संपादने
Marathi

"त्या"ची कथा "ति"ची कथा आणि "त्यां'च्या कथा

ही कथा आहे त्यांच्या साहसाची, त्यांच्या सामाजिक घुसमटीची

17th Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ऑक्सफोर्ड शब्दकोशात “गे” या शब्दाचा एक अर्थ आनंदी आणि स्वच्छंदी असा आहे. मात्र, 2009 साली समलिंगी संबंध हा गुन्हा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर या पंथातील लोकांसाठी आनंदी हा शब्द दुर्दैवानं खोटा ठरला आहे.

पण दैव नेहमी बदाद्दरांच्या पाठीशी असतं आणि आम्ही युअर स्टोरी हे देवावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही नुकतेच समलिंगी आणि तृतीयपंथीयांसाठी काम करणा-या चार तरूणांशी संवाद साधला. हे चौघेजण म्हणजे या पंथीयांसाठी खुप प्रेरणादायी स्त्रोत म्हणून काम करतात.

नितीन राव यांच्या लढवय्येपणाला सलाम

नितीन राव

नितीन रावनितीन बंटवाल राव हा बंगळूरू आणि पुणे इथं वाढलेला एक उत्साही मुलगा. त्याला गणित आणि नविन विषय शिकण्याची आवड होती. सुरथकालच्या एऩआयटी मधून आयटी क्षेत्रातील पदवी संपादन केल्यानंतर तो मानवाधिकार आणि प्राथमिक शिक्षण क्षेत्राकडे वळला. त्यानंतर त्यानं एमआय़टी मधून एमबीए केलं आणि त्यानंतरचा त्याचा आतापर्यंतचा प्रवास सिलीकॉन व्हॅलीतील टेक स्टार्टअप म्हणून सुरू आहे.

एवढं घवघवीत यश संपादन केल्यानंतरही आपण गे असल्याचं तो जेव्हा सभोवतालच्या लोकांना सांगतो तेव्हा त्याच्या या यशावर पाणी पडतं.” मी नेहमीच पुरूषांकडे आकर्षिला जातो. पण आपल्या समाजात लैंगिकतेबाबत असलेला समज आणि सांस्कृतिक परंपरावादी मनोवृत्तीमुळं ही बाब मी माझ्या पालकांना अथवा जवळच्या मित्रांना सांगू शकत नाही. अखेर मी जेव्हा ही गोष्ट माझ्या पालकांना सांगितली तेव्हा त्यांनी मला ही वैद्यकीय समस्या असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या पराकोटीच्या दुर्लक्षानं मी आश्चर्यचकित झालो होतो.

कोणताही आदर्श समोर नसल्यानं या पंथातील लोक उघडपणे बोलण्यास समोर येत नसल्याचं नितीनचं म्हणणंय.

दुर्दैवानं त्याच्या स्वतःच्या कॉलेजमध्येही अनेकजण या पंथातील लोकांना शिव्याशाप देत असल्याचं तो सांगतो. पण मनीपाल आणि हैद्राबाद लॉ कॉलेजसारख्या ठिकाणी या पंथातील लोकांना समजून घेण्याची आणि स्विकारण्याची मनोवृत्ती दिसून आली.

खरंतर लोकांमध्ये उघडपणे सांगणं आणि मिरवणं यात बहादूरी आहे. पण ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. मागील पिढीपेक्षा आत्ताच्या तरूणांमध्ये उघडपणे वावरण्याची जास्त धमक दिसते.” समाज म्हणून आपल्याला असे उघडपणे समोर येणा-या लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती गे आणि लेस्बीयन यांच्याबाबतच काही चुकीचे समज आणि गृहितं पसरवत असेल अशावेळेस त्यांना योग्य समज आणि शिक्षण देण्याची आपली जबाबदारी आहे.”

२०१० साली तुषार मलिक यांच्या ना नफा तत्वावर काम करणा-या इक्वल इंडिया अलायन्स या संस्थेनं नितीनला मदत केली. त्यांच्या मदतीनं नितीननं ‘आय अलाय’ ही मोहिम सुरू करून या पंथाला समर्थन देणा-या ३०० लोकांच्या चित्रफिती तयार केल्या.


विद्या पै, एलजीबीटी कार्यकर्ती, एक गुंतवणूक बॅंकर ते उद्योजक.


विद्या पै

विद्या पैलोकांना शक्यतो ते गे असल्याचं त्यांच्या पूर्वायुष्यातच लक्षात येतं पण विद्याच्या ते लक्षात आलं ते ती सुमारे वीस वर्षांची झाल्यानंतर, विद्या म्हणते, " दुर्दैवानं लोक लैंगिकता तुमच्या वागण्याशी जोडतात पण खरं तर ती तुमची ओळख असते”.

अनेक सामाजिक समस्यांवर कार्यकर्ती म्हणून विद्या काम करते. समलैंगिक पंथीयांचे प्रश्न, मानवाधिकार आणि प्राणी कल्याणाबाबतचे विषय तिला जवळचे वाटतात. समलैंगिक लोकांच्या लढाईत काम करताना तिचा फोटो एका प्रमुख वर्तमानपत्रात छापून आला. पण तोपर्यंत ती समलिंगी असल्याचं समोर आलं होतं आणि तिच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

सिटीबॅंकेमध्ये गुंतवणूक बॅंकर म्हणून विद्या काम करत होती. लोक समोर येण्यास दोन कारणांमुळं टाळाटाळ करतात. “पहिला म्हणजे सामाजिक मुद्दा, जर समाज त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहत असेल तर कुणी आपली अशी ओळख कशी काय उघड करू शकेल. या पंथातील लोकच आजूबाजूला असतील याची शाश्वती नसल्याने कुणी समोर येऊन बोलत नाही. समाजातील आणि प्रसारमाध्यामांतील त्याचं दिसण हेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास कारणीभूत ठरतं. दुसरा मुद्दा हा कायद्याचा असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं या पंथीयांना खूप मोठा धक्का आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करून दिलीय.”

विद्या सांगते की, “ धार्मिक श्रद्धेला यात आणणं हे खूपच धोकादायक आणि परिस्थिती अधिक अडचणीची करण्यासारखं आहे. आपल्याला याबाबतीत सामाजिक तोडगा काढणंच गरजेच आहे”.

या पंथातील लोकांनीच आधी ही बाब स्वीकारायला सुरूवात केली पाहिजे असं विद्या सांगते, " मी कोण आहे याबाबतचा हा प्रश्न आहे. मी संगणक अभियंता झाले पण काम गुंतवणूक बॅंकर म्हणून सुरू केले, आणि आता मला हॉस्पीटॅलिटी हे क्षेत्र जवळचे वाटतेय. मी हे माझ्या विश्वासावर आणि आत्मविश्वासावर करतेय. आपण हे का करतोय ते आपल्याला माहित असले पाहिजे आणि त्यासाठी अन्य कुणाच्याही सल्ल्याची अथवा उपदेशाची गरज नाही.

भारथ जयरामन : मानव संसाधन ते मानवाधिकार

भारथ जयरामन

भारथ जयरामन.

भारथ जयरामन कॉर्नेल विद्यापीठातून अध्ययन आणि विकास तज्ञ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तरूण. गुगल आणि विप्रो सारख्या संस्थांसाठीही त्यानं काम केलंय़.

“गे” असल्याबाबत बोलताना तो सांगतो, " खूप काळ स्वतःला गे समजण्यापासून नकार दिल्यानंतर मी जेव्हा इंटरनेटद्वारे काही स्त्रोत शोधू शकलो तेव्हा मी माझी ओळख उघड करू शकलो. मला हे मान्य केले पाहिजे की तुम्ही गे असल्याचं उघड झाल्यानंतर कुटूंबाकडून इतरांना ज्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतं त्या माझ्या वाट्याला आल्या नाहीत. मला कोणतीच अडचण आली नाही.”

पण तरीही भारथला हे माहित आहे की या धक्क्यातून बाहेर येवून आपण एलजीबीटी पंथाचे असल्याचं उघड करणं प्रत्येकासाठी सोप्प नसतं. त्याचं कारण म्हणजे नाकारले जाण्याची भीती. तो म्हणतो, "त्यांची ओळख उघड झाली तर समाजातील काही घटकांकडून त्यांना शारिरीक इजा पोहोचवली जाईल अशी भीती एलजीबीटी पंथाच्या लोकांना वाटते. समाजाचा फुत्कार हा त्याच्या चावण्यापेक्षा अधिक भयंकर असतो, त्यामुळं काही लोकं कोषात जाणंच पसंत करतात”.

सरकारी अथवा व्यावयासिक जगतातील अधिकारपदांवरील व्यक्ती उघडपणे समोर येत नसल्यानं एलजीबीटी पंथाचे अनेक लोक समोर येत नसल्याचं भारथला वाटतं. त्यामुळं लोकांना समोर येऊन आपली ओळख देणं गरजेचं आहे. फॅशन जगतात एलजीबीटी पंथाच्या लोकांना सहज स्वीकारंल जात असल्यानं लोक उघडपणे समोर येऊन आपली स्वप्नं पूर्ण करतात.


एलजीबीटी पंथाच्या लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून मदत करणारा शंकर गणेश.


शंकर गणेश

शंकर गणेशतामिळनाडू इथल्या तुतीकोरीन या लहानशा गावात शंकर वाढला. त्याच्या शालेय जीवनात तो एक साधारण विद्यार्थी होता. आपण गे असल्याचं त्याला लवकरच लक्षात आलं, त्यानं त्यानंतर या विषयाबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. “ समलिंगी जोडप्यानं लोकांमध्ये चुंबन घेतल्याची बातमी त्या काळात इंटरनेटवर झळकत होती,” तो सांगतो. पण ऑर्कुट या सोशल नेटवर्किंग साईटनं त्याला या पंथीयांच्या जवळ आणलं. त्यानं त्यांच्यापैकी काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण चेन्नईत त्याला भेटलेले अनेकजण आपण द्वैलेंगिक असल्याचं सांगत होते. त्यामुळं त्याचा धीर खचला आणि तो गे असलेल्या मित्राच्या शोधात लागला.

“समाज आपल्याला स्विकारील का? नातेवाईक काय म्हणतील? याबाबत तो स्वतःलाच नेहमी प्रश्न विचारत असायचा,” असं शंकर सांगतो.

याबाबत वडिलांशी बोलल्यानंतर तो वैद्यकिय उपचारांनंतर बरा होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर तो वडिलांना म्हणाला, “म्हणजे उपचारांनंतर तुम्ही गे होऊ शकता”. त्याच्या या उत्तरानं त्यानं वडिलांना हा वैद्यकिय प्रश्न नसल्याचं दाखवून दिलं. पण ग्रामीण भागात याबाबत फारच वाईट स्थिती असते. “ तामिळनाडूतील अनेक वृत्तपत्र कलम ३७७ बाबतचं कोणतंही चर्चासत्र अथवा बातमी छापत नाहीत”.

शंकर सांगतो की, “गे लोकांच्या भावनांबद्दल समजून घेण्यासही फारसं कुणी तयार नसतं. हा केवळ लैंगिक अथवा शारिरीक आकर्षणाचा विषय नाही”. पण समाजानं आणि वैद्यकिय जगतानं मदत करणं गरजेचं आहे.”

त्याच्या परिस्थीतीमुळं आणि नैराश्यामुळं त्याच्या कामावर परिणाम झाला. पण त्याचा सध्याचा फ्रेशडेस्क इथला जॉब हा त्याच्यासाठी चांगला अनुभव आहे कारण इथले सहकारी मदत करणारे आहेत.

“ जेव्हा आपल्याला स्वतःचा अभिमान वाटतो तेव्हा आपण सर्व लैंगिकतेला समान मानले पाहिजे. जशी हुशार व्यक्तींना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे तशी ती समलैंगिक पंथियांनाही मिळाली पाहिजे. नाहीतर ते देशाबाहेर संधी शोधायला लागतील.” तो विनंती करतो की, समलैंगिक पंथियांनी इंटरनेटवर खूप वाचले पाहिजे आणि एखादा व्यावसायिक समुपदेशक शोधला पाहिजे. यामुळं कदाचित प्रश्न सुटणार नाही पण "ते" अधिक सक्षम होतील.

तुम्हीसुद्धा itgetsbetter.org या साईटवर समलैंगिक पंथियांना तुमची साथ नोंदवू शकता.

या चार लोकांशी बोलल्यानंतर एक सकारात्मक गोष्ट समोर आली ती म्हणजे ते त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात स्वतःची ओळख प्रस्थापित करू शकले आहेत. दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की करण्यापेक्षा बोलणं सोपं असतं, कारण अर्धनारीनटेश्वराची पुजा करून तृतीयपंथीयांचं अस्तित्व मानणारा आपला समाज या लोकांना मात्र स्विकारताना दिसत नाही. पण मला विश्वास आहे की या कथेतील हे लोक अशा लोकांसाठी आदर्श बनतील. गे, लेस्बियन, तृतीयपंथीयांना त्यांची ओळख देणारा समाज निर्माण करूया...

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags