संपादने
Marathi

सहिष्णू देशातील अनावश्यक राजकीय वितंडवाद हाच रा स्व संघ आणि भाजपाच्या राजकारणाचा मुलाधार?

Team YS Marathi
28th Jan 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

अखेर याला काय म्हणावे? एका धार्मिक नेत्याचे अशोभनीय वक्तव्य की नकोश्या व्यक्तीची टिंगल की पुन्हा एकदा अनवट विचारधारेचा रणहुंकार? दोन सिनेमांची तुलना करणे काही नवी गोष्ट नाही, ही तर समिक्षकांच्या विचारांचे रचनात्मक अविष्कार आहेत. ज्यात फिल्मी जगताला समजावून घेताना दर्शकांना नवी दालने उघडली जातात. हा एक असा अभ्यास आहे ज्यात नव्या रचनात्मक क्षेत्राचा विकास होतो. त्यातून व्यक्तीमधील चेतनांना नव्या प्रकारे जागविले जाते. दुर्दैवाने आपण एका अशा समाजात राहतो आहोत जेथे रचनात्मकता निंदेचा विषय झाला आहे. आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात भूतकाळात रमलो आहोत, त्यामुळेच मला कैलाश विजयवर्गिय यांच्या अभद्र अभिव्यक्तीवर काहीच वाटले नाही. ते लोकांना शाहरूख खान यांच्या नव्या सिनेमा रईस पासून दूर राहण्यासाठी फूस लावत आहेत, त्याच वेळी ते ऋतिक रोशन यांच्या सिनेमा काबिलची प्रशंसाही करतात.

वरवर पाहता या सा-यात काहीच हानीकारक वाट तनाही. हे त्यांच्या एखाद्या सिनेमाबाबतच्या आवडी-निवडीबाबतचे मत वाटते. मात्र कैलाश विजयवर्गिय यांचे ट्वीट इतके सरळ नाही, एकदा पुन्हा वाचा त्यांनी काय लिहिले आहे, “ जो “ रईस” देशाचा नाही, तो काहीच कामाचा नाही. आणि एका ‘काबिल’ देशभक्ताची साथ तर आम्हा सर्वांना दिलीच पाहीजे.” कैलाश विजयवर्गिय कुणी साधारण व्यक्ती नाहीत, ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यांना वादांच्या बातम्यात रहायला आवडते, आणि त्यात त्यांना अभिमान वाटतो. त्यांना अश्या प्रकारच्या वक्तव्यावरून त्यांच्याच पक्षाने कित्येकदा लाथाडले आहे. तरीही ते प्रत्येकवेळी काहीतरी नव्या वक्तव्यासोबत समोर येत असतात. मात्र त्यांच्या विषयात अनेकदा समानता असते. ते निलाजरे पणाने, धार्मिक, मत्सरपूर्ण,आणि वावदूकपणाचे असते ज्यात एका विशेष धर्मियांना लक्ष्य केले जाते.


image


रईस एक बायोपिक आहे, हा सिनेमा एका डॉनच्या जीवनावर आहे, ज्याची भूमिका शाहरुख खान यांनी केली आहे. काबिल एका नेत्रहिन दंपतीच्या प्रेम आणि बदल्याची कहाणी आहे. ज्यात ऋतिक मुख्य भूमिकेत आहेत. हे दोन्ही सिनेमे २५ तारखेला प्रदर्शित झाले आहेत. हा केवळ योगायोगही असू शकतो. मात्र त्यावरून शाहरुख आणि ऋतिकने बाहेर काहीही वक्तव्य दिलेले नाही, ज्यातून वाद होवू शकतो आणि ज्याला मार्केटिंग रणनीती म्हणता यावे.

या उलट दोन्ही अभिनेते एकमेकांचा सन्मानच करतात, आणि सार्वजनिक ठिकाणी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवतात. अश्यावेळी याबाबत काहीच प्रश्न उठत नाही की, ट्वीटरवरून दोन्ही सिनेमांबाबत बातम्या व्हाव्या आणि रईसला नुकसान करण्यासाठी वापरले जावे. मला नाही वाटत ऋतिक रोशन अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे, जे अश्या प्रकारचे वर्तन करतील. हे कैलाश विजयवर्गिय यांचे स्वत:चे विचार आहेत. ते एका अशा राजकीय विसंगतीमधून येतात ज्यांना अल्पसंख्य समाजाबाबत आकस आहे. रास्वसंघ आणि भाजपा उघडपणे एका अशा हिंदूराष्ट्राचे समर्थन करतात जेथे अल्पसंख्य समाजाला दुय्यम नागरिकत्व दिले जाऊ जाते. परिणामस्वरुप त्यांच्या जुन्या विचारधारा असलेल्या नेत्यांनी नागरिकत्वाचा हक्कच नाकारण्यापर्यंत मजल मारली होती.

वैचारिक सिध्दांता नुसार भाजपा आणि रा स्व संघ देशाच्या विघटनाला मुस्लिम समाजाला जबाबदार मानतात, आणि भारत देशाला वेगळे करण्यात देखील ते मुसलमानांना दोष देतात. त्यांचे मत आहे की मध्यकालीन युगात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याचे कारणही मुसलमान आहेत. त्यांच्या मते हा राजकीय वैचारिकतेचा संघर्ष आहे.

भारताच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विश्लेषण केले आहे की, भारतीय संस्कृतीला ग्रहण त्यावेळी लागले ज्यावेळी मुस्लिमांनी दक्षिण आशिया मध्ये प्रवेश केला. रास्वसंघाच्या मते भारतीय इतिहास हा अनिवार्य पध्दतीने ‘हिंदूंचा इतिहास’ आहे, मुस्लिम आणि ख्रिश्चन विदेशी आहेत. रास्वसंघाच्या या विचारांचा आदर्श वीर सावरकर आहेत जे मानीत होते की, खरे भारतीय तेच आहेत जे यादेशाला मातृभूमी आणि पवित्रभुमी दोन्ही मानतात. सावरकर यांचे मत होते की, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचे धर्मस्थळ वेगळ्या भूमीवर आहे. त्यामुळे त्यांच्या आमच्या देशातील देशभक्तिवर प्रश्नचिन्ह लागलेलेच राहिल. याच कारणामुळे रास्वसंघ अल्पसंख्याकाबाबत इतकी घृणा करताना दिसतात.

आधुनिकीकरण, धर्मनिरपेक्षता, आणि शहरीकरणामुळे अल्पसंख्याकाच्या प्रति भारतीय विचारधारांमध्ये झालेल्या बदलानंतरही लोक काळाच्या त्या जाळ्यात गुंतले आहेत, आणि जुन्या विचारांच्या परिघातून बाहेर पडू इच्छित नाहीत. याच विचारांच्या प्रभावाने रा स्व संघ आणि भाजपच्या नेत्यांचा धार्मिक रागाचा स्फोट होताना दिसतो. कैलाश विजयवर्गिय यांनी जे केले आणि म्हटले आहे ते काही नवे नाही. तोच जुना घासून गेलेला मुद्दा आहे. विजयवर्गिय यांनी कुणा सिनेमाला लक्ष्य केले नाही, तर त्यांचे लक्ष्य शाहरुख खान आहेत. त्याच्यावर हा वार त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे होत आहे, कारण त्यांनी त्या गुंडाची भूमिका केली आहे. शाहरुख यांना लक्ष्य करणे कैलाश आणि त्यांच्या समर्थकांसाठी वरदान ठरत आहे.

ऋतिक रोशन यांना सिने अभिनेता म्हणून नाही तर अशी व्यक्ती म्हणून पाहिले जाते जो वेगळ्या धर्माचा आहे, आणि त्यांच्या विचारानुसार त्यांचा संघर्ष शाहरुख यांच्या ओळखीसोबत आहे. या किश्श्यातील असभ्यतेमुऴे आमच्या सिने जगतामधील दोघा महान अभिनेत्यांना- शहारुख आणि ऋतिक रोशन यांच्या प्रतिभेला नाकारून त्यांच्या मूळ ओळखीपर्यंत मर्यादीत केले गेले आहे. जे दुर्भाग्य देखील आहे, आणि ऐतिहासीकदृष्ट्या चुकीचेही आहे. कैलाश विजयवर्गिय यांच्या मते ‘रईस’ आणि ‘काबिल’ दोन सिनेमे नाहीत तर दोन संस्कृतींच्या आपल्या वर्चस्वासाठी सुरु असलेला संघर्ष आहे.

दक्षिण आशियामध्ये भारतीय सिनेजगताचा काळ आतापर्यंतचा सर्वात उदार काळ राहिला आहे. येथे कधी धर्म-जातीच्या नावे भेदभाव करण्यात आला नाही, तर केवळ प्रतिभेला प्रोत्साहित आणि यशस्वी केले. यश आणि अपयश यांचे मुल्यांकन करण्यासाठी धर्म आणि जातीचा आधार घेतला नाही. जरी राजकपूर आणि देवानंद ५०च्या दशकातील सुपरस्टार होते तरी दिलीपकुमार म्हणजेच युसूफखान देखील आघाडीचे अभिनेता होते. जरी ७० आणि ८०च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी स्टारडमला वेगळे परिमाण मिळवून दिले तरी तेथे नसरुद्दीन शाह देखील होते ज्यांनी ‘नई सिनेमा’ च्या माध्यमातून नवा प्रकाश टाकला होता, आणि दोघांनाही भारतीय दर्शकांनी स्विकारले होते.

भारतीय सिनेमाच्या धर्मनिरपेक्षतेच्या ९०च्या दशकात एक नवा अध्याय लिहिण्यात आला ज्यावेळी धार्मिक राजकारण उभे राहिले होते, राममंदीर आंदोलन जोरात होते आणि भाजप आक्रमक झाली होती. खान बंधुनी बॉलीवूडवर अशाप्रकारे आपले वर्चस्व कायम केले होते, जसे पूर्वी कधीच नव्हते. अमीर खान, सलमान खान शाहरुख खान, सैफ अली खान आणि आता इरफान खान, नाजुद्दीन सिद्दीकी राजा सारखे राज्य करत आहेत. यात काही शंकाच नाही की, ॠतिक रोशन, अक्षय कुमार,अमिताभ, अजय देवगण, हे देखील कमालीच यशस्वी झाले आहेत. मात्र त्यांची खान बंधुशी काहीच तुलना केली जावू शकत नाही. पन्नासाव्या वर्षातही अमीर, सलमान, शाहरूख यांना त्यांच्या चाहत्यांचे प्रेम मिळते आहे. आणि त्यांच्यासोबत काम करणे हे देखील निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेता यांचे स्वप्न आहे.

एक काळ होता ज्यावेळी माध्यमातील काही जणांनी तसेच उजव्या विचारांच्या काही जणांनी ॠतिक रोशन यांना त्यांच्या स्पर्धेत असल्याचे दाखविले होते, काही प्रमुख मॅगेझीन मधून तशा बातम्याही झळकल्या होत्या. मात्र त्यांचा काही परिणाम झाला नाही. त्या सा-या खान बंधूनी हिंदू महिलांशी विवाह केला होता, त्यामुळे लव जिहाद ची गाडी देखील त्याला जोडण्यात येत होती. या संधीचा फायदा त्यांना देशद्रोही किंवा कमी देशभक्त सिध्द करताना केला जात होता. शाहरुख यांचा सिनेमा ‘माय नेम इज खान’ ला देखील लक्ष्य करण्यात आले होते. आणि अमीर यांचे वक्तव्य की, ‘त्यांची पत्नी भारताबाहेर जावू इच्छिते’ ला कारण नसताना वादात टाकण्यात आले आणि धार्मिक रंग देण्यात आले. देशाबद्दल त्यांच्या प्रामाणिक पणाबाबत कोणतीही शंका घेण्यास कसूर करण्यात आली नाही.

‘रईस’ तर एक बहाणा आहे, हा शाहरूख यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या सा-या समाजावर प्रशनचिन्ह लावण्याचा प्रयत्न आहे. हे देखील दाखविण्याचा प्रयत्न आहे की बहुसंख्यक कधीच देशद्रोह करत नाहीत. हे केवळ अन्य धर्मीयच करतात. हे एक धोकादायक वर्णन आहे. मात्र मागील दोन - अडीच वर्षांपासून अशा प्रकारची उदाहरणे देवून एका विशिष्ट समाजाला दडपणाखाली ठेवले जात आहे. यातून देश निर्माण करण्याच्या प्रयत्नाला कधी सहकार्य मिळणार नाही. हे केवळ विनाशाला निमंत्रण देण्यासारखे आहे.

(आशुतोष हे माजी पत्रकार असून सध्या ते आम आदमी पक्षाचे नेते आहेत, युवर स्टोरी मराठी मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या या अनुवादीत लेखातील विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags