एचएएल, गोदरेज यांची देशाच्या सर्वाधिक वजनदार उपग्रह प्रक्षेपणात महत्वाची भूमिका!

एचएएल, गोदरेज यांची देशाच्या सर्वाधिक वजनदार उपग्रह प्रक्षेपणात महत्वाची भूमिका!

Monday June 12, 2017,

3 min Read

पाच जून २०१७ रोजी इस्त्रोने भारताचा सर्वाधिक वजनदार उपग्रह अंतराळात सोडला. सरकारी हिंदुस्थान ऍरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अंतराळ विभाग भारतीय बहुराष्ट्रीय गोदरेज आणि बॉइस यांनी या उपग्रहाच्या बांधणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे.


Source: ISRO

Source: ISRO


या बाबतच्या वृत्तानुसार, एचएएलने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, “ सांगाड्याचे काम आणि ६४० टनांची इंधन टाकी रॉकेट यांची निर्मिती आमच्या ऐरोस्पेस विभागात करण्यात आली. यासाठीचे सुटे भाग आणि सामुग्री दोन्ही करीता रॉकेट आणि भूवैज्ञानकीय उपग्रह (GSAT-19) यांची निर्मिती गोदरेजच्या आंतराळ विभागात करण्यात आली जो मुंबईच्या बाहेर आहे. याबाबतच्या वृत्तानुसार, गोदरेजने म्हटले आहे की, “ रॉकेटसाठी आम्ही पहिल्या टप्प्यात इंजीन निर्माण केले आणि त्यासोबतच तिस-या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिनची निर्मीती करण्यात आली. उपग्रहासाठीची मोटर इंजीन इंजेक्टर्स देखील या आंतराळ विभागात तयार करण्यात आले.

सर्वाधिक संपर्क क्षमता असलेल्या या उपग्रहाचे वजन ३.४ टनाचे आहे, हा भुवैज्ञानिक उपग्रह (GSLV Mark-III) इस्त्रोने आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला आहे जे चेन्नईपासून ८० किमी उत्तरपूर्वेला आहे.

याबाबत बोलताना एचएएलचे अध्यक्ष टिव्ही सुवर्ण राजू म्हणाले की, “ देशात आमच्या आंतराळ विभागातच केवळ अशाप्रकारे अक्राळ विक्राळ सांगाडा तयार करणे शक्य आहे, आम्ही भारत आणि इस्त्रोच्या अशा मोहिमांसाठी बांधील आहोत, आणि भविश्यातील यशस्वी उड्डाणांसाठी देखील.”

येथे २० प्रकारे विविध सांगाडे तयार केले जातात. आणि उपग्रह बसचा सांगाडा जो तयार करण्यात आला आणि वेळेत देण्यात आला जो सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा होता. एचएएल ने या ऐतिहासिक कामाची यशस्वीपणे अंमलबाजवणी केली.

गोदरेजचे अध्यक्ष जमशेद गोदरेज म्हणाल की, “ भारत अंतराळ तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या दिशेने निघाला आहे, ज्यांच्या कडे शंभर टक्के वापर करता येईल अशी साधने आहेत. आरेखीत आणि सुनियोजीत प्रकारचे आराखडे आहेत.जे सरकार आणि खाजगी सहभागीता यातून निर्माण केले आहेत. याबाबत आणखी बोलताना गोदरेज म्हणाले की, “ इस्त्रो सोबत काम करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला, ज्यात आम्ही विकास आणि उत्पादनाच्या क्षेत्रात संवेदनशिल सामुग्री तयार केली आणि देशाच्या अंतराळ कार्यक्रमात सहभाग घेतला.”

या शिवाय एचएएलने ज्या अतिरिक्त क्षमता निर्माण केल्य त्यात त्यांच्या सुविधाचे आधुनिकीकरण आणि पुढील पिढीचे अद्य़ावत तंत्रज्ञान जे भविष्यात कामी येणार आहे ते निर्माण केले. राजू पुढे म्हणाले की, “ आम्ही बुस्टलर रॉकेट देखील आरेखित केले, जे मार्क २ या प्रक्षेपकासोबत लॉंच पँडवरून वापरले जाणार आहे.”

एचएएलने अलॉय स्ट्रक्चर्स, टँन्क आणि उपग्रह बस बार इस्त्रो पोलर आणि जीओ स्टेशनरी लॉंचसाठी पाच दशकापूर्वीच तयार केले होते. या बाबतच्या वृतानुसार पत्रकात नमुद करण्यात आले होते की, “आम्ही १८ऍरो स्टक्चर्स आणि फुयेल टँन्क्स आणि उपग्रह बस बार इस्त्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशन जे ५ नोव्हे २०१३ मध्ये करण्यात आले होते त्यात सहभाग घेतला होता.”

गोदरेज १९८५पासून इस्त्रो सोबत काम करत आहे. त्यात द्रवित पॉप्युलेशन पध्दतीचे इंजिन जे हलके, मध्यम आणि जड रॉकेटमध्ये किंवा थ्रस्ट इंजिन आणि ऍन्टेनामध्ये उपग्रहात वापरतात. ते इस्त्रोच्या चांद्रयान-१ मोहिमेच्या अंतर्गत भागातही २००८-०९ मध्ये सक्रीय होते, आणि मंगळ यानाच्या कार्यक्रमात २०१३-१४मध्येही.