संपादने
Marathi

भाषांच्या बाजारात आहे अनंत शक्यता, केवळ गरज आहे शोध घेण्याची : साहिल किणी

Team YS Marathi
18th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ज्या देशात इतक्या भाषा बोलल्या जातात तेथे केवळ एकाच भाषेला महत्व देऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. पोर्टफोलिओ, असपदाचे उपाध्यक्ष साहिल किणी यांनी टेकस्पार्क६ मध्ये सांगितले की, भारतातील कंपन्यांना ही अडचण आहे की, त्या केवळ इंग्रजीलाच जास्त प्राधान्य देत आहेत. वास्तव मात्र हे आहे की त्यांना त्यांचे विचार भारतात पोचविण्यसाठी अन्य भाषांचे महत्व ओळखता आले पाहिजे.


image


भारतात जवळपास १०० ते १२० दशलक्ष लोक इंग्रजी बोलतात जे लोकसंख्येच्या केवळ दहा टक्केच आहेत. यात ते सारे लोक सामिल आहेत, जे इंग्रजी बोलू, वाचू आणि लिहू शकतात. देशात सुमारे ७८० भाषा बोलल्या जातात. त्या ८६ लिप्यांमध्ये लिहिल्या जातात. यापैकी २९ अशा भाषा आहेत, ज्या बोलणाऱ्यांची संख्या किमान एक दशलक्ष आहे, आणि बावीस भाषांना आपल्या घटनेने अधिकृत भाषांची मान्यता दिली आहे. साहिल यांना सात भारतीय भाषांचे ज्ञान आहे.


image


साहिल यांनी सांगितले की, आम्ही देखील तेच करत आहोत जे ईस्ट इंडिया कंपनीने आमच्यासोबत केले. आम्हीच भारताच्या मोठ्या लोकसंख्येला, ज्यांना इंग्रजी येत नाही, दुर्लक्षित करतो आहोत. आज इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या एकूण छपन्न टक्के माहिती इंग्रजीत आहे. तर इतक्या मोठ्या लोकसंख्येला ज्यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकत नाही. जी उपलब्ध आहे ती एकतर भाषांतरीत स्वरुपात आहे किंवा अपूर्ण स्वरुपात आहे.

अशावेळी प्रश्न निर्माण होतो की, आमच्या विकासकांना हे अंतर आणि इतकी मोठी लोकसंख्या कशी दिसत नाही? अशावेळी आज गरज आहे ती इतर भाषांच्या जाणकारांनी या दिशेने पुढे येवून काम करण्याची.

हे काम केवळ अनुवाद करून थांबता कामा नये, तर त्या भाषेच्या मूळ आत्म्याचा शोध घेऊन त्या-त्या भाषेत हा मजकूर उपल्बध करून दिला पाहिजे जेणेकरून त्या भाषेच्या लोकांना त्याचा सहजपणाने उपयोग करता येईल. मोबाईल आणि आणि इंटरनेटच्या जमान्यात आज भारताची एक मोठी लोकसंख्या या माध्यमांशी वेगाने जोडली जात आहे, अशावेळी वेगवेगळ्या भाषांमधील मजकूर एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो. मात्र गरज आहे ती यावर बारकाईने लक्ष देण्याची. हा खूपच योग्य काळ आहे कारण अनेक नवे उद्यमी पुढे येऊन या दिशेने काम करत आहेत आणि इतक्या व्यापक भारतीय बाजारात आपले अस्तित्व दाखवून देऊ शकतात.लेखक : दीप्ती नायर

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags