संपादने
Marathi

आराधना धूप : एका ग्रामीण स्टार्टअपची प्रेरक कहाणी!

Team YS Marathi
8th Jul 2017
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

आराधना धूपच्या संस्थापक सुषमा बहुगुणा सुशिक्षित आहेत, त्या सहजपणे कुठेही शिक्षिका म्हणून काम करू शकल्या असत्या, मात्र नोकरी न करता त्यांनी स्वत: काहीतरी करण्याचे ठरविले.

“ आज ज्या काळात रोजगारासाठी पलायन करण्यासाठी लोकांना भाग पडते आहे, अशा वेळी हिमाचल प्रदेशात एक महिला स्वत: सोबत अन्य महिलांना रोजगार देण्यासाठी झटते आहे हे प्रेरक असेच कार्य आहे. धूपबती तयार करण्याच्या उद्योगातून सुषमा बहुगुणा यांनी स्वत: सोबत अन्य अनेक महिलांना आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत केली आहे.


फोटो साभार: eenaduindia

फोटो साभार: eenaduindia


हिमाचल प्रदेशातील तेहतीस वर्षाच्या सुषमा बहुगुणा यांनी आपल्या स्टार्टअपच्या (नवोद्योग) माध्यमातून दोन डझन महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. सुषमा उत्तराखंड मध्ये चंबा जिल्ह्यात राहतात.

नोकरी करण्याची एक रुढी होती, ज्याला पहावे तो नोकरीच्या मागे धावताना दिसे, लोकांना हे मात्र समजत नव्हते की सारेच नोक-या पाहतील तर ती देणा-या संस्था कुणी सुरू करायच्या? जोवर स्वत:च्या काही संस्था सुरू करणार नाही किंवा त्या देणा-या संस्था कशा उभ्या राहणार? जोवर अशा संस्था नसतील तोवर रोजगार कोण देणार? खूप जणांकडे नवा रोजगार सुरू करण्याच्या कल्पना तर असतात, मात्र यश मिळेल की नाही यावर ते साशंक असतात. ज्यावेळी रोजगारासाठी पळत राहणे त्यांनी गरज बनते. त्यावेळी हिमाचल प्रदेशात धुपबत्ती तयार करण्याचा रोजगार सुरू करून सुषमा बहुगुणा यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. त्यातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

सुषमा बहुगुणा चांगल्या शिकल्या आहेत, त्यांनी बीएड केले आहे, त्यामुळे त्या सहजपणे शिक्षिका होवू शकल्या असत्या मात्र नोकरी च्या मागे न जाता त्यांनी एक योजना तयार केली. त्यांचे पती बेरोजगार होते, त्यामुळे त्यांनी ठरविले की असे काम करावे ज्यामुळे कुटूंबाला आर्थिक हातभार लावता यावा आणि अन्य महिलांप्रमाणेच आपणही आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होवू.

दीड वर्षापूर्वी त्यांनी धूपबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले, आणि महिलांना एकत्र करून रानचौरी येथे आराधना धूप नावाच्या उद्योगाची सुरूवात केली. त्या सोबतच अन्य गावातील महिलांना देखील धूपबत्ती कशी तयार करायची याचे प्रशिक्षण दिले. या कामात पतीने ही त्यांना साथ दिली. आज हे दांपत्य वेगाने प्रगती करत आहे. सुषमा म्हणतात की, ‘ उत्पादन योग्य असायला हवे, मग बाजाराची चिंता नाहीच. धूपबत्ती बनविण्यासाठी मोठ्या उपकरणांची देखील गरज नाही. त्या प्रमाणे महिलांना हे काम सहज शक्य आहे”.

महिन्याला ४० हजारांचा फायदा

सुषमा प्रत्येक महिन्याला पाच हजारच्या आसपास धूपबत्तीचे बॉक्स तयार करतात, ते विकण्यास देखील त्यांना फारसे कष्ट करावे लागत नाही. जिल्ह्यातच सारे उत्पादन विकले जाते. सुषमा यांच्या मते तुमचे उत्पादन योग्य असेल तर बाजाराची चिंता राहात नाही. सध्या दोन डझन पेक्षा जास्त महिला त्यांच्या सोबत पूर्णवेळ काम करतात. त्या सा-या ७ ते १० हजार प्रति महिना कमाई करतात. सुषमा स्वत: देखील महिना ३०ते४० हजार रूपये कमावितात. त्यातून त्या त्यांच्या मुला-मुलीला चांगले शिक्षण देत आहेत. आता त्यांना अन्य उत्पादनांकडे देखील वळायचे आहे जेणे करून अधिक महिलांना रोजगार देता येणार आहे.

गावातील महिलांना जोडले स्वयंरोजगाराशी

त्यांनी आजूबाजूच्या गावातील महिलांना धुपबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. सर्वात महत्वाचे त्यात कोणत्याही उपकरणांविना काम करता येते त्यामुळे महिलांसाठी ते सहज सोपे काम आहे.

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags