संपादने
Marathi

मस्तीची पाठशाळा अर्थात ‘एडुइजफन’!

kishor apte
5th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पवईस्थित वेंचर एज्यूकेशनचे उद्दिष्ट शिक्षणाला खेळांच्या माध्यमातून मस्तीभरे, सहजसोपे आणि सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आहे. दोघे माजी आयआयटियन्स प्रविण त्यागी (माजी आयआयटिडी)आणि जतीन सोलंकी (माजी आयआयटिबी) यांनी स्थापित केलेला ‘एडुज फन’ (EduisFun) हा एक अनुकूल मंच आहे जेथे हसतखेळत शिक्षणाची व्यवस्था केली जाते आणि व्यक्तिगत कामगिरीवर लक्ष देण्यासाठी विश्लेषणाची मदत घेतली जाते.

सह-संस्थापक असलेल्या जतीन सोलंकी यांचे म्हणणे आहे की, “आजची तंत्रज्ञानाची ओळख झालेली पिढी खूपच पटकन कुठलीही गोष्ट आत्मसात करते. आजच्या मुलांना भलेही ते कुठल्या भाज्या खातात ते सांगता येणार नाही पण ऍंग्री बर्ड आणि कँडी क्रशबाबत त्यांना चांगलीच माहिती असते. आपल्या खिशात ही मुले भलेही रुमाल ठेवत नसतील पण त्यांच्या खिशात पांच इंची क्वाकोर१३ मेगाफिक्सल ऍंड्रॉइड नक्कीच असेल ज्यात सगळे नविन ऍप्स आणि गेम्स असतील. आणि ज्यावेळी गोष्ट शिकणे आणि शिक्षणाची असते तेंव्हा वर्ग आणि पुस्तकांसोबतच शिकवण्याच्या सध्याच्या पध्दतीमुळे सारे काही ऐच्छिक ठेवण्यात अपयश येते आहे”.


image


हीच खूप मोठी उणीव भरून काढण्यासाठी ‘एडु इज फन’ने शिकवण्याची एकदम वेगऴी पध्दती निवडण्याचे ठरवले आहे. जतिन मानतात की, शिक्षण पध्दतीत मोठे बदल करण्याची गरज आहे, हा बदल शिकण्याच्या पुस्तकांसोबतच शिकवण्याच्या त-हा बदलण्यातही केला पाहिजे. हे पाहूनच त्यांच्या चमूने काहीतरी नवीन करण्याचे ठरविले आणि ते म्हणजे गेम्सच्या माध्यमातून शिक्षण! अशाप्रकारे ‘एडु इज फन’ची सुरूवात झाली.

वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ‘एडुइजफन’ ने शिकवण्याच्या पध्दतीत काही बदल करण्याचे आवाहन केले आहे.

• शिकवताना सध्याच्या शिकवण्याच्या पध्दती ऐवजी प्रश्नांची उत्तरे देत शिकवणे.

• या विचाराने शिकवणे की अपयश शिकण्याच्या आणि यश बस केवऴ एक पाऊल अंतरावर आहे.

• चांगल्या वैचारिक स्पष्टतेसाठी विशेष लक्ष देणे.

• फोन-इन-ए-रो पध्दतीचा अवलंब करून शंभर टक्के ज्ञान मिळाल्याची खात्री करणे.

एडु इज फन ३३टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सध्याच्या पध्दतीला अधिक उन्नत करू इच्छिते. हा चमू कोणत्याही विद्यार्थ्याला ज्ञान देण्यात हलगर्जी करु इच्छित नाही, त्याबरोबरच हा चमू असे समजतो की, एखाद्या मुलाकडे उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक तेहतीस टक्के गुण असतील तर ते त्याला ६७टक्के गुण मिळवण्यापासून दूर ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे ही मुले कमकुवत होतील, जोवर त्यांना शंभर टक्केगुण मिळवण्याची उत्कंठा निर्माण केली जाणार नाही, ती कमकुवतच राहतील.

एडुइजफन आणि त्यांचे प्रारंभीचे दिवस

जतीन सोलंकी एक 'साखळी उद्यमी' आहेत. ‘एडुइजफन’च्या आधी ते ई-कॉमर्स आणि शिक्षणाच्या क्षेत्राचा अनुभव घेऊन आले आहेत. प्रविण त्यागी यांनी गेल्या पंधरा महिन्यात चमूला एनसीईआरटी च्या आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी शैक्षणिक गेम्स विकसीत करण्यासाठी प्रेरीत केले. डेवलपर्स, डिझायनर्स, एनिमेटर्स आणि परीक्षक यांच्या मजबूत चमूने शिकवण्याच्या एका खास पध्दतीचा शोध लावला.

प्रविण आणि जतीन एडुइजफन!

प्रविण आणि जतीन एडुइजफन!


शिक्षणसंस्था आयआयटियन्स पेस ने ‘एडुइजफन’सोबत धोरणात्मक भागीदारी केली आणि यासाठी सुरुवातीला गुंतवणूक केली. त्यासोबतच आयआयटियन्स पेस च्या प्रशिक्षित शिक्षकांनी यासाठीच्या चांगल्या मजकूराची व्यवस्था केली.

‘एडुइजफन’ पुढील दोन महिन्यात अनेक प्रकारच्या गेम्स लॉन्च करणार आहे. त्यापैकीच एक आहे सिंगल प्लेअर गेम ज्याचे नांव आहे नॉलेज कॉम्बेट, हे अनेकस्तरांवर विभागले आहे. त्यात ज्ञानाच्या दिव्याचे एकत्रिकरण करून पशु सभ्यता ते मानव सभ्यता पर्यंत सुरक्षित करण्याच्या अभियानाचा समावेश आहे. जे यात विजयी होतील त्यांना सुपर ब्रिटानिक्स मार्फत भेटवस्तू आणि शिष्यवृत्ती देण्यात येतील.

सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञानाच्या एकापेक्षा जास्त गेम्सही विकसित केल्या जात आहेत. जतीन सांगतात की, “स्पर्धेच्या भावनेची जाणीव ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे”. “यासाठी आम्ही एक असा गेम तयार करणार आहोत जो हे देखील करू शकेल”.

हे गेम्स परिपूर्ण आहेत. यामध्ये गुणांकन मीटर लावण्यात आले आहेत त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचे नियमीतपणाने विश्लेषण केले जाते. त्यासोबतच यात आवाजाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे स्लाईडस् आणि विडिओ जोडले आहेत. ज्यामुळे विद्यार्थी आपल्याला हवे तेंव्हा ते संपूर्णपणे पाहू शकतील. ‘एडुइजफन’च्या माध्यमातून विकसित या ऍप्सवर आधारित गेम्सला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जतीन सांगतात की, “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्पष्टपणे काही समजण्याच्या बाबतीत ५००टक्के प्रगती नोंदवण्यात आली आहे. यासोबतच नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रुचीपातळी, आकलन क्षमता आणि ज्ञानाची अभिव्यक्ती यांच्या आधारे पांच पैकी पाच गुण दिले”

शिक्षण वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे तसेच डिजीटलायझेशनच्या वाढत्या प्रभावामुळे त्यात आणखी विकास होणार हे नक्की आहे. आजची तांत्रिक समज असलेल्या पिढीला अशाप्रकारचे बदल सहजपणाने आणि गतीने आत्मसात करता येत आहेत, त्यामुळेच हे आवश्यक आहे की, हे बदल समोर ठेऊन शिकवण्याच्या पध्दती बदलल्या पाहिजेत. भविष्यात ‘एडुइजफन’ स्टार्टअप्समध्ये एक असे क्षेत्र असेल जे या क्षेत्रात आपली पकड बसविण्यात प्रयत्नशील असेल.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा