संपादने
Marathi

"तुम्हाला काही करण्याची उर्मी आहे, मग थांबू नका तुमची आवडच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल"

Team YS Marathi
4th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला स्वत:चं असं काहीतरी वेगळं स्थान बनवण्याची इच्छा असते." शिल्पी यादव सांगत होत्या. " अगदी सुरुवातीपासून मला काहीतरी करायचं होतं आणि त्या दिशेने मी पाऊले उचलली. मी अभ्यास केला आणि डिजाईन्सचा सराव केला. हे जे काही प्रयत्न होते ते माझ्या आवडीसाठी होते आणि त्यासाठी लागणारा वेळ हा मी माझ्या सरावाच्या आड येऊ दिला नाही. एकदा का मला उद्योगाचं ज्ञान आलं आणि अनुभव मिळाला, मला माहित होतं की आता मी स्वत:च्या पायावर उभी रहायला तयार आहे. काहीतरी कलाकृती निर्माण करणं आणि त्यावर डिजाईन साकारणं हे माझ्यासाठी माझ्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे. माझी कंपनी ‘खरकपास’ हे त्याचंच विस्तारित रूप आहे.

खरकपास

फेब्रुवारी २०१५ मध्ये खरकपासची निर्मिती झाली. खरकपास हा एक फॅशन आणि डिजाईनसाठी सुरु करण्यात आलेला उद्योग आहे. इथे पारंपरिक कलाकुसर कामगारांकरवी २१व्या शतकातल्या फॅशनला पारंपारिकतेसह आधुनिकतेची जोड देण्यात येते. सिलोट्स, बोहेमियन डिजाईन आणि योग्य प्रकारे दिलेले कट्स यामुळे पारंपारिक विण आणि अत्यंत खडतर असं कसब असलेली कलाकुसर खरकपासमध्ये सहज आढळतात. शिल्पी सांगत होत्या," आम्ही देशातल्या विविध भागातल्या छोट्याछोट्या कारागिरांसोबत काम करतो. हे जे कारागिर आहेत ते आमच्यासाठी कोनशिलेचे महत्त्वाचे दगड आहेत. आमच्या कामासाठी मिळणारी प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळते. काहीजणांनी आजच्या अत्याधुनिक दबावापुढे सुद्धा त्यांनी आपली कला जोपासली आहे, हे खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे.

खरकपास याचा हिंदीतला अर्थ शुद्ध कॉटन! उत्पादनाचं नाव ठेवताना, त्याचा दर्जा कळावा हा आमचा हेतू होता. "आमच्या सर्व डिजाईन्स मध्ये शुद्धता हा महत्त्वाचा घटक आम्ही कटाक्षाने पाळतो. आम्ही जे कापड वापरणार आणि पारंपारिक कलाकुसर करणार त्यात शुद्धता ही हवीच हा आमचा आग्रह आहे. " शिल्पी म्हणतात.

गेल्या काही वर्षात शिल्पीसारखेच अनेक डिजाइनर्स आपल्या संस्कृतीची पाळ्मुळं शोधत जुन्या कारागिरांपर्यंत पोहोचत आहेत आणि नव्या पिढीला आवडतील अशी वस्त्रं प्रावधाने निर्मिती करीत आहेत. हा जो कल आहे तो निव्वळ भारतीय तरुणांपुरताच मर्यादित आहे असं नाही तर परदेशातल्या अनेक ग्राहकांना ही वस्त्रं भुरळ घालत आहेत.

image


वाढता कल :

त्या म्हणतात," ही जी जागृती होतेय ती निव्वळ घरगुती बाजारपेठेपुरती मर्यादित नाही तर जगभर होते आहे आणि हे फक्त नव्या पिढीपुरतंच मर्यादित नाही तर सध्याचा कल बदलतो आहे. हे काही नवीन नाही तर आपल्याच अस्तित्वाचा एक जुना भाग आहे. आपण जे आता करत आहोत, ते म्हणजे त्याला मुख्य प्रवाहात आणणं."

शिल्पी यासाठी हे उदाहरण देतात, "आपल्या देशात आमचे अर्ध्याहून अधिक ग्राहक दाक्षिणात्य भागातले आहेत. तर परदेशांमध्ये अमेरिकेतल्या पश्चिमी तटवर्तीय प्रदेश आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांमधल्या ग्राहकांपर्यंत आमच्या कपड्यांना मागणी आहे. मला वाटतं डिजाइनमध्ये असणारा साधेपणा आणि कपड्यांचा पोत यामुळे त्या प्रदेशात या कपड्यांची मागणी आहे. "

आधार आणि व्यवसायात यश:

खरकपासचं मुख्य उद्दिष्टच मुळात वस्त्रोद्योगातील पारंपारिक कलाप्रकार जोपासणं, संगोपन करणं आणि त्याद्वारे कारागिरांना उदरनिर्वाहाची संधी देणं हे आहे. पण तरीही एक यशस्वी आणि नैतिकता जपत टिकणारा असा व्यवसाय सुरु ठेवणं हे मोठं आव्हान आहे. शिल्पी म्हणतात," व्यवसायात टिकाव हा तुम्ही तुमच्या व्यवसायात नेमकं कोणतं ब्रीद वापरता यामुळे येत नाही तर तुम्ही कसे जगता, काय खाता किंवा समाजाप्रती तुमचं योगदान काय आहे या सर्वांमध्ये ही भूमिका दिसून यायला हवी.

खरकपास मध्ये आम्ही भारतीय हस्तव्यवसाय आणि हातमाग उद्यमासोबत काम करतो. आम्ही आमच्या परीने भारताची ही प्राचीन कला जपण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळवून देतो. आमच्या या भागीदारीमध्ये आम्ही पारदर्शकता, संवाद आणि एकमेकांच्या कामाचा आदर या गोष्टी कायम जागृत ठेवल्या आहेत. आमच्या विक्रेत्यांसोबत आम्ही अधिकाधिक काळ एकमेकांना पूरक आणि फायदेशीर ठरेल असाच करार ठेवतो. या पद्धतीच्या कामाला लोकांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. 

image


मुळांकडे परत:

शिल्पी यांनी दिल्लीच्या विद्यापीठातून फाईन आर्ट्सची पदवी मिळवली. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिजाईन मधून अपेरल डिजाइनचा अभ्यास पूर्ण केला. आपल्या अभ्यासक्रमाला जोड म्हणून त्यांनी सॅनफ्रान्सिस्कोमधून मर्चंटाइस मार्केटिंगचा अभ्यासही पूर्ण केला. भारतात परतल्यावर त्यांनी स्थानिक डिजाईन स्टुडियोमध्ये काम केलं. "खरकपास सुरु करण्यापूर्वी माझी शेवटची नोकरी होती ती म्हणजे एका इ -कॉमर्स कंपनीत क्रिएटिव हेड म्हणून !" त्या सांगत होत्या खरकपास मध्ये निर्मिती, आराखडा आणि विपणन ही त्यांची जबाबदारी आहे. विपणनासाठी प्रवास करणे आणि तेही स्वत:च्या व्यवसायासाठी हा अनुभव त्यांच्यासाठी पूर्वीच्या कामापेक्षा वेगळा आहे. " आम्ही आमच्या रेखाटनावर काम करण्यासाठी वस्त्रांचा पोत नियमानुसार असण्यासाठी, आणि छपाईसाठीसुद्धा संपूर्ण देशभरात फिरतो. गुरगावमधल्या आमच्या मुख्य कार्यालयात शेवटी कलाकुसर आणि निर्मिती केली जाते. आमच्या रचना नेहमीच अत्यंत साध्या आणि सुबक ठेवण्यावर आम्ही भर देतो.

निर्मिती पश्चात आणि वाहतूक व्यवस्थासुद्धा आमच्या मुख्य कार्यालयातून केली जाते. आम्ही संपूर्ण भारतात वितरण करतो. आमची बरीचशी विक्री ऑनलाइन असते. ऑफलाइन बाजारपेठेत आणि पॉप अप साइटवरून सुद्धा आमची विक्री होते. " शिल्पी आपल्या व्यवसायचं स्वरूप सांगत होत्या.


image


निधी आणि श्रेणी:

"खरकपासचा निधी उभारण्यासाठी अतोनात कष्ट उपसावे लागले, " शिल्पी गंभीरतेनं सांगत होत्या. " ही कंपनी स्वत:च्याच पैशाने उभी राहिलीय." शिल्पी अधिक स्पष्ट करून सांगू लागल्या." आम्ही सुरु केलं तेव्हापासून सहा महिने आम्ही निधीच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक होतो. आम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्याने तर आम्ही अत्यंत आभारी आहोत ."

त्यापुढे त्या अत्यंत उत्साहात सांगत होत्या. "यात आमचे स्वत:चे पैसे लागलेले असल्याने, आम्हाला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि जपून पावले टाकत व्यवसाय करावा लागतो. आम्हाला आपल्या देशात आणि बाहेरील देशात मिळणारा प्रतिसाद खूपच चांगला आहे. आता आम्ही ऑफलाइन विक्रीच्या माध्यमावर अधिक भर देणार आहोत. काही दुकानाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही आमच्या वस्त्रांची काही यशस्वी प्रदर्शन आयोजित केली आणि ऑफलाइन वितरणासाठी ही प्रदर्शनं मैलाचा दगड ठरली.

पुढील वाट खडतर आहे पण शिल्पी यांना इथंपर्यंत आल्याचा अभिमान आहे. " आम्ही सुरु केलं तेव्हा आम्हाला व्यवसायाची आवड तर होती पण समज नव्हती. कोणताही नवा प्रकल्प सुरु होतो तेव्हा साशंकता असते आणि अनुत्तरीत प्रश्न असतात. आपल्या डिजाईन आवडतील का? येणाऱ्या आव्हानांना आपण पेलू शकू का? कारण निव्वळ कॉटनचे कपडे आपण विकणार आहोत. मात्र आज आमचं उद्दिष्ट्य ठरलेलं आहे आणि अजूनही आवड कायम आहे आणि पहिल्यांदा वाटणारी उत्सुकतासुद्धा अजून कायम आहे. अर्थात रोज नवीन आव्हानं समोर येतात आणि आमच्या अपेक्षा वाढत जातात. आम्ही आमच्याकडूनच अधिकाधिक चांगल्याची अपेक्षा करू लागलो आहोत. पण हीच तर गम्मत आहे. खरकपासची सुरुवात एका छोट्याश्या खोलीत झाली, जिथे दोन शिलाई यंत्र होती आणि आज आमच्याकडे संपूर्ण निर्मिती विभाग आहे आणि डिजाईनर्सची फौज आहे," शिल्पी उत्साहात सांगत होत्या.

याच उत्साहात त्या पुढे म्हणाल्या ," आमचं भवितव्य अगदी उज्ज्वल आहे. आम्ही अगदी आशावादी आणि खूप उत्साही आहोत. आम्ही नक्कीच स्वत:साठीच एक पदचिन्ह निर्माण करणार आहोत." या व्यवसायात जशा जमेच्या बाजू आहेत तशाच बाधक बाजू सुद्धा आहेत. " नवनव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देणं हे नेहमीच आव्हान राहिलं आहे. आमच्या विक्रेत्यांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता साधून ठेवण्याचं आव्हान सुद्धा आमच्यासमोर आहे. पारंपारिक व्यवसायात त्यांचे अन्य निर्मात्यांसह निव्वळ व्यावहारिक संबंध होते. इथे आम्हाला त्यांचे मन राखून दीर्घकालीन व्यवसाय करायचा आहे. " शिल्पी म्हणाल्या.


उद्योजिका बनण्याचं स्वप्न :

शिल्पीसाठी उद्योजिका बनण्याचा प्रवास तसा साधा मुळीच नव्हता पण तरीही तो प्रत्येक क्षण त्यांनी अनावधानाने स्वीकारला असं त्याचं म्हणणंय. ! " आज मला हरण्याची भीती नाही आणि एखादी नवीन चूक ही माझ्या दृष्टीने नवा धडा असते आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कारण सुद्धा ठरते." त्या म्हणाल्या. "पुढचा प्रवास अत्यंत खडतर आहे पण मला दूरवर जायचं आणि मी जाणारच! उद्योजिका बनण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्यात सतत एक चैतन्य सळसळत राहतं. नवनिर्मितीच्या समाधानाची तुलना अन्य कोणत्याही गोष्टीशी होऊ शकणार नाही. यातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक यश मग ते छोटं असो वा मोठं तुम्हाला पुढची उडी घ्यायला ते प्रेरणा देतं."

सल्ला:

नवीन उद्योजिकांना शिल्पी सल्ला देतात, तोही त्यांच्या व्यवसायाच्या ब्रीदानुसार," तुमची आवड ही तुमची मार्गदर्शक बनेल. तुम्हाला काही करण्याची उर्मी आहे, मग थांबू नका. कारण योग्य वेळ कधीच येत नसते. तुमची आवडच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल."

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या 

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

फॅशन जगतातल्या ४ भारतीय युवती त्यांचे लाईफस्टाईल ब्रँड घेऊन सज्ज

मुळ कथा : राखी चक्रवर्ती

अनुवाद : प्रेरणा भराडे 

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags