संपादने
Marathi

तुम्हाला हव्या तशा चपला बनवून देणारं लखनऊचं अनोखं स्टार्टअप !

22nd Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

मर्लिन मनरोचं एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे ," एखाद्या मुलीला योग्य ते पायातले बूट द्या आणि ती जग जिंकू शकेल." याचा अर्थ त्या मुलीला योग्य संधी द्या असा होतो.


पण तीच गोष्ट प्रत्यक्षात पादत्राणांच्या बाबतीत मात्र तितकीशी खरी ठरत नाही कारण एखादं डिजाईन तुम्ही मनात ठेवून खरेदीला गेलात आणि हमखास तशा चपला तुम्हाला मिळाल्या असं क्वचितच होतं. पादत्राणांची खरेदी म्हणजे हमखास होणारी द्विधा मनस्थिती. कधी आपल्या पायाच्या आकारमानानुसार बूट मिळत नाहीत तर कधी रंग आवडत नाही. कधी प्रकार तर कधी हिल्समध्ये आपल्याला तडजोड करून घ्यावी लागते. पण जर तुम्हाला तुमचे स्वत:ची पादत्राणे डिजाईन करण्याची संधी मिळाली तर? आणि ती सुद्धा घरबसल्या, तुमच्या लॅपटाॅपवर ? कुशल कारागिरांच्या मदतीने आणि त्यांच्या हमीने तुम्हाला हवी तशी पादत्राणे मिळाली तर?

साधारण एक वर्षभरापूर्वी, उत्तर प्रदेशातील तीन मित्रांना या प्रश्नातच व्यवसायाची संधी गवसली. मार्च २०१५ साली इंदोर आयआयएममधील एमबीए पदवीधारक असणाऱ्या ऋषभ सिंग यानं आपले अन्य दोन मित्र शुभम गुप्ता आणि चिन्मय सहगल यांच्या साथीनं 'पर्पलहाइड' ही कंपनी सुरु केली. त्यांचं उद्दिष्ट्य होतं ते म्हणजे प्रत्येक स्त्रिला तिला हवे तसे बुटांचे जोड मिळवून देणं. पर्पलहाईडमध्ये ग्राहक ३ डी साधनाच्या सहाय्यानं आपली पादत्राणं डिजाइन करू शकतात आपल्या शैलीनुसार हिल्स जेवढे हवे तेवढे, त्याची उंची आणि पद्धत या गोष्टीसुद्धा ग्राहक आपल्या मर्जीनुसार बनवू शकतात.

नोव्हेंबर २०१५ पासून त्यांची वेबसाईट सुरु झाली. फर्निचर व्यवसायाची पार्श्वभूमी असणाऱ्या शुभमनं आता कंपनीच्या सीओओपदाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि कंपनीची उत्पादन आणि विविध कामांची आखणी ते करतात. चिन्मय हे सध्या अमेरिकेमध्ये एमबीए शिकत आहेत आणि आपल्या टीमच्या धोरणांची आखणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

image


लखनऊचे युवा

भारतात सानुकूल बूट निर्मिती ही संकल्पना तशी नवीनच. ऋषभ जेंव्हा आपल्या व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नाशिब आजमावत होते त्याही आधीपासून त्यांना इ-कॉमर्स विभागात काहीतरी व्यवसाय सुरु करायचाच होता आणि त्याचवेळी त्यांना ही कल्पना सुचली. ते म्हणतात ," माझ्या मैत्रिणी बूट खरेदी करायला जायच्या तेव्हा आपल्या आवडीचं काहीतरी मिळावं यासाठी १०० दुकानं धुंडाळायच्या. पण त्यांना कधीच योग्य तो जोड मिळायचा नाही. मला हे माहित होत की परदेशातल्या काही दुकानांमध्ये म्हणजे अमेरिकेतल्या 'नाइकड' किंवा ऑस्ट्रेलियातल्या 'शूज ऑफ प्रे' मध्ये सानुकूल बूट बनवून मिळतात."

ऋषभ यांना या ठिकाणी संधी दिसली ती अशी : उत्पादनांचा खर्च कमी केल्यास आणि बाजारपेठेपेक्षा किफायतशीर किमतीत त्यांनी आपले उत्पादन तयार केलं तर इथे मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकेल. मित्रांबरोबर त्यांनी ही योजना एकदा विविध दृष्टीकोनातून पडताळून पाहिली आणि आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते आपल्या घरी लखनऊला पोहोचले.

आता चपलांच्या निर्मितीत त्यांचा अजिबात अभ्यास नव्हता . त्यामुळे त्यांना गुणवत्तेची चिंता सतावू लागली. त्यासाठी त्यांनी मग संशोधन करायचं ठरवलं. त्यांनी कानपूर आणि आग्रा मधल्या उत्पादन विभागांना भेटी दिल्या. रायबरेली आणि नोएडा इथल्या पादत्राणे डिजाइन करणाऱ्या संस्थाच्या प्राध्यापकांशी चर्चा केली." आता आम्हाला विश्वास आहे की आम्ही अगदी उत्तम पादत्राणे बनवू शकतो." ऋषभ  म्हणाले.

सध्या त्यांच्या या वेबसाईटवर बेले फ़्ल्याट्स, पंप्स, सॅन्डल्स, ऑक्सफ़र्ड्स आणि एंकल बुट्स सारखी शैली, तसंच ७० निरनिराळे रंग आणि चामड्याचे पोत तर २०० दशलक्ष विविध क्रमपर्याय उपलब्ध आहेत. एकदा का तुम्ही तुमच्या पादत्राणांचं डिजाईन नक्की केलंत की तुम्ही विविध कोनांमधून फिरवून पाहू शकता आणि तुम्ही खरेदी केल्यानंतर दोन आठवड्यात तुमच्या घरी तुम्हाला तुमचे मनपसंत जोड घरापर्यंत चालत येतात.

वृद्धी :

लखनऊ आणि कानपूर ही ठिकाण म्हणजे पारंपारिक पादत्राणं बनवणारी शहर आहेत. कामगार वर्ग इथे सहजतेनं मिळतो त्यामुळे त्यांनी लखनउ इथे एक छोटेखानी उत्पादन विभाग सुरु केला. यासाठी प्रत्येकाने गुंतवणूक म्हणून आपापल्या जवळील १० ते १५ लाख खर्ची लावले. मात्र उत्पादकांना समजवण्यासाठी त्यांना बराच काळ खर्ची घालावा लागला कारण प्रत्येकासाठी वेगळी पादत्राणं ही संकल्पनाच त्यांना पटत नव्हती, कारण त्यांना विविध मोठमोठ्या नामांकित ब्रांड कडून मोठमोठाल्या मागण्या पूर्ण करायची सवय होती.

सुरुवातीच्या काही आठवड्यात त्यांचा व्यवसाय हा ओळखीच्या आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून झाला. या वर्षी त्यांनी फेसबुकवर जाहिरात सुरू केली आणि सोशल मिडिया आणि फॅशन ब्लॉगर्स कडून त्यांना उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या. " आमच्या वेबसाइट्ला दररोज १००० पाहुणे भेट देतात. जरी त्यांनी पादत्राणं विकत घेतली नाहीत तरी ते एखादा बूट डिजाईन करतात आणि आपल्या आवडीचा म्हणून तिथे ती डिजाइन जपून ठेवतात." ऋषभ सांगत होते. हे जोड ज्या वस्तूपासून तयार झाले आहेत त्यावर त्याची किमत ठरते, जी २००० पासून ५००० रुपयांपर्यंत जाते.

सध्या पर्पलहाइडला नोकरदार महिलांकडून सर्वाधिक मागणी आहे , ज्यांचा वयोगट २० ते ३५ वर्ष इतका आहे. बेंगळूरू, गुरगाव, दिल्ली, कोलकाता , पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून त्यांना मागणी येते. आणि आता त्यांना त्यांच्या ग्राहकवर्गात ख्यातनाम मंडळींची सुद्धा भर पडू लागली आहे. बालिका वधू या मालिकेतील कलाकार शिवशक्ती सचदेव यांनी पर्पलहाईड मधून टोकदार पुढील भाग असलेले बूट मागवले आहेत.

स्वत:चा ब्रांड

त्यांच्या संपर्क जाळ्याबाहेरील आलेली पहिली मागणी त्यांना आजही आठवते आहे. ऋषभ त्याची आठवण सांगतात की ते पहिले बूट होते काळे, बॅक एंकल बूट, अलाहाबाद वरून त्याची मागणी झाली होती. सुरुवातीला ही एकच बाहेरून आलेली मागणी होती, पण अधिकाधिक जाहिराती केल्यावर त्यांना कळलं की आणखीन लोकांपर्यंत त्यांना पोहोचणे शक्य होईल.

अन्य कोणत्याही ब्रांड बरोबर भागीदारी न करता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी ऑफलाइन म्हणजेच किरकोळ बाजारपेठेत सुद्धा विविध योजनांनी उतरायचं ठरवलं आहे. सीड फंडिंग म्हणजेच गुंतवणूकदारांनी समभागांसाठी गुंतवलेल्या रकमेतून ही नवी योजना ते राबवणार आहेत. "यावर्षी आम्हाला नफा होईल अशी आशा आम्हाला आहे. आम्ही प्रत्येक बुटामागे नफा कमावतो, त्यामुळे आम्हाला कोणतीही सवलत द्यावी लागणार नाही." ऋषभ म्हणाले. नऊ जणांच्या त्यांच्या या चमूनं आत्तापर्यंत पाच महिन्यात १०० बूट विकले. आता दर महिन्याला १००० बूट अस उद्दिष्ट्य त्यांनी आखलं आहे. त्यांच्या आगामी योजनांमध्ये पुरुषांचे बूट, स्त्रियांच्या बॅग्स आणि पाकीट आदींचा समावेश आहे.

वाढीसाठी उपयुक्त

पादत्राणं निर्मितीमध्ये चीन पाठोपाठ भारताचा क्रमांक दुसरा आहे. जे जगभरातल्या बूट निर्मितीच्या १३ % इतकं आहे. याचाच अर्थ आम्हाला लक्षावधी ग्राहक उपलब्ध आहेत. जगभरात जर दर प्रत्येकी २ ते ३ पादत्राणांचे जोड असा हिशोब लावला तर भारतात मात्र तोच दर १-१ असा येतो.

स्वदेशी बाजारपेठ जी तब्बल २०,००० करोड इतकी आहे तिथे आम्हाला खूप वाव आहे. आमच्यासारख्या अशा नवकल्पनांना भारतातील वाढत्या फॅशन उद्यम आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या मोहिनीचा मोठा फायदा होणार आहे. पर्पलहाईडनं आपल्या ३ डी डिजाइनसह मोबाइल अॅपवर आता काम सुरु केलं आहे. जे मे २०१६पर्यंत ग्राहकांच्या भेटीला येईल.

पर्पल म्हणजेच जांभळा रंग हा श्रीमंती दर्शवतो आणि हाईड म्हणजे चामडे. " या नावाचा मोठा ब्रांड म्हणून निश्चितच उदयास येईल . " ऋषभ यांनी आपला आत्मविश्वास दर्शवला. सिंड्रेलासाठी काचेचा बूट नशीबवान ठरला पण भारतातील शु प्रेमींसाठी कदाचित हे राजेशाही चामडं चमत्कार घडवू शकेल.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

'फॉरमायशादीडॉटकॉम' भेटवस्तू देण्याची अनोखी कला

आता लठ्ठपणाची लाज नको... बना 'प्लस साईज मॉडेल' आणि व्हा मालामाल... 

वुडॉन.... लाकडी फ्रेम्सचं ग्लॅमर 

लेखिका : अथिरा नायर

अनुवाद : प्रेरणा भराडे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags