या प्रवासाला पूर्ण करण्याच्या आपल्या निर्णयावर कायम होते आणि तेथेच थांबून राहिले. अखेर काही दिवसानंतर रस्ता खुला झाल्यावर मी एकटीच पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि मेंडलिन पोहोचल्यावर रश्मी आणि सौम्या पुन्हा एकदा माझ्यासोबत प्रवासामध्ये सामिल झाल्या.”

म्यानमारमध्ये जवळपास ४ आठवडे थांबल्यानंतर त्यांच्याकडे व्हिसा संबंधित मुद्दे आले आणि काही देशात यामुळे त्यांचा थांबण्याचा कालावधी देखील संपला. निधी सांगतात की, अशातच विभिन्न देशात असलेले दूतावास, तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या समोर आलेल्या समस्यांचा सामना करत प्रवास पूर्ण करण्यात यशस्वी झाल्यात.

निधी सांगतात की, “ या प्रकारचा प्रवास करण्याचा सरळ अर्थ अधिकाधिक दुर्गम क्षेत्रातून प्रवास करण्याव्यतिरिक्त खड्डे असलेले रस्ते, जंगल, नदी-नाले यांच्यापेक्षा असामान्य क्षेत्रात प्रवास करण्याचा आहे, जो खूपच रोचक असण्यासोबतच अनेक ठिकाणी खूपच भयावह देखील ठरू शकतो. मात्र, मी लहानपणापासूनच असे करण्यात जिद्दी आणि निडर राहिलेली आहे. माझ्या आई-वडिलांनी नेहमीच मला पुढे वाढण्यासाठी प्रेरित केले आहे. त्याव्यतिरिक्त एका सैनिकाची पत्नी असल्यामुळे मला असे काम करण्याची अधिकाधिक प्रेरणा मिळाली.”

निधी सांगतात की, या संपूर्ण प्रवासादरम्यान आम्हाला प्रती व्यक्ती ८ लाख रुपये खर्च आला आहे, जो प्रायोजकांकडून खर्च करण्यात आलेल्या रकमेपेक्षा खूपच वेगळी रक्कम आहे. भविष्याच्या योजने बद्दल बोलताना त्या सांगतात की, आमचा विचार येणाऱ्या दिवसात ‘वूमन बियॉंड बाउँड्री’ज़चा विस्तार करत अधिकाधिक महिलांना आपल्या सोबत सामिल करणे आणि त्यांना ड्रायव्हिंगसाठी प्रेरित करणे आहे. त्याव्यतिरिक्त दिल्ली ते लंडन पर्यंतचा प्रवास यशस्वी केल्यानंतर आम्ही अशाच काही अभियानावर योजना आखण्याचा विचार करत आहोत.”

अखेर निधी सांगतात की, “प्रवास हा किती लांब पल्ल्याचा आहे हे केवळ अनुभव, दृश्य, मानसिक आणि शारीरिक क्षमता यांवरच अवलंबून असते. प्रवासाचा अर्थ आपल्या क्षमतांना ओळखत स्वतःसाठी एका लक्ष्याला निर्धारित करणे आणि त्याला गाठण्यासाठी स्वतःला प्रेरित करणे आहे. मग ते दुसरे लोक असो किंवा स्वतःमधील बदलणारे नवे व्यक्तीमत्व का नसो. 

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags