संपादने
Marathi

प्रवास घडवणाऱ्या मोनिकाच्या प्रवासाची कथा

आधी नोकरी मग गृहिणी आणि आता एक यशस्वी उद्योजिका

19th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कधी कधी साधेपणातही यश दडलेले असते. अधिकतर लोक यशाला प्रसिद्धी सोबत जोडताना दिसतात, मात्र ही धारणा निश्चितच चुकीची आहे. गरजेचे नाही जे लोक प्रसिद्ध आहेत ते यशस्वी असतीलच आणि ज्यांना तुलनेने कमी लोक ओळखतात ते अयशस्वी असतील. यशाला पैशातही नाही मोजले जाऊ शकत, यशाची एक सोपी व्याख्या अशी करता येईल की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करता म्हणजे तुम्ही यश प्राप्त करता. यशस्वी माणूस तो असतो जो आपल्या कामातून इतरांसाठी प्रेरणा निर्माण करतो, ज्याने आपल्या कामातून समाजात काही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत आणि ज्याने स्वतःचे भविष्य तर सांभाळलेच पण इतरांच्या आयुष्याला आकार देण्यातही हातभार लावला आहे. अशाच एक यशस्वी महिला आहेत मोनिका अरुण ज्या आज स्वतःची पर्यटन कंपनी 'ग्लोबट्रोटर ट्रॅवल क्लब एलएलपी' चालवत आहेत. मोनिका अशा स्त्रियांसाठी एक उदाहरण आहेत ज्या लग्न आणि मुलांच्या जबाबदारी मुळे नोकरी सोडून चार भिंतींच्या आत आपल विश्व सामावून घेतात.

मोनिका साठी सुद्धा स्वतः चे काम सुरु करणे एवढे सोपे नव्हते. त्यांच्यावर देखील इतर गृहिणी सारखीच कामाची जवाबदारी होती. मात्र त्यांची चिकाटी, मेहनत आणि योग्य विचार यांच्या जोरावर त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत. जिथे त्या आपल्या घराची सारी जबाबदारी सांभाळून आपले कामही योग्य प्रकारे करत आहेत आणि त्यांचे ग्राहकही त्यांच्या सेवेमुळे फार संतुष्ट असतात. त्यांच्या कंपनी मार्फत जो एकदा सेवा घेतो तो त्यानंतर अन्य कुणाकडे जात नाही.

image


मोनिका मुंबईच्या आहेत. मुंबईतच त्यांचा जन्म झाला तिथेच त्यांनी शिक्षण आणि नोकरी केली. त्यांनी ट्रॅवल और टूरिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर अनेक नामांकित मोठ्या ब्रॅंड सोबत त्यांनी सुमारे २० वर्षे काम केले जसे थॉमस कुक, कॉक्स एंड किंग्स, एसओटीसी. यानंतर त्यांच्या नवऱ्याची नोकरी बेंगळूरू मध्ये लागली आणि त्यांना तिथे जावे लागले, बेंगळूरू त्यांच्या साठी नवे शहर होते, अनेक गोष्टीना नव्याने समजून घ्यावे लागले, जबाबदारीही जास्त होती आणि अशात त्यांचे मुलही केवळ १ वर्षांचे होते. त्यांनी निर्णय घेतला की त्या आता नोकरी करणार नाहीत आणि घराकडेच लक्ष देतील. बराच काळ असा घालवल्यानंतर त्यांच्या आतील काहीतरी करून दाखवण्याची उर्मी पुन्हा वर येऊ लागली आणि ती त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी आपल्या मित्रांना सांगून असे काही काम मिळते का ते पाहण्यास सांगितले जे त्या घरी बसूनच करू शकतील मात्र तसे काही घडून आले नाही. त्यांच्या जुन्या बॉसने त्यांना सल्ला दिला की त्यांच्या कडे कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या कामातही अत्यंत निष्णात आहेत तर त्यांनी स्वतःचेच काम सुरु करावे. मात्र मोनिका यासाठी तयार नव्हत्या. स्वतःचे काम करण्या साठी स्वतःच सर्व गोष्टीना सांभाळावे लागते. लोकांशी स्वतःच बोलावं लागत. नोकरीत आपले काम नेमून दिलेले असते मात्र स्वतःच्या व्यवसायात सारीच कामे आपल्याला सांभाळावी लागतात, सगळ्या कामावर देखरेख ठेवावी लागते. ही एक मोठीच जवाबदारी होती ज्याला पेलायला त्यांचे मन तयार होत नव्हते, मात्र अनेकांच्या वारंवार सांगण्यावरून मोनिकांनाही वाटले की एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे! आणि त्यांनी त्यांचे काम सुरु केले. आपल्या पार्किंग जवळील जागा जी सोसायटीतील मंडळी गोडाऊन म्हणून वापरत असत ती त्यांनी सोसायटीची परवानगी घेऊन मिळवली आणि तिथे आपले ऑफिस उघडले. तिथे त्यांना काही माणसांची आवश्यकता होती तर त्यांनी काही माणसांनाही कामाला ठेवले. त्यांचे सुरवातीचे ग्राहक हे त्यांच्याच सोसायटी मधील मंडळी होती जे दिवसेंदिवस वाढतच गेले. मोनिका आपल्या ग्राहकांना आधी त्यांच्या बद्दल माहिती विचारतात आणि मगच त्या नुसार योग्य तो सल्ला देतात. सहसा पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोक काही ठराविक जागा बद्दलच माहिती सांगतात जिथे त्यांना अधिक नफा होणार असतो मात्र मोनिका यांनीआपल्या नफ्याची चिंता न करता लोकांना त्यांच्या सोयी प्रमाणे जागा सुचवणे सुरु केले आणि यामुळे अधिकाधिक लोक त्यांच्याशी जोडले गेले. मोनिका सांगतात की त्यांचे काम लोकांना केवळ पर्यटन स्थळावर पाठवूनच संपत नाही तर जो पर्यंत त्यांचे ग्राहक घरी परतून त्यांच्याशी बोलत नाहीत तो पर्यंत या कामाला त्या अपूर्णच समजतात. मोनिकांच्या ग्राहकांचे म्हणणे आहे की प्रवासा दरम्यान असा अनुभव येतो की जणू काही कोणी मार्गदर्शक आमच्या सोबतच चाललेला आहे.

image


लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रियाच मोनिका आणि त्यांच्या टीमला अजून चांगले काही करून दाखवण्याची प्रेरणा देतात. मोनिकाने अजून त्यांच्या कंपनीच्या प्रचार प्रसिद्धी साठी काहीही केलेले नाही, ना कोणाला पैसे दिले आहेत ना कोणाला सांगितले आहे की त्यांचा प्रचार करा म्हणून. त्या सांगतात जे लोक त्यांच्या कडून सेवा प्राप्त करतात ते स्वतःच कंपनीचा प्रचार करतात. त्यांची कंपनी सुरु होऊन सुमारे अडीच वर्षच झाले आहे. मात्र सतत वाढणाऱ्या ग्राहक संख्येला लक्षात घेता त्यांना अजून जास्त माणसांची गरज आहे ज्यामुळे त्या आणखी योग्य प्रकारे काम सांभाळू शकतील. मोनिका सहसा आधी पासूनच काम येत असणाऱ्या माणसांना घेत नाहीत तर त्या नवीन लोकांवर अधिक विश्वास ठेवतात आणि त्यांना आपल्या पद्धती प्रमाणे प्रशिक्षित करतात. कंपनीचे ब्रीदवाक्य आहे 'प्रॉमिस लैस एंड डिलीवर मोर' म्हणजेच कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि मोनिका याच ध्येयाने पुढे चालतात. केवळ नफा कमावणे त्यांचे उद्दिष्ट नाही तर लोकांना योग्य सेवा पुरविणे आणि त्यांना आनंदी ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि त्या आपल्या टीम सोबत या लक्ष पूर्ती करिता दिवस रात्र मेहनत घेत आहेत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags