संपादने
Marathi

पुर्नप्रक्रिया करता येणारा कचरा ‘पॉम पॉम’ घेणार विकत

10th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

दिल्ली सरकारच्या पर्यावरण विभागानुसार, राज्यात दररोज ८,३६० प्रतिदिन टन (टिपीडी) महानगर घन कचरा जमा होतो. आणखी एका अहवालानुसार दरडोई (माणशी) ५०० ग्रॅमप्रमाणे भारतीय शहरांमध्ये रोज १ ,८८ ,५०० टिपीडी (वार्षिक ६८.८ दशलक्ष टिपीडी) घनकचरा साचला जातो.

किशोर ठाकूर आणि दीपक सेठी, पॉम पॉम

किशोर ठाकूर आणि दीपक सेठी, पॉम पॉम


पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या कचऱ्यातून प्रेरणा घेत दीपक सेठी आणि किशोर ठाकूर यांनी आपलं ‘पॉम पॉम’ स्टार्टअप सुरू केलं. पारंपरिक भंगारवाला आल्याचं त्याच्या गाडीच्या हॉर्नच्या ‘पॉम पॉम’ आवाजावरून कळायचं. त्यामुळे त्यांनी आपल्या स्टार्टअपला असं अफलातून नाव दिलं.

‘पॉम पॉम’ या पुर्नप्रक्रियेशी निगडीत वेबसाईटच्या कामाला गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरूवात झाली. त्यांनी लोकांमध्ये पुर्नप्रक्रियेसंबंधी जागृती निर्माण करायला सुरूवात केली. एक टन कागदावर पुर्नप्रक्रिया केल्यास आपण १७ झाडांचं आयुष्य वाचवतो आणि एका एल्युमिनियमवरील पुर्नप्रक्रियेमुळे तीन तास टीव्ही चालू ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा आपण वाचवतो.

एखाद्याच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्याकडील घनकचरा शक्य तितक्या किंमतीत विकत घेऊन, पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या घनकचऱ्याच्या विल्हेवाटीच्या कामाला ते हातभारच लावतात. दक्षिण दिल्लीमध्ये त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केलीय. स्वच्छ भारत योजनेत खारीचा वाटा उचलत, घन कचरा व्यवस्थापनाकरता १० लाख लोकांपर्यंत पोहचण्याचं त्यांचं उद्दीष्ट्य आहे.

स्टार्टअपच्या दोन्ही संस्थापकांच्या कामाचा एकत्रित अनुभव ४५ वर्षांचा आहे. कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या ‘एसपीएमएल इन्फ्रा’च्या माध्यमातून ‘दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी’ स्थापून या दोघांनी ती यशस्वी केली.

कंपनीचे ३६ वर्षीय सीईओ दीपक यांनी बेंगळुरूच्या ख्राईस्ट कॉलेजमधून बी.कॉम. केलं तर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेअकीन विद्यापीठातून एमबीए केलं. व्यवस्थापन क्षेत्रात त्यांना दहा वर्षांचा अनुभव आहे. ‘एसपीएमएल इन्फ्रा’ मध्ये ते व्यवस्थापक म्हणून काम करतात.

५६ वर्षीय किशोर यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम. केलं. भारतीय सेनेत ते आर्मड कॉर्पस् विभागात काम करत होते. ‘पॉम पॉम’मध्ये ते सीओओ म्हणून कार्यरत आहेत. या आधी ते ‘दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी’त पूर्णवेळ संचालक म्हणून काम करायचे. त्यासोबतच ते एसपीएमएल ग्रुपच्या आणखी ५ कंपन्यांच्याही संचालक पदाचं काम पाहायचे. किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसपीएमएल इन्फ्रा’ला दिल्ली विमानतळाच्या जीएमआरद्वारा सतत ३ वर्ष ‘उत्कृष्ट सेवा पुरवठादार’ म्हणून गौरवण्यात आलं. यामुळेच किशोर यांना ‘पॉम पॉम’ची कल्पना सुचली.

प्रेरणा

दीपक म्हणतात, “कचरा व्यवस्थापन क्षेत्रातला आमचा इतक्या वर्षांचा अनुभवच ‘पॉम पॉम’ची प्रेरणा ठरली”.

त्यांना दोन गोष्टी जाणवल्या, एक म्हणजे, कचऱ्यातला पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या गोष्टी वेगळ्या केल्या तरीही कामाची गती फारशी नव्हती. दुसरं असं की, लोकांमध्ये यासंबंधी माहिती फारच कमी होती. घरगुती कचरा वेगवेगळा करून त्याला पुन्हा कशा करता तरी वापरता येईल याकरता कोणीच पुढाकार घेत नव्हतं.

दीपक सांगतात, “पुर्नप्रक्रिया करता येणारा कित्येक टन कचरा घरांमधून कचरा डेपोमध्ये येऊन पडत होता. यामुळेच आम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करण्याला प्रोत्साहन द्यायला लागलो. वर्गीकरण केलेल्या घनकचऱ्यातील पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या वस्तूंना पैसे द्यायला आम्ही सुरूवात केली. यामुळे निर्मिती, वापर आणि पुर्नप्रक्रिया या साखळीला चालना मिळून अर्थव्यवस्थेला हातभार लागला. आमच्या पुढाकारातून मग ‘पॉम पॉम’ची कल्पना साकारली. आम्ही लोकांना पुर्नप्रक्रियेचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करत आहोत”. या प्रक्रियेमध्ये असलेल्या अनुभवी टीममुळे आम्हांला या कल्पनेचा विकास आणि तळागाळात ती राबवायला खूपच मदत होत आहे. त्यांच्याशिवाय आम्ही हे काम करूच शकत नाही.

भंगारवाल्यापेक्षा अजून काहीतरी...

प्रतिस्पर्ध्याला तोंड देण्याकरता ‘पॉम पॉम’चा युएसपी आहे, इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर. एक फोन केल्यावर दारात हजर, पुर्नप्रक्रियेच्या वस्तूंचं अचूक वजन करून दाराशी त्वरीत पैसे देणे, एप आणि वेबसाईटवर सर्व पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या वस्तूंचा किलोमागे दर या सर्व गोष्टींमुळे त्यांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढते.

image


पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या वस्तू गोळा केल्यावर कंपनी त्यांच मूल्यांकन करून साठा करून कारखान्यांना विकते. तिथे त्यांच्यापासून नवीन उत्पादन बनवली जातात.

दीपक सांगतात, “आपण ज्या शॉपींग बॅग्ज, ग्लास आणि प्लास्टीकच्या बाटल्या फेकतो ते सगळं १००% पुर्नप्रक्रिया करण्याजोगं असतं.. आम्ही आमच्या ग्राहकांना पुर्नप्रक्रियेची क्रिया सहजसोपी करून समजवतो. त्यासोबतचं त्यांना हेही पटवतो की, यामुळे ते पर्यावरण संवर्धनाला हातभार लावून स्वच्छ भारत अभियानातही आमच्या सोबत सामील होत आहेत”.

सुरूवात

संस्थापकांनी सुरूवातीला एप डेव्हलपमेंट, ब्रँडींग वाहनं, कामगार आणि गोदाम या सगळ्याकरता एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पुर्नप्रक्रियेच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर महसूलाचं गणित जमवलं जातं. त्यांच्याकडे एक मोठा टाटा कँटर, १० मारुती इको कार्स, ३० कामगार आणि इतर कॉल सेंटर कामगार एवढा जामनिसा आहे. सुरूवात त्यांनी दिल्लीपासून केली आहे. या प्रकल्पात शाळा आणि हॉस्पीटल्सना सामील करून घ्यायला ते त्यांच्याही संपर्कात आहेत.

किशोर सांगतात, “कचरा पुर्नप्रक्रीया व्यवस्थापनात आम्हाला आमचं स्थान निर्माण करायचं आहे. ग्राहकांचं समाधान आणि कचरा गोळा करणे या दोन्ही आघाड्यांवर आम्ही व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्यावर, आमचं क्षेत्र विस्तारण्याचा विचार करणार आहोत”. आमचा टर्नओव्हर आताच सांगण खूप घाईचं होईल, पण येत्या काही महिन्यात आम्ही सगळे रेकॉर्ड तोडू असा विश्वास ते व्यक्त करतात.

स्पर्धेची तयारी

सध्या बाजारात असलेल्या त्यांच्या स्पर्धक स्टार्टअप्स आणि ई-वेस्ट (e-waste) कंपन्या कागद, प्लास्टीक यासारख्या कोरड्या पुर्नप्रक्रिया करता येणाऱ्या वस्तू खरेदी करतात.

किशोर सांगतात, “बाजाराचा आवाका खूप मोठा आहे. लोकांमध्ये पुर्नप्रक्रियेबाबत जनजागृती करण्यावर सध्या आम्ही भर देत आहोत. लोकांना जर कळलं, त्यांच्याकडील टाकाऊ वस्तूपासून नवीन उत्पादनं बनवता येऊ शकतं तर ते नक्कीच मदत करतील. कचऱ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलून नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवायला त्यांचा हातभार लागेल”.

दीपक सांगतात, “आम्हाला तळागाळातल्या लोकांची समजूत बदलण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. यात आमचा बराच वेळही खर्ची पडणार आहे. एकदा का आम्ही बऱ्यापैकी स्थिर झालो की, पुर्नप्रक्रियेचा प्रकल्प उघडण्याच्या विचारात आहोत तसचं इतर शहरांमध्येही कामाला सुरूवात करू. पुर्नप्रक्रियेच्या या मोहिमेत आम्हांला कॉर्पोरेटस्, शाळा, बँका, विद्यापीठ, संस्था, सरकारी मंत्रालय आणि कार्यालय यांनाही सामील करून घ्यायचं आहे”.

द कबाडीवाला, स्क्रॅपोस, एकाबडी, कचरापट्टी आणि कचरे का डब्बा हे सध्या ‘पॉम पॉम’चे स्पर्धक आहेत.

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags