संपादने
Marathi

रॉयल एनफिल्ड बुलेटचा कायापालट करून तयार झाली स्वादिष्ट फूड बाईक, बिबिक्यू राईड इंडियाच्या सौजन्याने!

Team YS Marathi
18th Jan 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

लिजंडरी रॉयल एनफिल्ड मोटरसायकलचा कायापालट करून तिला साईड कार, सामानाचा बॉक्स आणि शेफचे सामान छत्रीच्या दांड्यासह ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. दोघा भावांनी रॉयल एनफिल्ड जी भारतात सर्वात लोकप्रिय आहे तिच्यामधील वादळीपणाच हिरावून नेला, त्यानी तिला साइडकार लावले आणि तिच्यात बदल करून मोबाईल बार्बेक्यू ग्रिल लावले जेणे करून त्यांच्या रस्त्यावरील फास्टफूड दुकानासाठी तिचा वापर करता येईल. त्यामुळे देशात खळबळ होण्याची शक्यता आहे.


अरुण (डावीकडे)आणि कृष्णा वर्मा, हे दोघे भाऊ ज्यांनी बीबीक्यू राइड इंडिया मध्ये भाग घेतला.

अरुण (डावीकडे)आणि कृष्णा वर्मा, हे दोघे भाऊ ज्यांनी बीबीक्यू राइड इंडिया मध्ये भाग घेतला.


दोन बाईक्सना एकत्र केल्यावर ५०० सी सी रॉयल ऐनफिल्ड आणि रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० सीसी बुलेट मोबाईल बार्बेक्यू फूड स्टँन्ड तयार झाला, त्यांनी ३५० सीसी मॉडेलला कमी खर्चात देशभर त्यांच्या व्यवसायासाठी नेण्यास सज्ज केले. “ आमचे लक्ष्य येत्या सहा महिन्यात अशा प्रकारच्या १५० बुलेट मोटर सायकल्सना परावर्तित करण्याचे आहे, बीबीक्यू इंडिया ही देशातील पहिली फूड बाईक चेन कंपनी होणार आहे”, अरुण वर्मा यांनी युवर स्टोरीला सांगितले.

फूड ट्रकचे वेड

२२वर्षीय तरुणाचा त्यांचा भाऊ कृष्णा सोबत फूड ट्रक व्यवसाय आधीपासूनच होता. ते तीन ट्रक वापरतात आणि नँनोमधून बदल केलेल्या कारमध्ये आईसक्रिम पार्लर चालवितात, त्यामुळे सहजपणे देशातील सर्वात तरूण ट्रक मालक म्हणून त्यांचे नाव झाले आहे. त्यांच्यातील प्रतिभेतून दुचाकीची कल्पना येण्यास कारण की त्यांच्याजवळ असलेल्या टेम्पो ट्रँव्हलर दररोज सायंकाळी पार्क करताना मोठ्या अडचणी येत होत्या.

दोन वर्षापूर्वी बेंगळुरु मध्ये फूड ट्रकचे खूळ सुरु झाले, काही महिन्यातच त्यांची संख्या शंभरपेक्षा जास्त वाढली. मात्र ब-याच जणांना डोकेदुखी सुरु झाली, जसे की पार्किंगसाठी शहराच्या रस्त्य़ांवर खात्रीशीर जागा, आणि ट्रकची गणना मोबाईल फेरीवाले यामध्ये केली जावू लागली. जरी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा व्यवसाय करण्याचा परवाना होता तरी त्यांना प्रशासनाकडून अनेक अडचणींचा सामना करावा लागे.

“ शहराच्या रस्त्यावर जागा मिळणे ही कठीण गोष्ट होती, अरुण यांनी शक्कल लढवली की दुचाकीला बदल करून त्यात साइडकार आणि ग्रिल तसेच तवा ठेवण्याची सोय करता येईल. आम्ही शोले सिनेमा पाहिला, आणि जाणवले की जर साईडकार (जशी सिनेमात आहे) ९० किलोच्या माणसाला वाहून नेते, तिच्यात बदल करून ग्रिल सहजपणे होवू शकते,” कृष्णा यांनी सांगितले.


बदल केलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० सीसीचे साइड व्ह्यू

बदल केलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० सीसीचे साइड व्ह्यू


तर, जसे कल्पना होती तसे केल्यास जागेचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात आल्यावर हे देखील स्पष्ट झाले की एका माणसाकडून ती वाहुन नेणेही सोपे होणार आहे जो शेफ असेल.दीड महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पहिल्या बदल केलेल्या बुलेट ५००सीसी चा रस्त्यावर प्रयोग केला. त्याने लोकांचे लक्षच वेधले नाही तर त्यांना गुंतवणुक करण्याचे प्रस्तावही आले आणि सिनेमात वापरण्यासाठी मागणी देखील.

सहजपणे ओळख स्टार्टअपची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये, भागीदारीत भांडवली गुंतवणूक करणारे आणि दलाल गुंतवणूकदार यांनी पुढील मोठ्या कल्पनेवर डोळा ठेवला. त्यापैकी काहीनी या क्रेझी बाईकना हवा देण्याचे ठरविले आणि त्यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी दोघेही भाऊ पदवी करीता हेब्बल केमप्पापुरा येथील सिंधी महाविद्यालयात अखेरच्या वर्षात शिकत होते, त्यांनी अशा प्रकारच्या साइडकार असलेल्या दुस-या बाईकची निर्मिती केली होती. यावेळी ३५० सीसी मोटरसायकल वापरून त्यांनी बुलेटला बंदिस्त केले त्यामुळे ती मजबूत आणि स्थिर झाली.

रोज सांयकाळी या बुलेट कॉफी बोर्ड लेआऊट येथे पार्क केल्या जात, या स्थळाला “फूड स्ट्रिट” असे संबोधले जावू लागले, आणि कामण्णाहळ्ळी हा भाग उजळून निघाला, जो कोरामंगला किंवा इंदिरानगर म्हणून उदयास आला जो एकेकाळी गंस्ट्रोच्या साथीने उजेडात आला होता. 

दोन्ही भावांनी सिनेनिर्मात्यापासून गुंतवणूकदारांपर्यंत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते त्यामुळे त्यांच्या अमृतनगरच्या अत्याधुनिक घरासमोर तिसरे ब्रँण्ड न्यू बुलेट मॉडेल लवकरच येवून उभे राहिले. त्यावेळी घरच्यांनाही धक्का बसला. “ बुलेट मोटर सायकलसाठी सहा महिने प्रतिक्षा करावी लागेल?” मी कृष्णाला विचारले. क्वचितच, रॉयल एनफिल्ड अशाप्रकारे बनविली जाते की त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार दर दुस-या दिवशी १५० बाईकची मागणी पूर्ण केली जावू शकते. “ कंपनीला आमची कल्पना चांगलीच आवडली, आणि काही मॉडेल दाखविण्यासाठी आम्हाला त्यांच्या शोरुमला बोलाविणे आले, ते म्हणाले.


देशातील पहिली बीबीक्यू बाइक

देशातील पहिली बीबीक्यू बाइक


दहा मिनीटांत सुरु होते.

एकदा पार्क केल्यावर शेफला ग्रिल तयार करण्यास दहा मिनिटांचा वेळ लागतो, त्याला इतकेच करायचे असते की साइडकार उघडून ग्रिल बाहेर घ्यायचे असते, त्यांनतर पाच किलोच्या गँस सिलींडर सोबत जोडलेला तवा बाहेर येतो. शेफ साइडकारच्या जवळ जावून कोळसे ठेवतो ते ग्रिलवर पसरतो आणि बार्बेक्यूच्या तोंडाला पाणी आणणा-या डिशेश तयार करतो. बाजूचा ग्राहकांना सेवा देण्याचा काऊंटर देखील सुरु होतो.

भट्टी सुरु झाली की तो शेफची हत्यारे घेण्यासाठी पुन्हा साइडकार कडे जातो. चिमटे, कढया, स्वयंपाक घरातील साहित्याची रचना करतो आणि मांस तसेच मटण ग्रिलवरून तयार करून देण्याची तयारी करतो. जर पाऊस आला तर, शेफला उभे राहण्याची जागा आहे, तो साईड कारला लागून छत्री उभी करतो.

चिकित्सक आरेखन

फूड स्ट्रिटवर, ग्रिलची धग देखील चुकून लागू शकते, रस्त्यावरून प्रवास करताना लोक चिकित्सक आणि भुकेले असतात. शंकर प्रसाद यांच्यासारखे त्यापैकी अनेकजण डोकावून पाहतात उकळणा-या बीबीक्यू चिकनला नाहीतर बदल केलेल्या बाईकबद्दल असलेल्या उत्सुकतेमधून.

“ हे पहिल्यांदाच मी पाहतोय की बुलेट अशा प्रकारे असू शकते, फारच छान,” त्यांनी दिलेल्या पक्वानांचा स्वाद घेताना ते म्हणाले. ज्यात चिकन लेग, बोनलेस चिकन स्ट्रिप्स, व्रँप्स, बर्गर, रोल आणि पायनापल वेगीस अशा सर्व प्रकारच्या बार्बेक्यूची रेलचेल असते जे मिनिटांत जागीच तयार होतात. या भावंडानी आणखी काही प्रकारच्या स्वादांचे पदार्थ देण्याची कल्पना मांडली. त्यापैकी अलिकडची म्हणजे नायट्रोजन - डिप्ड कुकीज. एकदा तयारी केली तर तुमच्या मुखातून धूर निघेल आणि हे लहान मुलंसाठी देखील सुरक्षित आहे. रस्त्यावरच्या सायंकाळी ते दोनशे ग्राहकांना सेवा देतात, कारण साइडकारमधून ते तेवढे चिकन, वेगीज, बन्स नेवू शकतात.

केवळ अप्रतिम

“ आम्ही केवळ अप्रतिम अन्न देतो, आम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी असे वेगळे बाइक्स एकचवेळी लावता येत नाहीत. ते एंग्लो इंडियन भावंडासारखे होईल. ते सारे एकाच बीबीक्यू कढई आणि तव्यावर होते”. कृष्णा सांगतात. शुध्द शाकाहारी पदार्थ हवे असलेल्या संवेदनशिल ग्राहकांना केवळ शाकाहारी पदार्थ असलेल्या बीबीक्यू आणि तव्यावरील स्वाद घेता येतो. या भावंडाना त्यांचे मॉडेल देशभर घेवून जायचे आहे, त्यासाठी त्यांना फ्रेंचाइसीची मागणी पठानकोट, गुरगांव, विशाखापट्टणम येथून तर गुंतवणुकीचे प्रस्ताव दुबईतून येत आहेत.


कॉफीबोर्ड लेआऊट फूड स्ट्रिट बेंगळुरू येथे सेवा देताना

कॉफीबोर्ड लेआऊट फूड स्ट्रिट बेंगळुरू येथे सेवा देताना


त्यांनी बीबीक्यू राइड इंडिया नावाच्या कंपनीची स्थापना केली आहे, आणि गुंतवणूकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक ३५०सीसी बुलेट आणि तिच्या बदलांचा खर्च जो जवळपास ३.५लाख रुपये आहे. त्याच्या मेव्हण्याच्या युनीटवरचा खर्च कमी करण्यासाठी अरुण यांनी साइडकार उत्पादक कंपनीसोबत बोलणी केली. “ एकदा आम्हाला तयार साइडकार मिळाली तर आम्ही हे बदल आठवडाभरात करु शकू”.

जाहीरातींच्या बाजारातील बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी निजेश नायर यांना आणले आहे, जे पूर्वी ओयो सोबत होते आणि आता फूड ट्रक चालवितात. एकदा का त्याचे चांगले चालले की ते अशा अनेकांना रोजगार देतील आणि बेरोजगारांना मदत करतील अशी त्यांची योजना आहे. सध्या ते उत्पादनावर लक्ष देत आहेत, आणि दर्जाबाबत देखील ते खार्चिक मेक्सिकन रेढ चिली तेल वापरतात, सिन्नामॉन पाप्पारिका, आणि इतर दर्जेदार मसाले जे केवळ महागड्या सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असतात.

अरूण यांनी गोव्यातील हॉटेल व्यावसायिकासोबत चार बुलेट तयार करण्याचा करार अगोदरच केला आहे, जे या गमतीदार राज्यातील समुद्र किना-यावर चालतील. ते केवळ इतकेच म्हणतात, “ शांत रहा आणि ग्रिल व्हा!”

लेखक - अनिल बुदूर लुल्ला

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags