संपादने
Marathi

‘अय्यामिट्टू उन्न्’ चेन्नईच्या सामाजिक शीतकपाट समूहाच्या उपक्रमामागे एका डॉक्टरची संकल्पना!

Team YS Marathi
6th Sep 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

भुकेलेल्यांना खाऊ घातल्याने तुम्हाला वेगळे आत्मिक समाधान मिळते, असे इतरही अनेक लोक करतात. याचे आणखी एक कारण असावे की, काही शतकांपूर्वी प्रज्ञावंत कवी ‘अव्वाईयार’ यांनी स्वत:च्या मुखातील एक घास आपण खाण्याआधी गरजूच्या मुखात घालण्याची प्रेरणा त्यांची कविता ‘अय्यामिट्टू उन्न्’ मधून देण्याचे काम केले आहे. डॉ इस्सा फातिमा जास्मिन यांनी याच नावाने एक नवा उपक्रम सुरू केला आहे ज्यातून भुकेलेल्याना अन्नदान केले जाते.

चेन्नईच्या वसंत नगर भागात सामाजिक शितकपाट ही संकल्पना त्यांनी रावबिली आणि काही आठवड्यापासून सुरू केली, ती याच उद्देशाने की रिकाम्या पोटात चार घास अन्न जावे. २४ वर्षांच्या ऑर्थोडोन्टिस्ट असलेल्या इस्सा यांनी पब्लिक फाऊंडेशनच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. जेथे त्या व्यवस्थापकिय विश्वस्त आहेत. ही संकल्पना कशी सुचली त्याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, “आमच्या घरात रोज काही प्रमाणात अन्न शिल्लक राहते, जे आपण वाया घालवितो. सुरूवातीला ते शिळे अन्न मी माझ्या घराच्या बाहेर बसणा-या बाईला देत असे, मला काही काळाने लक्षात आले की अशा प्रकारे रिकाम्या पोटाने राहणारी बरीच माणसे आहेत, मला नेहमीच दुस-याला काही द्यावे असे वाटते पण विचारणार कसे? मला विचारायला अवघडल्यासारखे होते. त्याने कदाचित समोरच्याच्या मनावर आघात होईल. अनेक जण गरजू असतात परंतू त्याना अन्नाची गरज आहे हे कसे समजणार?”


image


ज्यांना कुणाला घरात शिल्लक राहणारे अन्न दुस-याला द्यावे असे वाटते त्यांनी ते बंद करावे त्यावर ते कधीपर्यंत खावे याचा उल्लेख करावा आणि सामाजिक (सामूहिक) शितकपाटांत (कम्यूनिटी फ्रिज) आणून द्यावे. तेथे एक सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे तो हे पाहतो की त्यावर ते कधी खावे यांचा उल्लेख करण्यात येत आहे की नाही. जेणे करून तेथे बाधीत अन्न ठेवले जावू नये.

सामूहिक शितकपाटानंतर येथे आणखी एक कपाट आहे, ज्यात लोक नको असलेले कपडे आणि इतर वस्तू देतात. ज्या वस्तू त्यांनी वापरल्या आणि आता त्यांना कामाच्या नाही त्या इतर कुणाच्या तरी कामी येवू शकतात त्यामुळे कुणाच्या तरी जीवनात चांगला बदल होवू शकतो.

हा उपक्रम सुरू झाल्यापासून मागील दोन आठवड्यात ‘अय्यामिट्टू उन्न्’ ला किमा शंभर पेक्षा जास्त दाते मिळाले आहेत. केवळ शिळे अन्न देण्यापेक्षा लोक मुद्दाम तयार करून ताजे अन्न देखील आणून देवू लागले आहेत जेणे करून ते भुकेल्यांना जेवू घालू शकतील! इस्सा यांना लोकांचे देश-विदेशातून फोन येत असतात की, त्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्या म्हणतात की, “ मी येथे राहते आणि पाहते की अनेक लोक गरीब आहेत त्यांना दोन वेळचे अन्न नाही किंवा डोक्यावर छप्पर देखील नाही. त्यांना ते परवडत देखील नाही. अनेक जण अनवाणीच चालत असतात. मला ही सामूहिक शितकपाटाची संकल्पना चार महिन्यांपूर्वी सूचली मात्र ती आता प्रत्यक्षात आली.”

या संकल्पनेला मिळणा-या प्रतिसादाने त्यांचा उत्साह वाढला आहे, त्यामुळे चेन्नईच्या अन्य भागात त्या आता हा उपक्रम राबविण्याच्या विचारात आहेत. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags