संपादने
Marathi

मुंबई उत्पादन व सीमा शुल्क विभागाच्या पाच अधिका-यांना राष्ट्रपती पुरस्कार

Team YS Marathi
28th Jan 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

मुंबई क्षेत्रातील उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाच्या पाच अधिका-यांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाच्यावतीने येथील माळवनकर सभागृहात आयोजित जागतिक सीमा शुल्क दिवस २०१७ चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली होते. 


image


यावेळी एकूण ३४ उत्पादन आणि सीमा शुल्क विभागच्या अधिका-यांना राष्ट्रपती प्रशस्ती पत्राने सन्मानीत करण्यात आले. मुंबई क्षेत्रातील या विभागाच्या पाच अधिका-यांनमध्ये आयुक्त सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपीलीय प्राधिकरणाचे (सेस्टेट), प्राधिकृत प्रतिनिधी हितेश अजीत शाह, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे, सहायक आयुक्त महेंद्र प्रताप सिंग सेंगर, वरिष्ठ गुप्तचर महसूल महासंचालनालयाच्या क्षेत्रीय युनिटचे, गुप्तचर अधिकारी, गणेश राय, बृहद आयकर युनिटचे अधीक्षक पी.ए. विंसेंट, जोखीम व्यवस्थापन विभागाचे प्रतिबंधात्मक अधिकारी अय्यर गणपति रमन वी. यांना केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी प्रमाण पत्र देऊन सन्मानीत केले. 


image


याप्रसंगी डब्लु.सी.ओ. प्रमाणपत्राचे वितरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या आरएमडी विभागाचे अतिरीक्त संचालक पंकज बोडखे यांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. (सौजन्य - महान्युज)

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags