संपादने
Marathi

ग्रामीण हस्तकलाकारांना स्वावलंबी करण्याची चळवळ : 'दस्तकार'

D. Onkar
6th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘‘ महानगरात किंवा परदेशात राहणा-यांसाठी एखादा ग्रामीण कामगार किंवा डिझायनर याच्या कलात्मक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही अगदी सोपी गोष्ट आहे. ऐतिहासिक काळातल्या कालाकारांच्या कलाकृतीचा गौरव करताना आपण थकत नाहीत. त्याचवेळी आपण सध्याच्या काळातल्या कलाकारांकडे मात्र दुर्लक्ष करतो. या ग्रामीण कलाकारांच्या उपजिविकेचा त्यांची कला हाच एकमेव आधार असतो. याचा आपण त्यांच्या कामात खोट काढताना कधी विचारच करत नाही. त्यांच्याकडं अनुकूल वातावरण तर सोडाच पण कामासाठी आवश्यक साधनांची कमतरता असते..” हे रोखठोक मत व्यक्त केलंय ग्रामीण हस्तकला कामगारांची गुणवत्ता जगासमोर आणण्याचं काम करणा-या लैला तैयबजी यांनी. गेल्या तीन दशकांपासून त्या हे काम करत आहेत. तयबजी यांनी 'युवर स्टोरी'शी साधलेल्या संवादामधून हस्तकला आणि त्याच्याबाबत असलेल्या अनेक समजुतींचा सविस्तर उहापोह केला.

'दस्तकार' च्या  संस्थापिका लैला तैयबजी

'दस्तकार' च्या संस्थापिका लैला तैयबजी


दासरा या संस्थेच्या ‘क्राफ्टिंग ए लाइवलीहुड’या अहवालानुसार ग्रामीण भारतामध्ये 70 लाख पेक्षा जास्त कारागीर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शिल्पकामाशी संबंधित आहेत. शेतीनंतर हाच ग्रामीण भागाचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. या भागात राहणा-या महिलांना मुख्य आर्थिक प्रवाहात येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. बाजारापर्यंत त्यांची कला पोहचली तरच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं त्यांचं पाऊल पडू शकेल. याच मुद्याचा विचार करुन ग्रामीण कारागीर विशेषत: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोहत्साहन देण्यासाठी 1981 मध्ये ‘दस्तकार’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिल्पकलेतल्या प्रसिद्ध तज्ज्ञ आणि दस्तकारच्या अध्यक्ष लैला तैयबजी यांनी सुरुवातीपासूनच या संस्थेला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. शिल्पकलेत क्रांती आणणा-या तसंच रुढींचं बंधन तोडणा-या व्यक्ती अशी लैला यांची ओळख आहे. सर्व जण त्यांच्या अनोख्या साडी घालण्याच्या पद्धतीचे फॅन आहेत. त्यांनी भारतीय साडीला नवं रुप देण्यात यश मिळवले आहे.

‘एक असा अनुभव ज्यानं माझं आयुष्य बदललं’

लैला तैयबजी यांना कॉलेजच्या आयुष्यापासूनच शिल्प आणि कला क्षेत्राची गोडी होती. जपानमध्ये ललित कलेचा अभ्यास केल्यानंतर त्या दिल्लीमध्ये परतल्या. फॅशन, डिझाईन, ग्राफिक्स डिसाईन इतकचं काय तर स्टेज सजवण्यासाठीही साधनांची मोठी कमतरता असल्याचं त्यांना दिल्लीमध्ये परतल्यानंतर जाणवले. या कारणांमुळे त्या काळात एक मुक्त डिझायर म्हणून काम करणे हे अत्यंत अवघड काम होते. पण अशाही परिस्थितीमध्ये पारंपारिक भारतीय हस्तशिल्पाचं काम करणं त्यांना आवडलं होतं. गुजरातमधल्या कच्छमध्ये मिळालेल्या एका कामामुळे माझं सारं आयुष्यच बदललं, असे लैला यांनी सांगितले. कच्छमध्ये त्यांची भेट काही ग्रामीण कलाकारांशी झाली. त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळाली. हे सारं आवठण करुन सांगताना लैला म्हणतात, “ त्या कलाकारांना त्यांचं शिल्प विकण्यासाठी कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ते काम करतील अशी अपेक्षाच आपण कशी करु शकतो ? या कलाकारांचं सर्वोत्तम काम जगासमोर आणण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याची आपली जबाबदारी होती. त्यामुळेच त्यांना सोबत घेऊन मी ‘दस्तकार’ या संस्थेची स्थापना केली.”

हस्तकला करणा-या महिलांचे प्रातिनिधीक चित्र

हस्तकला करणा-या महिलांचे प्रातिनिधीक चित्र


‘प्रश्नच इतका मोठा आहे की सरकार इच्छा असूनही काही करु शकत नाही’

हस्तशिल्पाच्या क्षेत्राला मदत आणि पाठिंबा देण्याच्या सरकारच्या भूमिकेबद्दल लैला सांगतात, “ मला वाटतं यांच्या अनेक समस्या आहेत. पण सरकार इच्छा असूनही याप्रश्नावर काही करु शकत नाहीत. 2 कोटी 30 लाख असंगठित कामगारांचा भारत हा विकसनशील देश आहे. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा या कारागिरांची भारतामध्ये सर्वात जास्त संख्या आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्या भल्यासाठी गुंतवणूक करायला हवी. या क्षेत्रामध्ये फॅब इंडिया सारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या उपस्थितीचं त्यांनी स्वागत केलं. ग्रामीण कलाकार आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी स्टोअर टाकू शकत नाहीत. त्यांनी बनवलेलं सामान जगापर्यंत सहजपणे पोहचवण्यासाठी फॅब इंडिया हे प्रभावी माध्यम आहे.

‘ या उद्योगात लिंगभेद नाही ’

हस्तकला हा एक कौटुंबिक उद्योग आहे. यामध्ये काही विशेष काम केवळ पुरुषच करतात. तर काही कामं फक्त महिलांनाच जमणारी आहेत. या उद्योगात अजिबात लिंग भेद नाही. हस्तकला क्षेत्रामध्ये काम करणा-या लैला सांगतात त्यांना महिला म्हणून संधी मिळताना कधीही तोटा झाला नाही. पण मला एरोनिटिकल इंजिनिअरिंग किंवा हवाई दलात पायलट म्हणून करिअर करायचं असतं तर याच्या अगदी उलट परिस्थिती असली असती.’’

आपली प्रेरणा आणि रोज काम करण्याचा आपला उत्साहचं रहस्य उलडताना लैला सांगतात, " मी सध्या 66 वर्षांची आहे. तरीही मी रोज सकाळी मी उडी मारुन अंथरुणाच्या बाहेर पडते". कदाचित मला दुहेरी आनंद मिळत असावा. कायम सुंदर कला आणि शिल्पाच्या बरोबर काम करणे आपल्या कामातून तुम्ही अनेकांना कमाई होते. त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी मदत होते.

कारागिरांना स्वावलंबी करणारी चळवळ  'दस्तकार'

कारागिरांना स्वावलंबी करणारी चळवळ 'दस्तकार'


लैला शेवटी नवोदित महिला उद्योजक आणि डिझायनर्स यांना सल्ला देताना सांगतात, “ आपल्या आयुष्यात कधीही करियर निवडण्याची किंवा व्यवसाय सुरु करण्याची वेळ आली तर एकदा शिल्पकलेचा नक्की विचार करा. ही एक अशी संधी आहे ज्यामध्ये फारशा स्पर्धेचा सामना करावा लागत नाही. त्याचबरोबर या कलेच्या माध्यमातून तुम्हाला काम करण्याचा आणि यामधून एखाद्या गरजवंताची गरज पूर्ण करणे असे दुहेरी समाधानही मिळते.”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags