अल्प उत्पन्न असलेल्यांना मधुमेहाशी लढण्यास मदत करणारी ‘सुक्यरे ब्लू’
मिसूरी, अमेरिकेतील एक राज्याच्या ग्रामीण भागात एका चर्चच्या कँपमध्ये राहणाऱ्या एरिन लिटीलला तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी टाईप -1 चा मधुमेह असल्याचं समजलं. पण उपचारांसाठी हॉस्पिटल्स किंवा मधुमेह तज्ज्ञ यांच्यापर्यंत जाणं तिला शक्य नव्हतं. वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत तिच्या आसपास अशा प्रकारचा मधुमेह झालेला रुग्णही तिला भेटला नाही. एलिनाची परिस्थिती भारतातल्या ६ कोटी मधुमेहग्रस्तांसारखीच आहे. जगातील ८ टक्के लोकसंख्या मधुमेहानं ग्रस्त आहे. यामध्ये भारतानं ८ कोटी रुग्णांचा आकडा पार केला तर भारत मधुमेहग्रस्त रुग्णांच्या यादीतला पहिल्या क्रमांकाचा देश बनेल.
या रोगाचं गांभीर्य पाहता लिटीलनं “स्युकरे ब्लू” ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. ही संस्था मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त लहान वयाच्या रुग्णांना तपासणी आणि उपचार या सेवा कमी खर्चात पुरवते. ही संस्था ह्रदयरोग किंवा मधुमेहासारख्या आजारांमध्ये अगदी रक्ताच्या चाचणीपासून ते औषधं आणि उपचार कमी खर्चात उपलब्ध करून देते.
सुक्यरे ब्लू ही एक फ्रेंच म्हण आहे. मधुमेह आणि मानसिक धक्का अशा दोन्हींचे प्रतिक म्हणजे ही सुक्यरे ब्लू. य़ा उपक्रमाची सुरुवात बंगळुरुच्या बाहेर एका गावात झाली. या गावात लिटील या मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग आणि रक्तवाहिन्यांसंबंधींच्या आजारांबद्दल कोणतीही माहिती नसलेल्या महिलांना त्याची ओळख करून घेण्याचं प्रशिक्षण देते. तसंच प्रतिदिन दीडशे रुपयांपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्यांना स्वस्तात उपचारांचं प्रशिक्षण देते. कर्नाटकामध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांचं प्रमाण जवळपास १५ टक्के आहे. पण लिटीलनं केलेल्या सर्वेक्षणानुसार बंगळुरुच्या बाहेरच्या गावांमध्ये हे प्रमाण ३० टक्के आहे. मोठ्या शहरांमध्ये हॉस्पिटल्समध्ये जाण्याचा खर्च वाचवण्यासाठी तसंच त्रास कमी होण्यासाठी सुक्यरे ब्लूनं प्रत्येक समुदायाचा एक प्रतिनिधी नेमला आहे.
रुग्णांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञांचा सल्ला मिळावा यासाठी सुक्यरे ब्लूनं बंगळुरुच्या जनसंजीवनी डायबेटिक क्लिनिकशी भागीदारी केली आहे. यातून गरीब आणि श्रीमंतांवर सारखेच उपचार केले जातात. याचबरोबर लिटील यांनी महिलांसाठी रोजगाराची संधीही निर्माण केली आहे. त्या सांगतात की आमच्या या उपक्रमांतर्गत आम्ही महिलांना लघुकर्ज उपलब्ध करून दिलं ज्यामुळे त्यांना स्वत:ची काही साधनं विकत घेता आली. आम्हाला यात काहीही फायदा झाला नसला तरी भारतात अनेक महिला काम करून आपल्या परिवाराला मदत करत असल्याचं पाहून समाधान वाटतं. पण आपल्याला मधुमेह असल्याचं मीसुद्धा सुरूवातीला लपवलं होतं असं लिटील सांगतात. आजही या समाजात तुम्हाला कोणता आजार झाला तर मुलीचं लग्न कसं होईल, मधुमेह झालेली मुलगी आई बनू शकते का, असे प्रश्न विचारण्याची मानसिकता असल्याचंही त्या सांगतात.
मधुमेहावरील उपचार घेत असतानाच त्यांनी अमेरिका आणि इतर देशांमध्ये यावरील उपायांचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या याच संशोधनात त्यांना भारत आणि चीनमधील या रोगाचं अक्राळ विक्राळ रुप दिसलं. लिटीलच्या काही मित्रांनी यावरील उपायांसाठीचं संशोधन २०१०मध्येच सुरू केलं होतं. लिटील यांनी एका सामाजिक उद्योगाच्या स्थापनेसह अमेरिकेतील एका औषध कंपनीला सल्ला देण्याचंही काम केलंय. आपल्या संशोधनानंतर लिटील यांनी भारतातील कमी उत्पन्न असलेले मधुमेहग्रस्त ज्यांना उपचार मिळू शकत नाहीत त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. ऑफीसमध्ये बसून काम करणाऱ्या मध्यमवर्गीयांनाच मधुमेह होतो असा समज आहे. पण प्रत्यक्षात दरदिवसाला २५० ते ३०० रुपये कमवणाऱ्या लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वेगानं वाढत आहे आणि जागरुकतेचा अभाव असल्यानं त्याचे दुष्परिणामही त्यांना भोगावे लागत आहेत. शहरातील मध्यमवर्गीयांना तपासणी आणि उपचार शक्य असल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. पण कमी उत्पन्न असलेल्यांना हा पर्याय नसतो. आपल्या खाद्य संस्कृतीत साखर आणि पिष्टमय पदार्थांचा वापर जास्त असणं हे पण या समस्येचं एक कारण आहे.
भारतात अशाप्रकारच्या दीर्घकालीन आजारांवर उपचारांची खूप गरज आहे, पण तरीही सुक्यरे ब्लूची सुरूवात करणं खूप कठीण होतं असं लिटील सांगतात. अनेक आव्हानं असली तरी त्या आपल्या मोहीमेवर लक्ष केंद्रीत करुन काम करीत आहेत.
सुक्यरे ब्लू विषयी अधिका माहितीसाठी आणि सहभागासाठी इथे क्लिक करा : YS पेजेस