संपादने
Marathi

उत्तर रेल्वे वरील एकमेव महिला स्टेशन मास्तर आहेत पिंकी कुमारी!

Team YS Marathi
9th May 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

हिमाचल प्रदेशच्या राजधानी सिमलापासून वीस किलोमिटरवर आहे छोटे शहर कैथलीघाट! वसाहतींच्या काळापासून सिमला म्हणजे ब्रिटीशांचे उन्हाळ्यातील राजधानीचे शहर समजले जात होते. त्यामुळे येथे लहान रेल्वे जिला टॉय ट्रेन म्हणतात तिची काल्का ते सिमला अशी बांधणी करण्यात आली होती, जेणे करून दळण वळण सुलभ व्हावे. ही गाडी नॅरोगेजवर चालविली जात होती, त्यामुळे तिचे स्वत:चे सौंदर्य खुलून दिसते. कैथिलीघाट हे या मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे हे स्थानक आता त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठीच नाही तर तेथील महिला स्टेशन मास्तर पिंकी कुमारी यांच्यामुळे प्रसिध्द झाले आहे.


image


या रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या पिंकी यांच्या कहाणीतून कुणालाही प्रेरणा घेता यावी अशीच ही कहाणी आहे. सध्या त्या उत्तर रेल्वेच्या सेवेत कार्यरत असलेल्या एकमेव महिला रेल्वे स्टेशन मास्तर आहेत. कैथीलीघाट या स्थानकावर नेमणूक झालेल्या देखील त्या पहिल्याच महिला स्टेशन मास्तर आहेत.ब्रिटीशांच्या काळत बांधण्यात आलेल्या या रेल्वे स्थानकात यापूर्वी कुणाही महिलेला स्टेशन मास्तर म्हणून नियुक्ती मिळाली नाही. त्यांची कहाणी रंजक आहे, आणि एखाद्या रेल्वे सारखीच ती रूळावरून जाणारी असल्याचे वाटते.

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील लहानसे गाव असलेल्या दरहर या गावात पिंकी यांचा जन्म झाला. त्यांना सात भावंडे आहेत, त्यापैकी पाच बहिणी आहेत. त्या सर्वात लहान आहेत. त्यांचे वडील स्टॅम्प वेंडर होते, ज्यांनी नेहमी कठोर परिश्रम केले. जेणे करून त्यांना मोठ्या कुटूंबाची जबाबदारी पार पाडता यावी. लहानश्या शहरात राहून आणि मर्यादीत साधने उपलब्ध असूनही त्यांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे असे प्रयत्न केले. त्यातूनच पिंकी यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळत राहिली. त्यांनी निश्चय केला की स्वप्न पूर्ती केल्याशिवाय लग्न करायचे नाही. त्यांचे कुटूंब देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पिंकी यांनी नागंद्र झा महाविद्यालयात प्रवेश घेतला, त्या पहिल्यापासून अभ्यासात हुशार आणि चांगल्या विद्यार्थिनी होत्या. त्या ज्यावेळी २१ वर्षांच्या होत्या त्यांनी जीवनात प्रथम रेल्वेचा प्रवास केला आणि बँकेच्या परिक्षेचा अर्ज भरायला गेल्या. या रेल्वे प्रवासानेच त्यांना त्याची प्रेरणा मिळाली आणि त्यानी रेल्वेत कारकिर्द करण्याचा निश्चय केला.

पिंकी यांनी मग रेल्वेत भरतीसाठी अर्ज केला. त्यानी परिक्षा दिली आणि त्यांची प्रशिक्षणानंतर नियुक्ती चांदुशी उत्तरप्रदेश येथे झाली. वर्षभरापूर्वी त्यांची बदली कैथीलीघाट येथे स्टेशन मास्तर म्हणून झाली आणि त्या तेथे काम करत आहेत.

डोंगराळ भागात कधीच न राहिलेल्या त्यांना येथील सृष्टी सौंदर्याने भूरळ घातली आहे. असे असले तरी पिंकी यांनी मोठी स्वप्ने पाहणे थांबविले नाही. आता त्या नागरी सेवा परिक्षेचा अभ्यास करत आहेत. आणि भविष्यात या परिक्षा उत्तिर्ण होवून त्यांना नागरी सेवेत जायचे आहे त्याचा हा प्रवास खरोखर कुणालाही प्रेरणादायीच ठरेल. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags