संपादने
Marathi

१९ वर्षीय नितीन शर्मा भारतातील सगळ्यात मोठ्या ड्राईव्हर-ऑन-डिमांड मंचाचा निर्माता

Team YS Marathi
17th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

वयाच्या १८ व्या वर्षानंतर आयुष्यात बरेच महत्वपूर्ण बदल घडत असतात आणि आपण आपल्या भविष्याच्या बाबतीत अधिकाधिक सजग होत जातो. आज आपण अश्याच एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने वयाच्या या नाजूक टप्प्यावर भले मोठे यश संपादन केले. जे भल्याभल्यांना शक्य होत नाही.

हो आपण तरुण, धडाडीच्या नितीन शर्मा बद्दल बोलत आहोत. ज्यांने केवळ वयाच्या १८ व्या वर्षी काहीतरी करण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले व आपल्या हिंमतीच्या जोरावर ते पूर्णही केले. कोणतीही परंपरागत पदवी व त्यानंतर परदेशी विद्यापीठातून एमबीएची पदवी संपादन करण्याचा नितीन यांचा मानस नव्हता. नितीन यांना ही गोष्ट चांगली ठाऊक होती की एकाच वेळी दोन बोटींवर आपण प्रवास नाही करू शकत. शेवटी त्यांनी चालू अभ्यासक्रमाला पूर्ण विराम देऊन एमिटी विद्यापीठातून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपली पदवी पूर्ण केली.


image


मागच्याच वर्षी नितीन यांनी व्यावसायिक विस्तारासाठी बाजारात संशोधन केले व त्यांना जाणवले की भारतीय बाजार हा अनेक शक्यतांनी भरला आहे. त्यांनी ‘हाइपर लोकल डिलिव्हरी मॉडेल‘ बद्दल विचार केला, पण काही कारणास्तव तो रद्द झाला. या पूर्ण शोध मोहिमेत त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लोकांना गरजेच्या वेळी ड्राईव्हरची निवड करतांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. या दिशेने कामाची वाटचाल करत नितीनने ‘ड्राईव्हर-ऑन-डिमांड’ या सेवेची सुरवात केली.

आपल्या शोध मोहिमेद्वारे नितीन दिल्ली एनसीआर मध्ये जवळजवळ १५०० वाहनचालकांना भेटला आणि याप्रकारे त्यांच्याद्वारे १००० वाहन चालकांचा डेटा बेस तयार केला, जे त्यांच्या या धाडसी मोहीमेशी जोडण्यास इच्छुक होते. तसेच एक आठवड्यासाठी त्यांनी मुंबईत येऊन ३०० वाहनचालकांचा डेटाबेस तयार केला. कोलकातामध्ये सुरवात काहीशी संथ झाली तिथे फक्त १०० वाहनचालकांचा डेटाबेस तो तयार करू शकला. याचदरम्यान नितीन हे आपल्या विस्ताराच्या निधीसाठी सलग काही गुंतवणूकदारांच्या संपर्कात होते. ऑगस्टचा महिना आशादायी ठरला एका गुंतवणूकदाराकडून या कामाच्या विस्तारासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला.

नोव्हेंबर २०१५ मध्ये नितीनच्या ड्राईवर बडची सुरवात झाली. ड्राईवर बड हा एक असा मंच आहे जिथे वाहनचालकांना अशा लोकांच्या संपर्कात आणतो जो स्वतःसाठी एका ड्राईवरच्या शोधात आहे.

ड्राईवर बडचे संस्थापक आणि १९ वर्षीय सीईओ सांगतात की, ’’ड्राईव्हर-ऑन-डिमांड’’ सेवा हा मंच ऑन लाइन लोकेशनवर आधारित आहे जो ग्राहकांना पूर्ण वेळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहे. तसेच हा मंच तुम्हाला विश्वासू चालक देण्याबरोबरच त्यांना शोधण्याचा त्रास वाचवतो. नितीन यांनी सांगितले की त्यांचे लक्ष्य भारतातील सगळ्यात मोठे ड्राईव्हर डेटा बेस बनविण्याचा आहे जिथे केवळ कुशल ड्राईव्हरच उपलब्ध असतील.

व्यावसायिक आराखडा

एका ग्राहकासाठी हा मंच सुरवातीला तासावर व नंतर एका तासानंतरच्या मिनिटाप्रमाणे दर आकारला जातो. एक तासासाठी शुल्काची रक्कम ही १२५ रुपये आणि ४ तासांसाठी यांचा दर ६५० रुपये आहे.

दिल्ली स्थित एनसीआरच्या अनेक एनजीओ आणि नाईट क्लबसाठी ड्राईवर बड आपली सुविधा प्रदान करते. यांची खासियत म्हणजे वन वे ट्रीप किंवा रात्रीच्या ट्रीपसाठी ते ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेत नाही. नितीन सांगतात की इथे चालकांना एका आठवड्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. ज्याचा उद्देश ग्राहकांचे समाधान, त्यांची सुरक्षा व चांगल्या प्रतीची सेवा देण्याचा आहे.

गुंतवणूक आणि विकास

नितीन यांनी ड्राईवर बडची सुरवात मेहनतीने जमा केलेल्या आठ लाख रुपयातून केली.

आजघडीला ड्राईवर बड ही ११ सदस्यांची टीम आहे जी आईओएस आणि ऍनड्रॉइड या दोन्ही सेवांमार्फत उपलब्ध आहे. या माहितीद्वारे नितीन सांगतात की या मंचाची सुरवात नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरु झाली होती आणि आज दररोज १५० ते २०० तासांचे त्यांचे बिलिंग होते. गर्वाने नितीन सांगतात की त्यांचा विस्तार हा अगदी सहजपणे होत आहे. तसेच वारंवार येणाऱ्या ग्राहकांची संख्या ९०% आहे.

आज या मंचावर २५ वाहन चालक हे पे-रोलवर तर ८० वाहन चालक हे रीतसर कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. आज यांच्याकडे १५०० अधिकृत नोंदणी केलेले ग्राहक आहेत जे आठवड्यात कमीत कमी तीन वेळेस या सेवेचा लाभ घेतात.

आपल्या अनुभवाची जोड देत नितीन सांगतो की,’’आज अनेक असे उद्यमी आहे जे कमी वय असल्यामुळे स्टार्टअपकडे वळत नाही.

ते सांगतात की लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की देश आणि व्यवसाय दोघांचे भविष्य हे तरुणांच्या हातात आहे. आजचा तरुण आपल्या मेहनतीने लहान व्यवसायाला सुद्धा एक नवीन रूपरेषा देऊ शकतो.

नितीन अनुभवाला व्यवसायाचा गुरु मानतात, की जर अनुभव व मेहनत यांची सांगड घातली तर अशक्य असे काहीच नाही. एक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो.

व्यवसाय आणि प्रतिस्पर्धी

गोष्ट जेव्हा कारच्या मालकीची येते तेव्हा भारतात १००० लोकांच्या मागे १८ कार, हे समीकरण भारताला १६० व्या स्थानावर उभे करते. एका ढोबळ अनुमानानुसार, २०२५ मध्ये भारतात कारचे वर्चस्व वाढेल व १०००मागे ३५ लोकांकडे कार असतील.

बेंगलोर बेस ड्राईवयू हा पण एक असा मंच आहे जो आपल्या ग्राहकांना अशीच सुविधा प्रदान करतो. ते दाव्यानिशी सांगु शकतात की त्यांनी भारताला या प्रकारची पहिलीच ऍप सुविधा प्रदान केली आहे.

एक संदेश

नितीन सांगतो की, लोकांना हे पचनी पडणे अवघड आहे की १८ वर्षाचा तरुण स्टार्टअप सुरु करू शकतो. तसेच आपल्या लोकांमध्ये जोखीम पत्करण्याची क्षमता ही तशी कमीच असते. आणि जरी जोखीम घेतलीच तर आपल्याला साथ देऊन त्याचे समर्थन करणारे लोक कमीच भेटतील.

नितीन सांगतात की त्यांनी आपल्या कल्पनेला कमी लोकांमध्येच राहू दिले. कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की समोरून नकारात्मकच प्रतिसाद मिळणार आहे. नितीन नि:संकोचपणे सांगतो की लोकांच्या नकारात्मक भावनांनी बऱ्याच वेळा त्यांचे मनोबल खचले पण कुणाचीही पर्वा न करता आपल्या कल्पनेला सत्यात उतरवून त्यांनी यशाला निश्चित स्थान दिले.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

२३ वर्षीय युवक हैद्राबादची वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नात

उबेरचे सहसंस्थापक 'ट्रॅविस कॅलानिक' यांच्याकडून यशस्वी उद्यमी बनण्यासाठीच्या नऊ उपाययोजना

भारतीय तरुणांमधली सकारात्मता आणि जिज्ञासाच चांगला बदल घडवेल : ओमर बिन मुसा

लेखक-तौसिफ आलम

अनुवाद - किरण ठाकरे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags