संपादने
Marathi

अमेरिकेहून परतल्यानंतर अभिजीत वात्से यांनी ‘स्लम’ मधील मुलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी बनविले ‘स्लम सॉकर’ !

21st Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share


कुठल्याही मजबूत समाजाचा आधारस्तंभ तेथील मुले आणि तरुण असतात, त्यामुळेच म्हटले जाते की, जर मुलांचा पाया मजबूत असेल तर त्यांचे पुढील आयुष्य देखील सुखाचे असेल आणि देश देखील प्रगती करेल, मात्र आमच्या समाजात मुलांचा असा एक मागासवर्गीय भाग आहे, ज्यांना मुलभूत गरजा देखील भागवणे शक्य होत नाही, त्यांच्यापासून ते वंचित राहतात. अशी मुले जी झोपडपट्टी भागात राहतात आणि संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणात व्यतीत करतात. अशाच मुलांच्या विकास आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम करत आहेत, नागपूरला राहणारे अभिजित वात्से. 

imageअभिजित वात्से पीएचडी रिसर्चर आहेत, त्यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “मी दोन वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर वर्ष २००५ मध्ये भारतात परतलो, कारण तेथे काम करताना मला जाणीव झाली की, माझ्या जीवनाचा उद्देश स्वतःसाठीच काम करण्याचे नाही, तर दुस-या गरीब आणि दुबळ्या लोकांसाठी काम करण्याचे माझे लक्ष्य आहे.”

भारतात परतल्यानंतर ते एका स्वयंसेवी संस्थेत सामील झाले. ही संस्था पहिल्यापासूनच झोपडपट्टी भागात राहणा-या मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होती आणि त्याचे एकमेव केंद्र नागपूर मध्येच होते. येथून खेळणा-या काही मुलांना चांगले खेळल्यामुळे सरकारी नोकरी मिळत होती. 

image


अभिजित यांनी या स्वयंसेवी संस्थेत सामील झाल्यानंतर त्याच्या विस्ताराबाबत विचार केला. त्यांनी निश्चय केला की, ते ‘स्लम सॉकर’ ला देशातील दुस-या भागात देखील घेऊन जातील. त्यासाठी त्यांनी अनेक फुटबॉल क्लब सोबत बातचीत केली आणि अनेक क्लबला त्यांनी आपल्या सोबत सामील करून नागपूर, अमरावती, अकोला इत्यादी ठिकाणांसोबत तमिळनाडूत चेन्नई आणि कोयंबतूर तर, पश्चिम बंगाल मध्ये कोलकाता, मालदा आणि हावडा व्यतिरिक्त सोनीपत मध्ये त्याचे केंद्र उघडले. मुंबईमध्ये त्यांनी अद्याप केवळ सुरुवात केली आहे आणि यावर्षी ऑगस्ट पर्यंत त्याची योजना या केंद्रात चालू करण्याची आहे. अभिजित सांगतात की, हावडा मध्ये स्लम भागात राहणा-या या मुलांना चांगल्या दर्जाच्या खेळपट्टीवर आधुनिक सुविधांसोबत प्रशिक्षण दिले जाते. विशेष बाब ही आहे की, हे स्टेडियम स्लम भागातच बनलेले आहे. 

image


हे लोक मुलांना सॉकर सोबतच सामान्य शिक्षण आणि जीवनातील काही कलांचे देखील प्रशिक्षण देतात, जेणेकरून भविष्यात ही मुले स्वतःसाठी रोजगार देखील प्राप्त करू शकतील. त्यांनी काही शाळांसोबत हात देखील मिळविले आहेत आणि तेथे हे लोक मुलांना खेळतानाच गणित, इंग्रजी आणि कलागुणांचे ज्ञान खेळा खेळातच देतात. जेणेकरून मुले गणित सारख्या विषयाला देखील सहजरीत्या समजू शकतील. या कामात शाळेतील शिक्षक त्यांची मदत करतात. सोबतच मुले देखील हे मन लावून शिकतात. त्यांच्या केंद्रात मुले आणि मुली दोघांना समान पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. स्लम भागात स्लम सॉकरची वेळ त्या भागाप्रमाणे निश्चित केली जाते, कारण तेथे राहणारी अधिकाधिक मुले दिवसा देखील काम करतात, त्यामुळे तेथे सकाळी सहा वाजेपासून साडे आठ वाजेपर्यत आणि संध्याकाळी साडे चार वाजेपासून सहावाजेपर्यंत मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाते. सेंटर मध्ये येणारे मुलं आठ ते अठरा वयोगटातील आहेत. सध्या त्यांच्या केंद्रात जवळपास ३५ टक्के मुली प्रशिक्षण घेत आहेत. 

image


अभिजित सांगतात की, “आतापर्यंत जवळपास ८० हजार मुलांनी आमच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या जवळपास नऊ हजार मुलांची आमच्याकडे नोंदणी आहे. त्यापैकी अधिकाधिक मुले नागपूर आणि जवळपासच्या भागातील आहेत.” अभिजित यांचे म्हणणे आहे की, ज्यांना प्रशिक्षण दिले ती मुले आज देशातील वेगवेगळ्या क्लब कडून खेळत आहेत आणि काही मुले तर राज्यस्तरावर देखील खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या केंद्रातील मुले आपले आणि आपल्या देशाचे नाव प्रसिद्ध करत आहेत. अभिजित मोठ्या गर्वाने सांगतात की, “प्रत्येक वर्षात वेगवेगळ्या देशात होणा-या ‘होमलेस वर्ल्ड कप’ मध्ये आमच्या केंद्रातून निघणारी मुलेच आपला सहभाग नोंदवितात आणि संपूर्ण भारतात केवळ आमच्या संस्थेमार्फत या मुलांची निवड केली जाते. ” 

image


अभिजित सांगतात की, फुटबॉल पूर्णपणे रोजगारावर निर्भर खेळ नाही. तरीही आमच्याकडून निघणारे २० टक्के मुले क्लब आणि शाळेत प्रशिक्षणाचे काम करत आहेत आणि काहींनी खेळाशी निगडीत व्यवसाय देखील सुरु केला आहे. त्या व्यतिरिक्त हे लोक चार हुशार मुलांना प्रशिक्षकाचे आणि दोन मुलींना नर्सिंगचे प्रशिक्षण देत आहेत. 

image


देणगी बाबत अभिजित यांचे म्हणणे आहे की, या लोकांना खेळाडूंच्या खाण्या, राहण्या आणि देश विदेशात येण्या जाण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागते. ‘स्लम सॉकर’ ला प्रत्येक वर्षी फिफा मार्फत “फुटबॉल फॉर होफ प्रोग्राम” च्या अंतर्गत देणगी मिळते. त्याव्यतिरिक्त त्यांना स्थानिक पातळीवर देखील दान इत्यादी मार्फत देणगी मिळते. काही लोक त्यांना बूट आणि कपडे देखील देतात. मागीलवर्षी शैवर्ले ने कोलकात्यात फुटबॉल खेळपट्टी आणि खेळातील दुस-या सामान्यांना प्रायोजकत्व दिले होते. याप्रकारे चेन्नईत गणेशा त्यांच्या कार्यक्रमाला चालविण्यात मदत करतात. आता त्यांची योजना देशाच्या दुस-या भागात विस्तार करण्याचे आहे, जेणेकरून दुस-या स्लम भागात राहणारी मुले देखील आपला विकास यांच्या मार्फत करू शकतील.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

‘अर्बन क्लायंबर्स’च्या माध्यमातून साहसी खेळांना दारोदारी पोहचविणारी आस्था

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'

गरीबीमुळे ज्यांनी सोडले शिक्षण, आज ते सांभाळतात २००पेक्षा जास्त मुलांचे भविष्य

लेखक: हरिश 

अनुवाद: किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags