संपादने
Marathi

चाकोरीबाहेर पडण्याची हिंमत दाखविणाऱ्या डेंटल सर्जनची आगळीवेगळी कहाणी

Team YS Marathi
28th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डेंटल सर्जरीसारख्या विषयात पदवी मिळाल्यावर, तुमचा भविष्यकाळ हा उज्ज्वलच असणार याची कोणालाही खात्री वाटू शकते. शिक्षण पूर्ण करुन व्यवसायाला सुरुवात करायची आणि आयुष्य सुकरपणे घालवायचे, अशीच कोणाचीही अपेक्षा असणार... पण काही लोकांची स्वप्न ही खऱ्या अर्थाने खूपच मोठी असतात आणि एखाद्या डेंटल चेअरमध्येच ती अडकून राहू शकत नाहीत. अशीच मोठी स्वप्न पहाणाऱ्यांपैकी एक आहेत डेंटीस्ट आंचल मखिजा...विशेष म्हणजे केवळ ही स्वप्न पाहून त्या थांबल्या नाहीत, तर या प्रतिकात्मक तुरुंगाच्या भिंती तोडून त्या बाहेर पडल्या आणि सगळ्यांकडून होणाऱ्या विरोधावर मात करत, आपल्या व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यातही यशस्वी ठरल्या.

image


वेगळ्या वाटेवर

“ डेंटल सर्जरीचे शिक्षण घेतल्यानंतरही मला आयुष्यात कशाची तरी कमी भासत होती. पण मी माझा दंतचिकित्सिचेचा व्यवसायच पुढे सुरु ठेवावा, अशीच माझ्या पालकांची इच्छा होती, कारण त्यांनी माझ्या शिक्षणावर बराच खर्च केला होता. मीदेखील माझ्या आयुष्यातील पाच वर्षं यासाठी खर्ची घातली होती. हा सगळा विचार करुन अखेर मी पण हार मानली. पण काही काळानंतर मात्र शस्त्रक्रियांमध्ये माझे मनच लागेनासे झाले, मला त्याविषयी गोडीच वाटत नव्हती,” २७ वर्षीय आंचल सांगतात.

सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध जात, आंचल यांनी त्यानंतर मुंबईमधील एनएमआयएमएसमधून फॅमिली बिझनेसमध्ये एमबीए केले. पारंपारिक पोषाखांच्या त्यांचा कौटुंबिक व्यवसायामध्ये - जो पूर्णपणे पारंपारीक ऑफलाईन सेटअप होता - शिरण्याची त्यांची इच्छा असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला. “ एक मुलगी असल्या कारणाने कौटुंबिक व्यवसायात प्रवेश मिळणे सोपे नसल्याचे, मला चांगलेच माहित होते. पण माझ्या व्यवसायाला आधुनिकीकरणाची गरज होती आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्यासाठी मी उत्सुक होते,” त्या सांगतात.

एमबीए पूर्ण केल्यानंतर, त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाचे डिजिटायझेन करण्याची त्यांची तयारी झाली होती आणि हे त्यांनी काही प्रमाणात साध्यही केले. पण जुन्या पिढीला याबद्दल असलेल्या संशयामुळे हे करत असताना त्यांच्याकडून विरोध हा झालाच.

संधीचे सोने

ते वर्ष होते २०१४ आणि ई कॉमर्सच्या युगाची ती सुरुवात होती. ही संधी सोडण्याची इच्छा नसल्यामुळे आंचल यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आणि स्वतंत्रपणे स्टार्टअप सुरु करण्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अभ्यास केला. “ मात्र त्यावेळी बाजारपेठेत हॉरिझॉंटल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळेच मग मला द पेहनावा (The Pehnava) ची कल्पना सुचली. असे अनेक ग्राहक असतात ज्यांना मनीष मल्होत्रा किंवा रोहीत बाल यांसारखी नामवंत डिजाईनर लेबल्स परवडू शकत नाहीत. खास अशा लोकांना द पेहनावा सेवा देते. उदयोन्मुख डिजाईनर्स किंवा ज्यांची भविष्यातील मनीष मल्होत्रा बनण्याची आकांक्षा आहे, अशा डिजाईनर्सनी तयार केलेले डिजायनर वेअर आम्ही पुरवतो आणि मुख्य म्हणजे हेदेखील तेवढेच उत्तम असतात,” आंचल विस्ताराने सांगतात.

बाजारपेठेबाबत चटकन केलेल्या एका अभ्यासातून त्यांना प्रामुख्याने लक्षात आलेली बाब म्हणजे पारंपारिक पोषाखांबाबत भारतीयांचा काटेकोरपणा.... अशा प्रकारचे कपडे हे नेहमीच एखाद्या खास प्रसंगासाठीच असतात आणि त्यामुळे ग्राहक त्याबाबत विशेष जागरुक असतात. “ लोकांना जेंव्हा त्यांच्या मनासारखी डिजाईन्स हवी असतात, तेंव्हा ते तयार कपडयांकडे वळताना दिसत नाहीत. आम्ही त्यांच्या मनातील डिजाईन्सच विचारात घेतो आणि त्यानुसारच काम करतो,” त्या सांगतात.

image


द पेहनावाने सध्या डिजाईनर्सकडून तयार करुन घेतलेल्या कस्टमाईस्ड टेलरिंगवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले असून, स्पर्धेला तोंड देण्यासाठी ते तयार आहेत. विश्वासाने ही उडी घेताना आंचल यांच्याकडे अगदी शुल्लक निधी होता आणि त्यावरच सगळे अवलंबून होते. “ आमची साईट तयार करण्यासाठी आम्ही सुरुवातीला एका कंपनीशी संपर्क साधला. त्याचबरोबर आयटी आणि मार्केटींगचा भाग बाहेरुन करुन घेण्याची आमची योजना होती. पण ती कंपनीच बनावट निघाली. त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि काहीच काम केले नाही. मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले,” त्या सांगतात.

आयटी किंवा फॅशनची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही, आंचल यांनी स्वतःचीच इन-हाऊस टीम उभारण्यास सुरुवात केली. “ हे माझ्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते. संदर्भ आणि परिक्षणांती हळूहळू मी माझी टीम बांधली, ज्यासाठी वर्षभराचा काळ जावा लागला,” त्या पुढे सांगतात.

ग्राहकांच्या इच्छेनुसार तयार केलेली उत्पादने हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. ग्राहक त्यांच्या डिजाईनसाठी किंवा रंगांचे प्राधान्य सांगण्यासाठी कॉल किंवा मेसेज करतात. हे डिजिटली करण्यासाठी आता त्यांच्याकडे इन बिल्ट सॉफ्टवेअर असून ते अधिक ग्राहक-अनुकूल आहे आणि कमी क्लिक्समध्येच काम होते.

“ धंद्यात आलेल्या तेजीमुळे आमचाही विस्तार झाली. त्या बिग बिलियन डेजच्या काळात आमचा व्यापारही चांगला झाला. पण लॉजिस्टीक्समध्ये असलेल्या कमतरतेमुळे उत्पादने पोहचविण्यात आम्ही काहीसे अपयशी ठरत होतो, जे सगळ्याच क्षेत्रात दिसून येते. त्यामुळे मग आम्हाला सर्व्हर आणि साईट स्पीडशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागले,” आंचल तेंव्हाच्या आठवणींना उजाळा देताना सांगतात. त्यानंतर मग त्यांनी एक महत्वपूर्ण कार्यकारी निर्णय घेतला, तो म्हणजे संपूर्ण प्लॅटफॉर्म एका सर्व्हरवरुन दुसऱ्या सर्व्हरवर हलविण्याचा.... जो चांगलाच यशस्वी ठरला.

द पेहनावाला नावारुपास आणण्यासाठी आंचल यांनी नियोजनपूर्वक काम केले आहे. अवघ्या दीड वर्षाच्या काळातच २०,००० पेक्षा जास्त व्यवहार पूर्ण करणाऱ्या द पेहनावाला आता दर वर्षी १,५०,००० डॉलर्सचे उत्पन्न मिळत आहे.

प्रयत्न सोडू नका

“ मी अधिक सुकर आयुष्याचा पर्याय निवडावा, यासाठी माझ्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले. एक मुलगी असल्यामुळे एकटीने यशस्वी होणे, खूपच कठीण असेल, असे माझ्या नातेवाईकांचे मत होते. मी समाजाच्या अशा भागात रहाते, जेथे चाळीस टक्के लोकांना वाटते की महिलांनी एवढे स्वतंत्र होण्याची ही जागा नाही, हे जवळपास निषिद्धच आहे. पण मी उर्वरित साठ टक्क्यांवर लक्ष केंद्रीत केले. चाळीस टक्के लोकही माझ्यासाठी आवश्यक होतेच, कारण ते तुमची ताकद असतात, त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी तुम्ही कठोर मेहनत घेता,” त्या सांगतात.

या संपूर्ण समीकरणात कुटुंबाच्या पाठींब्याला आंचल खूप महत्व देतात. “ कुठल्याही पाठींब्याशिवाय पुढे जाणे कठीण असते, जे माझ्यासाठी सुरुवातीला होते. पण, जेंव्हा मी निर्णय घेतल्याची जाणीव माझ्या वडिलांना झाली, तेंव्हा मात्र त्यांनी मला, ‘ तुला आवडेल ते कर,’ असे सांगून टाकले. मला सर्व पुरुषांना सांगायचे आहे की, महिलांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला कधीच कमी लेखू नका आणि त्यांच्यावर विश्वास दाखवा,” त्या पुढे सांगतात.

पहिल्या दिवसापासून आपल्या मनाचे सांगणे न डगमगता मानणाऱ्या आंचल, या दिवसातील थोडा तरी वेळ इतरांच्या यश-अपयशाच्या कहाण्या - खास करुन महिलांच्या, जाणून घेण्यासाठी घालवितात. त्यातूनच महिलांच्या आयुष्यात आणि प्रवासात काहीतरी योगदान देण्यासाठी ब्रॅंडचे वजन वापरण्याची त्यांना प्रेरणा मिळते. त्यासाठीची सुरुवात त्यांनी एका सीएसआर उपक्रमापासून केली असून, याद्वारे सुमारे आठ महाविद्यालये आणि कॉर्पोरेटस् मधील महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर भविष्यात महिलांच्या सुरक्षेसाठी सहाय्यभूत ठरतील अशा, ज्वेलरी आणि इतर ऍक्सेसरीजमध्ये समाविष्ट असलेल्या, स्वसंरक्षण उत्पादनांचा एक संपूर्ण विभागाच सुरु करण्यात येणार आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

तरुण 'फॅशनिस्टा' मासूम मिनावाला

फॅशन पोर्टल व्हायसोब्ल्यूः दुःखावर मात करत मायलेकींची नवी भरारी

महिलांना आरोग्य संपन्न बनवण्यासाठी झटणा-या डॉक्टर मंजूला

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags