संपादने
Marathi

पुणे स्थित ऑटो-रिक्षा जाहिरात स्टार्टअप प्रॉक्झिमिटीने '1क्राऊड'च्या सहाय्याने उभारला एक कोटी रुपयांचा निधी

22nd Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

प्रॉक्झिमिटी (ProximiT) या पुणे स्थित स्टार्टअपने नुकतीच एक कोटी रुपयांचा (१,५०,००० डॉलर्स) निधी उभारल्याची घोषणा केली. निधी उभारणीच्या सुरुवातीच्या काळातच 1क्राऊड (1 Crowd) या क्राऊड फंडींग व्यासपीठाच्या माध्यमातून हा निधी उभारण्यात आला आहे. २०१५ मध्ये '1क्राऊड'ची स्थापना करण्यात आली होती. पुणे आणि इतर शहरांमध्ये विस्तार करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.

image


अभय बोरा(३७), यश मुथा(३५) आणि कमलेश संचेती(३५) यांनी प्रॉक्झिमिटीची स्थापना केली असून, आज त्यांची सोळा सदस्यांची टीम आहे. पुण्यातील रिक्षांना ही स्टार्टअप्स त्या त्या परिसराशी संबंधित जाहिरातींचा पुरवठा करते आणि त्या माध्यमातून ग्राहक आणि ब्रॅंडस् यांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते. त्यासाठी रिक्षांमध्ये टॅबलेटस् बसविण्यात येतात आणि त्याद्वारे वैशिष्ट्यपूर्ण मजकूर असलेल्या जाहिराती – स्थिर प्रतिमा, दृक-श्राव्य जाहिराती आणि भौगोलिक स्थानावर आधारित जाहिराती -प्रसारित करण्यात येतात.

image


या माध्यमातून प्रॉक्झिमिटी मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करु शकते आणि त्याचबरोबर ब्रॅंडस् नादेखील निरनिराळ्या वापरकर्त्यांच्या टॅबलेटस् वरुन प्रसारित होणाऱ्या या जाहिरांतीवरील प्रतिक्रियांच्या आधारे, कोणती जाहिरात सर्वाधिक परिणामकारक आहे, याविषयी माहिती मिळू शकते. 1क्राऊडचे सहसंस्थापक अनिल गुडीबंडे सांगतात की, 1क्राऊड ने त्यांच्या गुंतवणूकदार सदस्यांच्या बरोबरीने यामध्ये सहगुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर ऑटो रिक्षाचालकांचे उत्पन्न १०-१५ टक्क्यांनी वाढविण्यातही या स्टार्टअपला यश मिळाले आहे. “ पारंपारीक निधी उभारणीला व्यवहार्य पर्याय उपलब्ध झाल्यामुळे भारतातील स्टार्टअप्सची वाढ सुरुच आहे आणि ते यशाची नवनवीन शिखरे गाठत आहेत,” प्रॉक्झिमिटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अभय सांगतात.

image


युवरस्टोरीशी बोलताना अभय एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतात, ती म्हणजे या टॅबलेटस् च्या माध्यमातून समोर येणारे चित्र आणि त्याचे विश्लेषण, यामुळे जाहीरातदारांनाही त्यांचा मजकूर सुधारण्याच्या अनेक संधी मिळत असून, त्यातून जाहिरातदारांना मोठी मदत होत आहे. “ रिकीसह आम्ही संपूर्ण जाहिरात मोहीमेच्या चक्राचा माग ठेवू शकतो. जसे की ती कुठेकुठे दाखविली गेली, इत्यादी. तसेच ब्रॅंडस गरजेनुसार गेमेफीकेशन आणि प्लग इन सर्वेक्षणही करु शकतात. ज्यामुळे आरओआयमध्ये वाढ होऊ शकते,” ते सांगतात.

टॅबलेटमध्ये स्थानिक आणि ऑनलाईन मजकूराचा हुशारीने वापर केल्याचा अभय यांचा दावा असून, भारतीय पायाभूत सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन हे करण्यात आले आहे. ऑटो क्षेत्रात वेगाने विस्तार करण्याची प्रॉक्झिमिटीची सध्याची योजना आहे आणि भविष्यात कॅब्स आणि मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या पर्यायांचाही वापर करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, ज्यामध्ये ते इंटरऍक्टीव्ह जाहीरातींचाही समावेश करु शकतील.

प्रॉक्झिमिटी ऍडवर्टायझिंग अर्थात विशिष्ट परिसराशी संबंधित जाहिरात मजकूराचे स्थानिक वायरलेस वितरण, प्रकाशझोतात आले ते आयबेकॉन (iBeacon) तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर आणि ताकदवान स्मार्टफोन्सच्या उदयानंतर... बिझनेस इंटेलिजन्सच्या अहवालात, २०१५ मध्ये अमेरिकेतील किरकोळ विक्रीवर बेकॉन्सचा थेट प्रभाव चार बिलियन डॉलरपेक्षा जास्त मूल्याचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या क्षेत्रातील इतर काही महत्वाच्या खेळाडूंमध्ये कोची स्थित निअरल्स आणि बंगळुरु स्थित मॉबस्टॅकचा समावेश आहे.

पण सध्या तरी प्रॉक्झिमिटीची या बाजारपेठेतील कामगिरी अवलंबून आहे ती भौगोलिक स्थानावर आणि त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे ते ऑटोरिक्षांवर... पण भविष्यात ते आणखी काय काय वैशिष्ट्यांचा समावेश करतात, ते पाहणे रंजक ठरणार आहे.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.

लेखक – हर्षित माल्ल्या

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags