संपादने
Marathi

सौरउर्जेला एक सक्षम पर्याय बनवण्याचा ध्यास

Narendra Bandabe
14th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आजपासून सुमारे सात आठ वर्षांपूर्वी सौरभ जैन यांना कुणी सांगितलं असतं की तुम्ही सौरउर्जेत पुढची वाटचाल कराल तर त्यांचाही विश्वास बसला नसता. पण आयुष्यात अनेक गोष्टी या अचानक घडतात. जिज्ञासा किंवा आवड म्हणून सुरु केलेला ग्लोबल वॉर्मिंगवरचा अभ्यास संपूर्ण आयुष्याचा दृष्टीकोन बदलून टाकेल हे सौरभ यांना कधीच वाटलं नव्हतं. इंजिनियरींगची पदवी घेतल्यावर त्यांनी मॅनेजमेन्ट स्टडीजची कास धरली. मुंबईतल्या प्रतिष्ठित बँकेत मोठ्या पगारावर ते काम करत होते. वाचनाची आवड होती आणि जगात घडणाऱ्या घडामोडींची माहिती ठेवणं हा ध्यास होता. याचवेळी ग्लोबल वॉर्मिंग विषयावर येणार्‍या लेखांवर त्यांचं जास्त लक्ष वेधलं जात होतं. " या विषयावर अवांतर वाचन करताना लक्षात आलं की ग्लोबल वॉर्मिंगचा जगाला धोका आहे. समुद्रकिनारी वसलेली शहरं ५०-६० वर्षांनी पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची मुख्य कारणं ही मानव निर्मित आहेत. मानवानं आपल्या स्वार्थापायी निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी एका फायनांशिल कंपनीद्वारे पर्यावरण आणि पारंपारिक उर्जा या विषयात शिष्यवृत्ती मिळवली. इंग्लंडमधल्या प्रतिष्ठेची ही शिवनिंग शिष्यवृत्ती माझ्या करीयरला कलाटणी देऊन गेली" सौरभ सांगत होते.

image


आपल्या या शिष्यवृत्तीच्या काळात त्यांना ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आणि त्यासाठी करावे लागणारे उपाय यावर अभ्यास करता आला. शिवाय वातावरणातला समतोल राखायचा असेल तर सध्या सुरु असलेल्या वीजनिर्मितीला एक सक्षम पर्याय तयार व्हायला हवा. हा पर्याय सौर उर्जा असू शकतो यावर त्यांचे ठाम मत झाले. म्हणून इंग्लडहून परत आल्यावर सौरउर्जेशी संबंधित कंपनीत त्यांनी दोन वर्ष काम केलं. इथं सौर उर्जेची तांत्रिक बाजू समजायला मदत मिळाली. दोन वर्षांत ते सौरउर्जासंदर्भात हजारेक लोकांना भेटले. रुफटॉप सोलर पॅनल बसवणारी ही कंपनी त्यांच्या मनात सुरु असलेल्या सौरउर्जेच्या व्यवसायाला सामाजिक आणि किफायतशीर आर्थिक बाजूनं विचार करण्याची संधी देण्यात तेवढी फायदेशीर नव्हती म्हणून तिथून बाहेर पडून त्यांनी सौरउर्जेसंदर्भात काम करणारी स्वत:ची कंपनी सुरु केली 'एक्सचेन्ज फॉर सोलर'. 

image


"दोन वर्षे अगोदरच्या कंपनीत काम करताना १००० हून अधिक ग्राहकांशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आलं की लोकांना सौरउर्जेबद्दल जुजबी माहिती असते. त्यांना पर्यावरणाचा विचार करता आपल्या गच्चीवर सौरउर्जा पॅनल बसवायचंही असतं. पण या व्यवसायात असलेल्या विविध छोट्यामोठ्या गोष्टींमुळे ग्राहक त्रस्त होतो आणि सोलार पॅनल लावण्याचा विचारच सोडून देतो. त्यामुळे त्याचं तर नुकसान होतंच, त्याचबरोबर पर्यावरणाचंंही होतं. मग मी हे असं का होतं याची कारणं शोधली. योग्य माहितीचा अभाव, सोलार पॅनल बसवण्यासाठी येणारा लाखोंचा खर्च आणि सौर उर्जेसंदर्भात असलेल्या काही गैरसमजांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व समस्यांवर तोडगा म्हणून एका वन स्टॉप केंद्राची गरज होती आणि मग एक्सचेन्ज फॉर सोलरची संकल्पना पुढे आली." सौरभ यांनी भूमिका स्पष्ट केली. 

एक्सचेन्ज फॉर सोलार ही कंपनी सौरउर्जेसंदर्भातील परिपूर्ण उपाय आहे. इथं सौरपॅनल बसवण्यासाठी येणार्‍या प्रश्नापासून ते बसवण्यासाठी किती खर्च येईल, शिवाय यासाठी लागणारं साहित्य कुठल्या वेंडर कडून मिळणार, त्यातून चांगल्या प्रतीचं आणि स्वस्त साहित्य देणारे एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यात आलं आहे. शिवाय सोलर पॅनल लावण्यासाठी लागणारं अर्थसहाय्य ही इथं उपलब्‍ध होतंय. त्याचप्रमाणे जे काम केलं जातंय त्याचं सर्वेक्षण आणि त्याचा दर्जा आदींवर 'एक्सचेंज फॉर सोलर' लक्ष ठेवून असतं. यामुळे ग्राहकाला कमी दरात सोलर पॅनल बसवून मिळतं. 

image


सौर उर्जेच्या क्षेत्रात लागणारी मोठी गुंतवणूक पाहता कंपनीनं सोलर पॅनल बसवणाऱ्या गुंतवणूकदारांचं जाळं विणलं आहे.म्हणजे तुम्हाला सोलर पॅनल बसवायचा आहे पण तुमच्याकडे तेवढा निधी नाही. मग हे गुंतवणूकदार तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पैसे गुंतवतात. त्यातून निर्माण होणारी सौरउर्जा तुम्हाला अतिशय कमी भावात मिळते. म्हणजे एकही पैसा न देता या सोलर पॅनलमधून स्वस्तदरात वीज मिळते. 

image


एक्सचेंज फॉर सोलरची कार्यप्रणाली अगदी इकॉमर्स वेबसाईट सारखी आहे. इथं सौरउर्जे संदर्भात लागणारं साहित्य जसं आपण फ्लीपकार्ट किंवा स्नॅपडीलमध्ये ज्याप्रकारे स्वस्त दरात वेन्डर शोधता येतात तसं इथंही करता येतं. तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे याची माहिती द्यावी लागते. ही माहिती मिळाल्यानंतर तिथल्या सर्वेक्षणापासून इतर सर्वगोष्टी जुळवून आणण्याचं काम एक्सचेन्ज फॉर सोलरच करतं. 

image


" आमच्यामुळे ग्राहकांना लाखोंचा फायदा होतोय. काही जणांना ७५ लाखांना मिळणारे सोलर पॅनल आम्ही ६२ लाखांपर्यंत उपलब्ध करून देतो. पाच वर्षाच्या वीजवापरातून हा खर्च वसूल होतो. त्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प मोफत होतो. ग्राहकाला ही शाश्वती देण्याची गरज होती. ती एक्सचेंज फॉर सोलर देण्यास सज्ज झालं आहे. गेल्या तीन महिन्यात कंपनीनं आठ प्रकल्प मार्गी लावलेत. अश्या १०० जणांची यादी सध्या कंपनीकडे आहे." सौरभ यांनी स्पष्ट केलं. 

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

दुर्गम खेडी उजळवणारे अनोखे स्टार्टअप ग्राम उर्जा सोल्यूशन्स

अप-सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या नव्या वाटेने चालताना... 

‘आयआयटी’च्या ‘आंच’ने बदलत आहे ग्रामीण महिलांचे जीवन, मिळत आहे स्वस्थ आणि सुखी जीवन!

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags