संपादने
Marathi

बक-या विकून घरात शौचालय बनविणा-या १०४ वर्षाच्या कुंवरबाई यांच्या पायाला हात लावून पंतप्रधानानी घेतला आशीर्वाद !

Team YS Marathi
6th Mar 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

असे म्हणतात की, जिद्दीसाठी वय नसते. एक लहान मुलगा देखील आपल्या जिद्दीने लढाई जिंकू शकतो आणि एखादा प्रौढ व्यक्ती देखील. तुम्हाला एका गोष्टीचे आश्चर्य वाटेल की, १०४ वर्षाच्या एका वृद्ध महिलेमध्ये एक अशी जिद्द आहे, जी अनेक लोकांमध्ये नसते. या महिलेने कधीही टीव्ही पाहिला नाही, ना कधी वर्तमानपत्र वाचले. नक्षली भागात राहणा-या या महिलेने जे केले, ती खरच खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट यासाठी मोठी आहे कारण, त्यांच्या या कार्यामुळे देशातील अनेक महिला आणि पुरुष धडे घेऊ शकतात आणि स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगले करू शकतात. या महिलेचे नाव कुंवर बाई आहे. कुंवर बाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान पासून प्रेरित होऊन आपल्या १० बक-या विकून आपल्या घरात शौचालय बनविले. इतकेच नव्हे तर, कुंवर बाई शौचालय बनविण्याच्या अभियानाबाबत लोकांना देखील सांगतात. या वयात देखील त्या गावात फिरून लोकांना त्याबाबत माहिती देतात. मोठी बाब ही आहे की, त्यांना त्यांचे हे म्हणणे मोठ्या फलकावर लिहून सांगण्याची देखील गरज नाही. 

image


राजनांदगाव जिल्ह्याच्या नक्षली भागातील बरारी गाव येथे राहणा-या कुंवर बाई यांनी जीवनातील १०४ वर्ष याच भागात व्यतीत केले. शहर काय असते, कसे दिसते, हे त्यांच्यासाठी स्वप्नासारखे आहे. मात्र, असे म्हणतात की, मागासवर्गीय भागात राहणा-या लोकांचे विचार देखील तसेच असतील, हे गरजेचे नाही. यालाच सत्यात उतरवले आहे, कुंवर बाई यांनी. कुंवर बाई सांगतात की, “आपण जेथे राहतो, तेथे लोक येतील, तेव्हा बघतील की, आयुष्य किती कठीण आहे. गंगरेल बांधच्या मध्ये बेट असल्यासारखे आहे, आमचे बरारी गाव. एकदा पाऊस पडल्यावर आयुष्य जगापासून वेगळे झाल्यासारखे वाटते. पन्नास वर्ष झाले मी, येथे रहात आहे. आम्ही कधीच शौचालयची सुविधा उपभोगली नाही. मात्र जेव्हा घरात सुना आल्या तेव्हा ते चांगले वाटले नाही. घरातल्या पैशांची गरज बक-यांनी पूर्ण होते. माझ्याकडे आठ-दहा बक-या होत्या. सुना, नाती यांना चांगले आयुष्य आणि चांगले स्वास्थ्य देण्यासाठी बक-या विकल्या. त्यांना मिळालेल्या २२ हजार रुपयांपासून दोन शौचालये बांधली.” 

image


कुंवर बाई मोठ्या अभिमानाने सांगतात की, “कुणी घरात आले, तर त्यांना पण सांगते की, बघा माझ्या घरातले लोक आता बाहेर जात नाहीत, तुम्ही देखील बनवा. सर्वांकडेच पैसा नव्हता, त्यामुळे शौचालय बनविण्यासाठी दुस-यांची जी मदत करता येईल ती देखील केली. आता आमच्या गावात प्रत्येक घरात शौचालय आहे.” 

image


खरे तर छत्तीसगढच्या नक्षली भागात राजनांदगांव जिल्ह्याच्या कुर्रुभाठ गावात २१ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरअर्बन अभियानाची सुरुवात केली. येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०४ वर्षाच्या कुंवर बाई यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला. पीएम मोदी यांनी त्यांना मंचावर सन्मानित केले आणि त्यांचे तोंड भरून कौतुक देखील केले. कुंवर बाई यांच्या बाबत मोदी यांनी सांगितले की, “येथे १०४ वर्षाच्या कुंवर बाई यांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला लाभले. देश बदलत आहे. असे वाटते की, एखाद्या लहानशा गावातील एक वृद्ध महिला जेव्हा स्वच्छ भारत अभियानाच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती प्रत्येकासाठी विशेषकरून तरुणांसाठी प्रेरणा स्रोत असते. कुंवर बाई सारख्या वृद्ध महिलेचा हा विचार संपूर्ण देशात गतीने येणा-या परिवर्तनाचे प्रतिक आहे. मी त्यांचे अभिवादन करतो. जे लोक स्वतःला तरुण मानतात, त्यांनी निश्चित करावे की, त्यांचे विचार देखील तरुण आहेत का?”

imageमोदी यांनी मिडीयाला अपील केले की, त्यांनी माझे भाषण प्रसारित केले नाही तरी चालेल, मात्र कुंवर बाई यांच्या या प्रेरणादायी कार्याला लोकांपर्यंत आवश्यक पोहोचवावे. जाहीर आहे, कुंवर बाई या वयात देखील ज्या गोष्टींसाठी लोकांना जागरूक करत आहेत, त्यासाठी अनेक विशेषणे लहान आहेत. त्यासाठी म्हटले जाते की, कुणीही वयाने लहान किंवा मोठा नसतो. मन, मस्तिष्क आणि मानसिकतेने एखादी व्यक्ती लहान मोठी असते. कुंवर बाई यांसारख्या वयाच्या मानाने वृद्ध महिला देखील मन-मस्तिष्कने सचेतन असू शकतात आणि जगाला दिशा देखील दाखवू शकतात. गरज आहे, कुंवर बाई यांसारख्या लोकांची जेणेकरून पीएम नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत देश प्रत्यक्षात दिसू शकेल.

image


अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

सर्व काही स्वच्छ-सुंदर तुळजापूरसाठी

अनाथ ‘ज्योती'च्या जिद्दीची भरारी : शेतमजूर ते सॉफ्टवेअर सोल्यूशन 'सीईओ'

लेखक : रवी वर्मा

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags